Home > Fact Check > Fact check: नेहरूंच्या उदासीनतेमुळे 1948 च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय फुटबॉलपट्टू अनवाणी खेळले?

Fact check: नेहरूंच्या उदासीनतेमुळे 1948 च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय फुटबॉलपट्टू अनवाणी खेळले?

Fact check: नेहरूंच्या उदासीनतेमुळे 1948 च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय फुटबॉलपट्टू अनवाणी खेळले?
X

सध्या सोशल मीडियावर दोन फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंपैकी पहिल्या फोटोमध्ये जवाहरलाल नेहरू कुत्र्यासह विमानातून उतरताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये काही खेळाडू अनवाणी पायाने उभे असलेले दिसत आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर हे फोटो शेअर करताना असा दावा केला जात आहे की, भारतीय फुटबॉल खेळाडूंकडे घालायला बूटही नव्हते आणि जवाहरलाल नेहरूंचा कुत्रा विमानात प्रवास करत होता.फेसबुकवर हा फोटो भलताच व्हायरल आहे.हा दावा 2018 पासून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. फेसबूक पेज "सोशल तमाशा" वरही 2018 ला हा फोटो व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं हे फोटो सोशल मीडियावर शेअर करतांना 'ऐसे थे कांग्रेस नवाबों के ठाठ". असं म्हणत शेअर केला आहे.

दरम्यान फेसबुक पेज भारत पॉझिटिव्ह, ने सुद्धा 4 नोव्हेंबर 2018 ला हा फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळालं. फेसबुकवर अनेकांनी हा फोटो याच दाव्यासह शेअर केला आहे.काय आहे सत्य...?

गुगल रिव्हर्स इमेज टूलद्वारे सर्च केले असता, फ्रंटलाइनने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टमध्ये, भारताचे पहिले फुटबॉल कॅप्टन तालीमेरेन आओ आणि फ्रेंच टीम चे कॅप्टन रॉबर्ट यांचा हात मिळवतानाचा फोटो पाहायला मिळाला.

तर नेहरुंचा फोटो टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइट वर टाईम्स कंटेंटमध्ये पाहायला मिळाला हा फोटो 1961 च्या सुमारास काढला असल्याचं फोटोखाली नमूद करण्यात आलं होतं.
भारतीय फुटबॉल संघाला 1948 च्या ऑलम्पिक मध्ये निवड होण्यापूर्वी दोन ट्रायल मॅच खेळाव्या लागल्या होत्या. आणि त्याचदिवशी दिलेल्या इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, "लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय फुटबॉल संघाच्या निवडीसाठी दोन ट्रायल सामन्यांपैकी पहिला सामना कोलकत्त्यातील एफसी मैदानावर खेळण्यात आला. जिथे प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान मुसळधार पाऊस होत असल्याने सर्व खेळाडू शूज घालून मैदानात उतरले होते.


त्यामुळे या रिपोर्ट वरून हे स्पष्ट होते की, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच सर्व खेळाडूंकडे फुटबॉल खेळण्यासाठी शूज होते. म्हणजे खेळाडूंकडे निश्चितपणे टूर्नामेंट सुरू होण्याअगोदर शूज होते, पण लंडन मध्ये त्यांच्याकडे शूज होते का? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

दरम्यान भारतीय ऑलिम्पिक फुटबॉल संघाच्या 1948 च्या युरोप दौऱ्याचं वेळापत्रक पाहिलं असता, वेळापत्रकात वेगवेगळ्या सामन्यांचा निकाल पाहायला मिळाला.
सोबतच 1 सप्टेंबर 1948 चं ब्रिटीश वृत्तपत्र Birmingham Daily Gazette मधील पत्रकार जॉन कैमकिन यांचा एक रिपोर्ट मिळाला, रिपोर्ट 31 ऑगस्ट 1948 रोजी प्रकाशित करण्यात आला होता, ज्यामध्ये भारत आणि बोल्डमेअर सेंट मायकल्स एफसी यांच्यातील सामन्याविषयी लिहिण्यात आलं आहे.

या रिपोर्ट मध्ये कॅमकिनने असं म्हटलं होतं की, भारतीय खेळाडूंना जमिनीवर ओलावा असल्यामुळे शूज घालून खेळावे लागले. त्याचा त्यांना फटका बसला. पावसामुळे भारतीय खेळाडूंना अडचणींना सामोरे जावे लागलं. सामान्यतः त्यांनी प्रत्येक सामन्यात चार गोल केले असतील. मात्र, शूज घालून आणि ओल्या मैदानावर खेळता येत नसल्याने त्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं.

