Home > Fact Check > Fact Check: Google Pay ला RBI ची मान्यता नाही?

Fact Check: Google Pay ला RBI ची मान्यता नाही?

Google Pay ला RBI ची मान्यता नाही. काय आहे सत्य? गुगल पे बाबत व्हायरल झालेल्या दाव्याची सत्यता काय?

Fact Check: Google Pay ला RBI ची मान्यता नाही?
X

अनेक सोशल मीडिया युजर ने 'गुगल पे' ला आरबीआय ने मान्यता दिली नसल्याचा मेसेस शेअर करत गुगल पे वापरताना सावधान राहा असं सांगितलं आहे. (Gpay is Secure or not) व्हायरल होणाऱ्या या पोस्ट मध्ये 'RBI ने दिल्ली उच्च न्यायालयात g pay ला मान्यता दिली नसल्याचं सांगितलं जातं आहे. तसंच या मेसेजमध्ये असं देखील सांगितलं जात आहे की, 'गूगल पे' द्वारे पैसे ट्रान्सफर केले असता काही अडचणी आल्यास बाबत कोणतीही तक्रार दाखल करता येणार नाही. कारण 'नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' (एनपीसीआय) मधील अधिकृत पेमेंट सिस्टमच्या यादीमध्ये 'गुगल पे' नाही. असा संदेश व्हायरल होत आहे.





काय आहे सत्य...?

दरम्यान पडताळणी केल्यानंतर NPCI कडून गूगल पे यूपीआय अँपला मान्यता असल्याचं आम्हाला पाहायला मिळालं. म्हणजेच गूगल पे ला 'थर्ड पार्टी अँप' म्हणून यूपीआय पेमेंटसाठी मान्यता आहे.






मात्र, हा व्हायरल होणार दावा २०२० मध्येही शेअर केला गेला होता आणि तेव्हा गुगल पे इंडियाने याबाबत निवेदन सुद्धा दिलं होतं.

दरम्यान जून २०२० मध्ये पीटीआयशी बोलताना गूगल पे च्या प्रवक्त्याने म्हटलं होत की, गुगल पे पूर्णतः कायद्यानुसार कार्य करतं. तसंच हे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करतं. तसंच सहकारी बँकांसोबत काम करत जे यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) देय्यकास परवानगी देतात. मात्र देशातील यूपीआय अँप्सला थर्ड पार्टी अँप मानलं जात असतांना, त्यांना "पेमेंट सिस्टम ऑपरेटर" समोर येण्याची गरज नसते.

पुढे गूगल पे च्या प्रवक्त्याने म्हंटलं - गूगल पे द्वारे होणारे सर्व व्यवहार आरबीआय / एनपीसीआय यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच काटेकोरपणे केले जातात. तसेच आवश्यक असल्यास गूगल पे यूजर केव्हाही (२४/७) कस्टमर केयर सोबत संवाद साधू शकतात.

मात्र, इंडिया टुडेच्या एका आर्टिकलचा आधार घेत हा भ्रामक दावा व्हाट्सअँप वर शेअर केला जात आहे. दरम्यान इंडिया टुडेच्या रिपोर्ट च्या हेडींगमध्ये असं म्हणण्यात आलंय होतं की, गुगल पे हा 'पेमेंट सिस्टम ऑपरेटर' नाही. मात्र, काही काळाने इंडिया टुडेने या रिपोर्टचं हेडिंग बदललं. सोबतच गुगल पे च्या प्रवक्त्याच्या विधानाचाही रिपोर्टमध्ये समावेश करण्यात आला.

खाली इंडिया टुडेच अगोदरच हेडिंग आणि अपडेट केलेलं हेडिंग आपण पाहू शकतो. त्यामुळे रिपोर्टचं हेडिंग अपडेट केल्यानंतर आपल्याला हे हेडिंग पाहायला मिळतं, "कंपनीने म्हटले आहे की गूगल पे हा यूपीआय इकोसिस्टमचा भाग आहे आणि तो भारतात वैध आहे." दरम्यान एनपीसीआयने हे स्पष्ट केलं आहे की, गूगल पे हा थर्ड पार्टी पेमेंट अ‍ॅप आहे आणि त्याद्वारे केलेले सर्व यूपीआय व्यवहार सुरक्षित आणि आरबीआयने ठरवलेल्या नियमांनुसार होतात.

एनपीसीआय ने देखील स्पष्टीकरण दिलं आहे.








"आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की 'गुगल पे' थर्ड पार्टी अँपच्या यादीमध्येच असून इतर अँप्स प्रमाणे यूपीआय पेमेंटची सेवा प्रदान करतं. तसेच गुगल पे बँकिंग भागीदारांच्या माध्यमातून एनपीसीआयच्या यूपीआय फ्रेमवर्क अंतर्गत काम करतं. दरम्यान हे सगळं काही TPAP, NPCI वेबसाइटच्या लिस्ट मध्ये देण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही अधिकृत TPAP मार्फत केलेले व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि NPCI / RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसारच केले जातात. व याची पूर्ण माहिती वापरकर्त्यांकडे असते.

निष्कर्ष:

एकूणच 'गुगल पे' हे थर्ड पार्टी अँप असून त्याला यूपीआय पेमेंटची परवानगी आहे. मात्र, याला "पेमेंट सिस्टम ऑपरेटर" असण्याची आवश्यकता नाही.

Updated : 14 July 2021 1:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top