Home > Fact Check > Fact Check: रिपब्लिक भारत, इंडिया टुडे ने पंजशीर तालिबान संघर्ष दाखवण्यासाठी वापरले जुने व्हिडीओ

Fact Check: रिपब्लिक भारत, इंडिया टुडे ने पंजशीर तालिबान संघर्ष दाखवण्यासाठी वापरले जुने व्हिडीओ

Fact Check: रिपब्लिक भारत, इंडिया टुडे ने पंजशीर तालिबान संघर्ष दाखवण्यासाठी वापरले जुने व्हिडीओ
X

रिपब्लिक भारत ने 23 ऑगस्ट ला 'ये भारत की बात है' या शोमध्ये अफगाणिस्तानबद्दल चर्चा केली. संपूर्ण शो दरम्यान, चॅनलने तालिबान्यांशी पंजशीरच्या लढाईविषयीची अनेक विज्युअल्स दाखवली. अर्ध्या तासाच्या या शोमध्ये, अँकर सय्यद सोहेल यांनी 1 मिनिट 38 सेकंदा दरम्यान, "चला दुसरा फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तालिबानला कसे हरवायचे? तुम्ही हे तालिबानी लढाऊ पहात आहात.
स्फोटाने ठार झालेले तालिबानी दहशतवादी. हा फोटो सांगतो की, पंजशीरच्या सैनिकांनी तालिबान्यांना चिरडले आहे, " दरम्यान, रिपब्लिक इंडियाच्या या 'शो' ला 'पब्लिक टीव्ही' नावाच्या पेजने पोस्ट केले असता, त्याला लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ टाइम्स नाऊ, टीव्ही 9 भारतवर्ष आणि एबीपी न्यूजने देखील दाखवला होता. तर टीव्ही 9 भारतवर्षने ने तर न लढता 800 तालिबान मारले गेल्याचा दावा केला आहे.

टाइम्स नाऊने तर, अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह म्हणाले की तालिबान आपले लढाऊ पंजशीर खोऱ्याभोवती गोळा करत आहेत. दरम्यान एबीपी न्यूजने 23 ऑगस्टच्या 2 शोमध्ये हा व्हिडिओ दाखवला आहे.
रिपब्लिक भारतने आणखी एक दृश्य दाखवले आणि दावा केला आहे की, तालिबानी दहशतवादी खोऱ्यात चढण्याचा प्रयत्न करत होते, आणि जेव्हा भीषण गोळीबार झाला तेव्हा अनेक तालिबानी दहशतवादी मारले गेले. रिपब्लिक भारतच्या या व्हिडिओमध्ये हे दृश्य 2 मिनिटे 46 सेकंदांनंतर पाहिले जाऊ शकते.


इंडिया टुडेनेही हे दृश्य अनेक वेळा दाखवले आणि त्याचे वर्णन पंजशीर घाटी म्हणून केले.
हा दृश्य दाखवत वाहिनीने म्हटले आहे की, ही 23 ऑगस्टची पंजशीर खोऱ्यातील घटना आहे.


काय आहे सत्य...

पहिला व्हिडिओ ट्विटर वर कीवर्ड सर्च केले असता, @CWC_Today ने हा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर अनेक लोकांनी हा व्हिडीओ जुना असल्याचं सांगितल आहे. एका युजर्सने मार्च 2020 ची एक फेसबुक पोस्ट शेअर केली. ज्यात या व्हिडिओचा समावेश होता. हा व्हिडिओ फेसबुक पेज 'Egy Army - Police' वर पोस्ट करण्यात आला होता.


त्यानंतर, आम्ही फेसबूक वर एक कीवर्ड सर्च केला असता, आम्हाला 1 मे 2020 ला त्याच पेज (Egy Army - Police) वर हा व्हिडिओ सापडला. त्यामुळे हा व्हिडिओ अलीकडच्या तालिबानींवर पंजशीरच्या हल्ल्याचा असू शकत नाही. हे स्पष्ट होतं.