त्यामुळे खाली दिलेल्या रिपोर्टनुसार, हे स्पष्ट होते की, भारतीय खेळाडूंनी या काळात शूज घातले होते तसेच लंडन ऑलिम्पिकच्या या दौऱ्यामध्ये त्यांनी घालूनच सहभाग होता.
आणखी बरेच पुरावे असे आहेत की, ज्याने हे स्पष्ट होते की, लंडन ऑलिम्पिक दरम्यान भारतीय खेळाडूंकडे शूज होते. पत्रकार जयदीप बसू यांनी त्यांच्या 'स्टोरीज फ्रॉम इंडियन फुटबॉल' या पुस्तकात भारतीय फुटबॉल प्रशिक्षक बीडी चॅटर्जी यांच एक विधान लिहिलं आहे-

खेळाडूंना शूज होते आणि मैदानातील आर्द्रतेमुळे त्यांना आवश्यक असल्यास ते घालू शकत होते पण त्यांना अनवाणी खेळायला आवडायचं.

‌या विधानासंदर्भात पडताळणी करण्यासाठी जयदीप बसू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "माझ्या पुस्तकातील अध्याय, जो अनवानी पायाने फुटबॉल खेळल्या संबंधी आहे. तो मी भारतीय फुटबॉल प्रशिक्षक बीडी चॅटर्जी यांनी रॉयटर्सला दिलेल्या वक्तव्याचा हवाला देत लिहिला आहे. त्यांनी 1948 ऑलम्पिक, 1951 अशिया खेळ आणि 1952 ऑलम्पिक अनवाणी पायानेच खेळले होते.


1952 च्या ऑलिम्पिकनंतर, जेव्हा युगोस्लाव्हियाकडून भारताचा 10-1 असा पराभव झाला, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला वाटले की त्यांनी शूज घालावेत.

दरम्यान भारतात, काही खेळाडू वगळता, कोणालाही शूजमध्ये खेळायला आवडत नव्हतं. या व्यतिरिक्त, फिफाचा नियम देखील नंतर आला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जो कोणी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळतो, त्याने शूज घालून खेळले पाहिजे. अगदी 1911 मध्ये, जेव्हा मोहन बागानने ऐतिहासिक IFA शील्ड जिंकली, तेव्हा एक खेळाडू अनवाणी पायाने खेळला होता.

भारतीयांना अनवाणी खेळायला आवडायचे. जर त्यांना त्या वेळी लंडनचा प्रवास करता आला असता तर त्यांनी बूटही खरेदी केले असते. ही अफवा समजण्यासाठी हे अगदी सोपे तर्क आहे.

31 जुलै 1948 रोजी भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या ऐतिहासिक सामन्यात भारताचा 2-1 असा पराभव झाला होता, इंडियन एक्सप्रेसने 11 पैकी 8 खेळाडू अनवाणी पायाने खेळल्याच वृत्त सुद्धा दिलं होतं.
रोनोजो सेन आपल्या 'Nation at Play: A history of sports in India' या पुस्तकात लिहितात -

भारतीयांनी शूज घातलेल्या फुटबॉलपटूंविरुद्ध अनवाणी खेळणे असामान्य नव्हते; खरं तर, शूजशिवाय खेळल्याने त्याच्या क्रीडाप्रकाराला चालना मिळाली... मन्ना (भारतीय फुटबॉल खेळाडू) यांनी म्हटलं की, शूज न घालता फुटबॉल नियंत्रित करणं सोपं असतं.
1948 च्या ऑलिम्पिकमध्ये बहुतेक भारतीय खेळाडू अनवाणी खेळले होते. खाली दिलेल्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो फक्त डाव्या बाजूला असणाऱ्या खेळाडूनेच शूज घातलेले पाहायला मिळतात.निष्कर्श:

अशा प्रकारे, सोशल मीडियावर व्हायरल होणारा दावा भारतीय फुटबॉल संघाला पूर्वी आर्थिक मदतीअभावी शूजशिवाय खेळावे लागत होते हा चुकीचा आहे. वास्तविक भारतीय फुटबॉल खेळाडूंना अनवाणी खेळायला आवडत होतं. कारण त्यांना तसंच खेळण्याची सवय होती. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय नियमांनी शूज घालणे अनिवार्य केले नाही. तोपर्यंत भारतीय खेळाडू अनवाणी खेळत राहिले. त्यामुळे जवाहरलाल नेहरूंना खेळाडूंप्रती उदासीनता असल्याचा केला जाणारा दावा दिशाभूल करणारा आहे.

Updated : 8 Aug 2021 8:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top