Home > Fact Check > Fact Check : जेपी नड्डा यांचा पुन्हा खोटा दावा; PM मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवून भारतीयांना बाहेर काढलं

Fact Check : जेपी नड्डा यांचा पुन्हा खोटा दावा; PM मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवून भारतीयांना बाहेर काढलं

Fact Check : जेपी नड्डा यांचा पुन्हा खोटा दावा; PM मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवून भारतीयांना बाहेर काढलं
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवू तिथं अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आणि भारतात सुखरूप आणलं. असा दावा मागील काही काळापासून भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय. अलिकडेच कर्नाटक इथं एका जाहीर सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पुन्हा हाच दावा केला आहे.

नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूज १८ उत्तर प्रदेश या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते, “ पंतप्रधान मोदी यांच्या विनंतीवरून रशिया आणि युक्रेन यांनी ७२ तासांसाठी युद्ध थांबवण्यासाठी तयार झाले. कारण तिथे फसलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथून बाहेर काढता येऊ शकेल”. अमित शाह पुढे असेही म्हणाले, “ ही प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की , भारताचं जगात प्रभुत्व वाढलेलं आहे. आम्ही कित्येक काळापासून दुस-या देशांसोबत राजकीय संबंध बघत आलोय, मात्र हे जरा वेगळंच होतं”.

अमित शहा यांनी या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप ट्विटही केली होती (आर्काइव लिंक)

अमित शहा यांचं यासंदर्भातील वक्तव्य भाजपनं ट्विटही केलं होतं. (आर्काइव लिंक)

नोव्हेंबर २०२२ मध्येच हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्ष व्यस्त होते. त्याचवेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे हिमाचल प्रदेश इथल्या कोटखाई मध्ये एका निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. यावेळी नड्डा यांनी भाषणात दावा केला की, “ जेव्हा रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू होतं तेव्हा ३२ हजार भारतीय विद्यार्थी युक्रेन इथं अडकले होते. त्याचवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेन चे अध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की या दोघांनाही फोन करून युद्ध काही काळासाठी थांबवलं आणि भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. भाजपाच्या युट्युब चैनल वर हे भाषण लाइवस्ट्रीम स्वरूपात उपलब्ध आहे. नड्डा यांच्या भाषणात हे वक्तव्यं वीडियोच्या २० मिनिट ३७ सेकंदापासून सुरू होतं.

भाजपा च्या अधिकृत ट्विटर हँडल वरही जेपी नड्डा यांचं हे वक्तव्य ट्विट करण्यात आलंय. (आर्काइव लिंक)

याच प्रकारे ‘BJP Live’, भाजप राजस्थान, दरभंगा इथले खासदार गोपाल जी ठाकूर, बिहार च्या चनपटिया इथले भाजपा आमदार उमाकांत सिंह यांनीही जेपी नड्डा यांच्या वक्त्व्याला ट्विट केलंय.
Fact Check :

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ३ मार्च २०२२ ला ऑपरेशन गंगा संदर्भात प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये स्पष्टपणे खुलासा करत हा दावा फेटाळून लावला होता. बागची म्हणाले, “ भारताच्या सांगण्यावरून रशिया आणि युक्रेन ने युद्ध थांबवले नव्हते. मला यासंदर्भात माहिती नाही आणि मी काही सांगू शकत नाही. आम्हांला काही विशिष्ट इनपुट्स मिळालेले आहेत जे उपलब्ध आहेत. काही जागा आहेत जिथं यावेळी भारतीयांना जावं लागेल. आम्ही आमच्या नागरिकांना ही माहिती दिली आणि मला आनंद आहे की बरीचशी लोकं तिथं पोहोचली. ही एक युद्धभूमी आहे त्यामुळे मी त्याचं सखोल विश्लेषण करण्यासंदर्भात काही बोलू शकत नाही, कारण मी अजून त्यांना भेटलेलो नाही. मात्र, मला आनंद आहे की, मोठ्या संख्येने लोकं त्या मार्गाने किंवा कुठल्यातरी रेल्वेनं बाहेर येऊ शकतात. मात्र, त्यावरून हा अंदाज लावणं की कुणीतरी बाँम्बिंग थांबवली होती, किंवा आम्ही कुठतरी समन्वय करत होतो, मला वाटतं हे साफ खोटं आहे”.

परराष्ट्र मंत्रालयाच्या या वक्तव्याला खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये २१ मिनिट १८ सेकंदापासून ऐकत येऊ शकतं. कित्येक प्रसार माध्यमांनीही मार्च २०२२ मध्ये असा दावा केला होता आणि ऑल्ट न्यूज ने या दाव्याचं खंडण करत फॅक्ट चेक रिपोर्ट प्रसिद्ध केली होती.

एकंदरीतच, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपल्या प्रचार सभेतील भाषणात खोटा दावा केला होता की, रशिया आणि युक्रेन युद्धावेळी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना तिथून बाहेर काढण्यासाठी दोन्ही देशांच्या अध्यक्षांना फोन करून युद्ध थांबवलं होतं. जेव्हा की, परराष्ट्र मंत्रालयानं स्वतः या बातमीला खोटं ठरवलं होतं.

Updated : 5 March 2023 6:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top