Home > Fact Check > Fact Check: भारत पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष बनला आहे का?

Fact Check: भारत पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष बनला आहे का?

Fact Check: भारत पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष बनला आहे का?
X

फेसबुक पेज 'नमो इंडिया' ने एक इन्फोग्राफिक शेअर केले आहे. त्यात लिहिले आहे की, "आजपासून जगाची कमान भारताच्या हातात आहे, भारत UNO (UNSC) चा अध्यक्ष बनला आहे. तुर्की, पाकिस्तानसह अनेक देश भडकले असून भारत प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्षपद भूषवणार आहे. नमो इंडिया पेजने सुधीर चौधरी फेसबुक ग्रुप आणि अर्णब गोस्वामी ऑफिशियल ग्रुपवर हे इन्फोग्राफिक शेअर केले आहे.














हे इन्फोग्राफिक नेटिझन्सने अनेक पेज ग्रुपवर शेअर केले आहे. 'विद्यार्थी शिवम' नावाच्या पेजने शेअर केलेल्या पोस्टला 7,000 पेक्षा जास्त लाइक्स ही पोस्ट लिहित असताना पाहायला मिळाले. याच पेजने हे इन्फोग्राफिक तयार केले आहे आणि यावर दिसणाऱ्या लोकांकडून कळतेय.





काय आहे खरं ?

या दाव्याची चौकशी करताना, आम्ही पाहिले की 1 ऑगस्ट रोजी, अनेक माध्यम संस्थांनी यासंबंधी बातम्या प्रकाशित केल्या होत्या. हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, ऑगस्ट 2021 मध्ये सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे असेल. त्याचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करतील असं म्हटलं आहे. तर जनसत्ताच्या अहवालात सांगण्यात आले आहे की, यापूर्वीही भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अनेक वेळा अध्यक्षपद भूषवले आहे.

जरी हे खरं आहे की पीएम मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान असतील जे या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष असतील. पण भारत प्रथमच त्याचे अध्यक्षपद घेणार आहे हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. ही माहिती संयुक्त राष्ट्रांच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

1950 मध्ये भारताने प्रथमच या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. तेव्हापासून भारत अनेक वेळा या परिषदेचा सदस्य बनला आहे.







संयुक्त राष्ट्रसंघाच्या संकेतस्थळावर दिलेली माहिती सांगते की, या परिषदेचे अध्यक्षपद प्रत्येक सदस्याला एका महिन्यासाठी दिले जाते. ऑगस्ट महिन्यासाठी भारत या परिषदेचे अध्यक्ष असेल.

कॉन्सिल सदस्यांची अध्यक्षता वर्णक्रमानुसार केली जाते. खालील चित्रात पाहिले जाऊ शकते. आणि भारताचे सदस्यत्व 31 डिसेंबर 2022 रोजी संपेल. भारत सध्या (2021-2022) या परिषदेचा सदस्य आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये 15 सदस्य असतात. त्याचे 5 स्थायी सदस्य आहेत. आणि उर्वरित 10 सदस्य 2 वर्षांसाठी निवडले जातात. चीन, फ्रान्स, रशिया, यूके आणि अमेरिका हे त्याचे स्थायी सदस्य आहेत. भारत वर्षानुवर्षे या परिषदेचा स्थायी सदस्य होण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु मतांच्या अभावामुळे ते होत नाही.

5 कायम असलेल्या सदस्यांना राईट टू व्हीटो करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच, जर या 5 सदस्यांपैकी कोणीही कोणत्याही ठरावाशी सहमत नसेल, तर तो ठराव संमत होऊ शकत नाही. भारताच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळवण्याच्या मार्गात चीन हा सर्वात मोठा अडथळा आहे. एकंदरितच, भारत पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष बनल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे निराधार आहे.

Updated : 6 Aug 2021 11:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top