News Update
Home > Fact Check > Fact check : भाजपा नेत्याने पाकिस्तानातील घटनेच्या व्हिडीओला सांप्रदायिक रंग दिलाय का?

Fact check : भाजपा नेत्याने पाकिस्तानातील घटनेच्या व्हिडीओला सांप्रदायिक रंग दिलाय का?

Fact check : भाजपा नेत्याने पाकिस्तानातील घटनेच्या व्हिडीओला सांप्रदायिक रंग दिलाय का?
X

पाकिस्तानात एक महिलेला कारच्या दिशेने ओढत नेऊन तिला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजपा नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत दावा केला होता की, पाकिस्तानातील सिंध प्रांतातील उमरकोट सेशन को्र्टाच्या बाहेर एका हिंदू महिलेचे अपहरण करण्यात आले. व्हिडीओमध्ये काही लोक महिलेला ओढत तिला गाडीत घ्या असे म्हणताना दिसत आहेत.

रिपब्लिकन वर्ल्डने मनजिंदर सिरसा यांच्या ट्वीटच्या आधारे एक न्यूज रिपोर्ट प्रसिध्द केली. त्यामध्ये चॅनलसोबत मनजिंदर सिंह सरसा यांनी केलेल्या संभाषणात ते म्हणात, ही कालची घटना आहे. सिंध परीसरातील मेघवाल एससी समुदायातील 19 वर्षीय विवाहीत महिलेचा बलात्कार करून दुसऱ्या विवाहीत पुरुषासोबत त्या महिलेचे लग्न लावून देण्यात आले. तर त्यांनी पुढे म्हटले की, मेघवाल हे हिंदू समुदायातून आहेत. मनजिंदर सिरसा यांनी हा दावा केला आहे की, महिलेचा हिंदू धर्म बदलून मुस्लीम करण्यात आला आहे आणि महिलेच्या दुसऱ्या पतीचे नाव भाई खान आहे.

टाइम्स नाउ, हिंदुस्तान टाइम्स और वन इंडिया हिंदीने मनजिंदर सिंह सिरसा यांच्या ट्वीटच्या आधारे बातम्या दिल्या.

भाजपा नेते अश्विन उपाध्याय यांनी हा व्हिडीओ शेअर केला.

भाजपा समर्थकांनीही हा व्हिडीओ याच दाव्याने व्हिडीओ शेअर केला आहे. @TrulyMonica आणि @RashmiDVS यांनीही हाच दावा करत व्हिडीओ शेअर केला.

पडताळणी

पाकिस्तानचे नॅशनल असेंबली चे मेंबर लाल मल्ही यांनी ट्वीट केले की ही घटना त्यांचे शहर होमटाऊन उमरकोट येथे झाली होती आणि ही महिला आदिवासी भील समुदायातील होती. त्यांनी लिहीले की त्या महिलेला तिच्या पतीला तलाक देण्याची इच्छा होती. त्यामुळे त्या महिलेला तिचे नातेवाईक तिला ओढत नेत आहेत. महिलेच्या सासरचे लोक भील समुदाय आहेत.

पाकिस्तानी मीडिया आऊटलेट डॉन यांच्या मतानुसार, "40 वर्षाच्या तेजन भील यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, ही कौटुंबिक हिंसाचाराच्या कारणामुळे वेहरो शरीफ निवासी हरचंद भील यांच्याकडून घटस्फोट हवा होता. त्यामुळे त्यांनी कौटूंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यामुळे या महिलेच्या पतीसहीत आठ लोकांनी तिला मारझोड केली. त्यामुळे पोलिसांनी आरोपी हेमो भील यांना अटक करण्यात आली आहे.

अल्ट न्यूजने पाकिस्तानातील सिंध प्रांतात उमरकोट दैनिक डॉनचे प्रतिनिधी ए बी अरसर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, ती महिला आणि तिचा पती दोघेही भिल्ल समुदायाचे होते. त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तर तेजन भील यांनी त्यांचे पती वेहरो शरीफ निवासी हरचंद भील यांचा वाद सुरु होता. त्यामुळे कौटूंबिक न्यायालयाने सोमवारी सुनावणी केली. मात्र सुनावणीनंतर घरी परतत असताना 8 लोकांनी तिच्यावर हल्ला केला. त्यात तिला रस्त्यावरून ओढून नेत केसाला पकडून अपमानित केले. त्यांनी त्या महिलेला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती महिला मदतीसाठी ओरडत होती. त्यावेळी पोलिस तिथे पोहचले आणि त्यांनी त्या महिलेला वाचवले. त्या महिलेचा पती वगळता सर्वजण पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तेजन भील यांच्या नातेवाईकांनी 8 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची ओळख केली असता हेमो, भानजी, पहलाज, सोमजी, घमान, टोगो, जयपाल ठाकुर आणि महिलेचे पती हरचंद भील यांच्या रूपाने केली.

निष्कर्ष

वरील सगळ्या मुद्द्यांवर भाजपा नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी घरगुती हिंसाचाराच्या घटनेला सांप्रदायिक रंग देऊन शेअऱ केला. तर त्याला अनेक प्रमुख माध्यमांनी सत्यता न पडताळता खोटा दावा पुढे पाठवला. तर पाकिस्तानात मुस्लिम लोकांनी हिंदू महिलेला दिवसा पळवून नेण्यात आल्याची घटना खोटी आहे. तर त्या घटनेतील आरोपी आदिवासी भिल्ल समाजातील होते.

Updated : 29 Dec 2021 12:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top