Home > Fact Check > Fact Check: पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर व्हायरल झालेला फोटो नक्की कधीचा?

Fact Check: पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर व्हायरल झालेला फोटो नक्की कधीचा?

Fact Check: पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर व्हायरल झालेला फोटो नक्की कधीचा?
X

पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर बंगालमधील अनेक ठिकाणांहून हिंसाचाराचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार या हिंसाचारात आत्तापर्यंत 11 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यापैकी 6 भाजप कार्यकर्ते, तृणमूल काँग्रेसचे 4 कार्यकर्ते आणि इंडियन सेक्युलर फ्रंटशी संबंधित 1 व्यक्तीचा या हिंसाचारात मृत्यू झाला आहे. सध्या सोशल मीडियावर बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या व्हिडीओने थैमान घातलं आहे.

ट्विटरवर अनेक लोक पश्चिम बंगालच्या परिस्थिती भयानक झालीय. असं म्हणत एक फोटो शेअर करत आहेत. @Priyankkashyap2 या ट्विटर हँडलने देखील हे ट्विट केलं आहे, या ट्विटला ६६ रिट्विट आहेत. त्यांच्या ट्विट मध्ये त्या म्हणतात #BengalBurning पश्चिम बंगालच्या हिंदूंची परिस्थिती भयानक झाली आहे... आणि आत्ताच ही परिस्थिती आहे तर पुढील ५ वर्षात काय काय होईल?

तामिळनाडूतील भाजपचे अध्यक्ष निर्मल कुमार यांनी सुद्धा २ फोटो शेयर केले आहेत. आणि भाजपच्या ५ कार्यकर्त्यांचा जीव गेला असल्याची पोस्ट लिहिली आहे. https://i2.wp.com/www.altnews.in/hindi/wp-content/uploads/sites/2/2021/05/CTR.Nirmal-kumar-on-Twitter_-_.jpg?ssl=1 फेसबूकवरही अनेकांनी आग लागल्याचे फोटो शेयर करत तृणमूल काँग्रेसकडून बंगालला वाचवा असं म्हटलं आहे. पत्रकार उन्नीकृष्णन आणि संतोष यांनी सुद्धा हे फोटो शेयर करत त्यांच्याकडे या परिस्थितीवर बोलण्यासाठी शब्द नाहीत असं म्हटलं आहे. व्हायरल झालेले हे फोटो नक्की बंगालचे आहेत का? तृणमूल काँग्रेसवर होणारे आरोप खरे आहेत का? बंगालमधली परिस्थिती नक्की काय आहे? काय आहे सत्य? व्हायरल झालेल्या फोटोचं रिवर्स इमेजवर सर्च केल्यांनतर हा फोटो ३ वर्ष जुना असल्याचं समोर आलं आहे. २०१८ च्या हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये रामनवमीदरम्यान जातीयवादामुळे झालेल्या हिंसाचाराचा फोटो आहे. हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या फोटोमध्ये "राणीगंज वर्धमानमधील राम नवमीच्या मिरवणुकीनंतर झालेल्या हिंसाचारानंतर पेट्रोलिंग करताना पोलीस
." रिपोर्ट में बताया गया है कि मौलाना इमदादुस राशिदी, जो आसनसोल की एक मस्जिद के इमाम हैं, उनका 16 साल का बेटा इस हिंसा में मारा गया. उसकी लाश हिंसा के 4 दिन बाद मिली थी. इमाम ने लोगों से गुज़ारिश करते हुए कहा, "मैंने अपना बेटा खोया है. और मैं नहीं चाहता कि और भी कोई अपना बेटा खो दे. अगर कोई बदला लेने की सोचेगा तो मैं शहर छोड़कर चला जाऊंगा."
बातमी सांगितल्यानुसार मौलाना इमदादुस राशिदी यांचा १६ वर्षाचा मुलगा या हिंसाचारात मारला गेला होता. इमदादुस राशिदी हे आसनसोलमधील मशिदीचे इमाम आहेत. त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर ४ दिवसांनी त्यांचा मृतदेह मिळाला.

या घटनेनंतर इमाम यांनी समाजाला विनंती करत हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं. असं न झाल्यास मी शहर सोडून निघून जाईल, माझा मुलगा मी गमावला पण अजून कोणी आपल मुलं गमावू नका असं त्यांनी म्हटलं आहे. २०१८ च्या इंडिअन एक्सप्रेसच्या रिपोर्टमध्ये सुद्धा हा फोटो पाहायला मिळतो. निष्कर्ष कायं? २०१८ साली झालेल्या जातीय हिंसाचारा दरम्यानचा फोटो आत्ताचा सांगून शेअर केला जात आहे. सध्या सुरु असलेल्या हिंसाचाराबरोबर हा जुना फोटो ही अनेक नेटकरी शेअर करत असल्याने जुना फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Updated : 5 May 2021 4:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top