हा व्हिडिओ मार्च 2020 मध्ये रेडिट वर देखील अपलोड करण्यात आला होता.
दुसरा व्हिडीओ


इंडिया टुडे आणि रिपब्लिक भारत यांनी दाखवलेले व्हिडिओ तपासण्यासाठी आम्ही ट्विटरवर कीवर्ड सर्च केले. त्यामध्ये, एका यूजरने हा व्हिडीओ यमनचा जुना व्हिडिओ असल्याचं म्हटलं आहे. तसेच यमनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा संदर्भ देत हा व्हिडिओ 16 ऑगस्ट 2021 ला यूट्यूबवर अपलोड सुद्धा करण्यात आला होता. दरम्यान ट्विटरवर असाच एक व्हिडिओ सापडला जो 4 ऑगस्ट रोजी ट्विट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये, गोळीपासून वाचण्यासाठी धावणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त, हल्लेखोरांनाही पाहिले जाऊ शकते.

दरम्यान, वरील व्हिडिओमधील एका फ्रेमच रिव्हर्स इमेज सर्च केलं असता, आम्हाला यमनमधील काही बातम्या आणि 'यमन मिलिटरी मीडिया' हँडलवरील एक ट्विट सापडलं. या ट्विटमध्ये यमनच्या ऑपरेशन अल-निसार अल-मुबीन फेज 2 चे काही फोटोज आणि व्हिडिओज सुद्धा आहेत.
दरम्यान, हा व्हिडिओ 30 जुलै रोजी 'यमन मिलिटरी मीडिया' च्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडिओ ऑपरेशन अल-निसार अल-मुबीन फेज 2 च्या प्रेस ब्रीफिंगचा होता. यामध्ये, यमनमधील एक लष्करी अधिकारी ऑपरेशनबद्दल माहिती देताना दिसतो, या दरम्यान यात काही विज़ुअल्स सुद्धा दाखवले गेले आहेत. या व्हिडिओमध्ये 15 मिनिटे 30 सेकंदांनंतर ते विज़ुअल्स सुद्धा दाखवण्यात आले आहेत जे इंडिया टुडेने 23 ऑगस्टला पंजशीर खोऱ्यातील घटना असल्याचं सांगत दाखवले होते.
दरम्यान आम्ही इंडिया टुडेचे व्हिज्युअल्स आणि यमन मिलिट्री मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवर आढळलेल्या व्हिज्युअल्सची तुलना केली असता, हा व्हिडिओ पंचशीर खोऱ्यातला नाही.


तसेच इंडिया टुडे आणि रिपब्लिक भारतने जो व्हिडीओ पंचशीर घाटी चा सांगत शेअर केला होता. तो व्हिडीओ 31 जुलै ला यमन मिलिट्री मीडियावर अपलोड केल्याचं पाहायला मिळालं. पंजशीर हा अफगाणिस्तानचा प्रांत आहे, जो नेहमीच तालिबानच्या नियंत्रणाबाहेर राहिला आहे. मात्र, यावेळी तालिबानला पंजशीर काबीज करायचे आहे. या कारणास्तव, तालिबान्यांनी त्यांचे लढाऊ पंजशीरच्या आसपास गोळा केले आहेत. या सगळ्या दरम्यान, भारतीय माध्यमांनी जुने व्हिडिओ दाखवत हे दाखवण्याचा प्रयत्न केला की पंजशीरने तालिबानला उडवले.

निष्कर्ष: एकूणच, काही भारतीय माध्यमांनी जुने व्हिडीओ दाखवत त्यांना अफगाणिस्तानमधील पजशीर आणि तालिबानच्या संघर्षाचे असल्याचं म्हटलं आहे.

या संदर्भात Alt News ने फॅक्ट चेक केलं आहे.https://www.altnews.in/hindi/media-misreport-old-visual-from-yemen-and-egypt-aired-as-panjshir-attack-on-taliban/

Updated : 2021-12-14T15:36:42+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top