Home > Fact Check > Fact Check : दोन दिवसांसाठी मोदी सरकार खरेदी करणार 400 कोटींच्या कार, व्हायरल दाव्यामागचं सत्य काय ?

Fact Check : दोन दिवसांसाठी मोदी सरकार खरेदी करणार 400 कोटींच्या कार, व्हायरल दाव्यामागचं सत्य काय ?

काही वर्षांपुर्वी पंतप्रधान मोदी यांच्या 4.31 कोटींच्या सूटची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यातच आता पुन्हा एकदा सरकार दोन दिवसांसाठी 400 कोटींच्या गाड्या खरेदी करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे नेमकं काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य? जाणून घेण्यासाठी वाचा फॅक्ट चेक....

Fact Check : दोन दिवसांसाठी मोदी सरकार खरेदी करणार 400 कोटींच्या कार, व्हायरल दाव्यामागचं सत्य काय ?
X

Modi government will buy cars worth 400 crores for two days, what is the truth behind the viral claim?

2017 मध्ये पंतप्रधान मोदी हे 4 कोटी 31 लाख रुपयांचा सूट घालत असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर मोदींच्या मात्र आता मोदी सरकार दोन दिवसांसाठी 400 कोटी रुपयांच्या तब्बल 50 गाड्या खरेदी करणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने बातमी दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने 8 ते 10 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत होणाऱ्या जी-20 समिटसाठी मोदी सरकार 400 कोटी रुपयांच्या बुलेटप्रुफ आर्मड बीएमडब्लू, ऑडी, मर्सिडीज या कार खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये मर्सिडीज बेन्झ S600 पुलमॅन गार्ड ही VR9 या लेव्हलची कार आहे. या कारची किंमत 12 कोटी इतकी आहे. त्याबरोबरच ऑडी A8 L या कार खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे 2 दिवसांच्या जी-20 समिटसाठी मोदी सरकार कार खरेदी करणार आहे. तसेच या कारची किंमत 9 कोटी 15 असल्याचा दावा करण्यात आला आहे. ( News Link- http://timesofindia.indiatimes.com/articleshow/103031865.cms?from=mdr&utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst )



DNA या पोर्टलनेही यासंदर्भात बातमी दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारत सरकार 50 बुलेटप्रुफ गाड्या खरेदी करणार आहे. ज्यांची किंमत जवळपास 400 कोटी असेल, असा दावा करण्यात आला आहे.




यानंतर तृणमुल काँग्रेसचे प्रवक्ते साखेत गोखले यांनीही ट्वीट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. साखेत गोखले यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आजची शॉकिंग बातमी, पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या PR इव्हेंटमधून 2024 ची तयारी करत आहेत. मोदी सरकार 400 कोटींच्या आर्मड कार खरेदी करणार आहे.

400 कोटी रुपयांच्या कार फक्त दोन दिवसांसाठीच वापरल्या जाणार आहेत का? याच कार जर भाड्याने घेतल्या असत्या किंवा साध्या कार असत्या तर ते स्वस्तात पडलं असतं. पण करदात्यांच्या पैशांची किंमत मोदींना नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे G-20 शिखर परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या पाहूण्यांच्या फोटोचा वापर निवडणूकीच्या पीआरसाठी करायचा आहे.

पडताळणी-

मोदी सरकार 8 ते 10 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत होणाऱ्या G-20 परिषदेसाठी 400 कोटींच्या 50 गाड्या खरेदी करणार असल्याचा दावा डीएनए, टाईम्स ऑफ इंडिया आणि तृणमुल काँग्रेसचे साकेत गोखले यांनी केला होता. मात्र केंद्र सरकारचे फॅक्ट चेकिंग पोर्टल असलेल्या @PIBFactCheck ने हा दावा फेटाळून लावला. त्यामध्ये साकेत गोखले यांचे ट्वीट जोडून म्हटले आहे की, हा दावा फेक आहे. भारत सरकारने G-20 च्या नेत्यांसाठी 20 बुलेटप्रुफ कार 18 कोटी रुपयांमध्ये भाड्याने घेतल्या आहेत. सरकारने कोणतीही कार खरेदी केली नाही. जागतिक नेत्यांना बुलेट प्रुफ कार पुरवणे हा HOS/HOG भेटीचा स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे.

साकेत गोखले यांनी पीआयबीच्या फॅक्ट चेकवर उत्तर देतांना म्हटले आहे की, ही बातमी दैनिक DNA ने दिली आहे. यासंदर्भात त्यांना विचारणा करा.

निष्कर्ष – PIB ने दिलेल्या माहितीनुसार DNA आणि टाईम्स ऑफ इंडियाचा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.

Updated : 27 Aug 2023 8:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top