Home > Fact Check > Fact Check: 'तालिबानी आता सुधारले आहेत', अल जजीरा, NDTV च्या 'त्या' वृत्ताचं सत्य काय?

Fact Check: 'तालिबानी आता सुधारले आहेत', अल जजीरा, NDTV च्या 'त्या' वृत्ताचं सत्य काय?

Fact Check: तालिबानी आता सुधारले आहेत, अल जजीरा, NDTV च्या त्या वृत्ताचं सत्य काय?
X

काही भाजप समर्थक असलेल्या फेसबुक पेज ने सोशल मीडियावर दोन ट्वीट्सची तुलना करत

एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये एनडीटीव्हीचं एक ट्विट सुद्धा असल्याचं दिसून येत आहे. मात्र दुसरं ट्विट कथितरित्या अल जजीरा च आहे. तसेच त्याखाली 'इंडिया 272+' या फेसबुक पेजवर देखील हा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. आणि पोस्टच्या वरती "तालिबान प्रेमी एनडीटीव्ही". असं लिहिण्यात आलं आहे.

2014 च्या लोकसभा निवडणूका पाहता, नरेंद्र मोदी यांनी 'India272+' नावाचे मोबाईल अॅप लाँच केले होते. मात्र, सरकार बनवण्यासाठी 272 जागा असणे आवश्यक होते.

स्क्रीनशॉटमधील दोनही ट्वीट्च्या वरती लिहिण्यात आला आहे की, "एनडीटीव्ही तालिबानचा नवीन मीडिया पार्टनर बनला आहे!". शिवाय, एनडीटीव्हीचे ट्विट तालिबान आता पूर्वीसारखा हिंसक राहिलेला नाही. तर अल जजीराच्या कथित ट्विटखाली असं लिहिण्यात आलं आहे की, तालिबान अल्पवयीन मुलींचे अपहरण करत आहेत आणि विरोध करणाऱ्या मुलींना मारले जात आहे.





दरम्यान ट्विटरवरील ट्विटर हँडल सोशल तमाशा, @Being_Humor आणि मोदी भरोसा यांनी सुद्धा हे ग्राफिक शेअर केलं आहे.











हे ग्राफिक फेसबुकवर सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.







Adv. शुभेंदू यांनी देखील अल जजीराचा हा कथित स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.






काय आहे सत्य...?

अल जजीरा

हा स्क्रीनशॉट निरखून पाहिला असता असं लक्षात येतं की, स्क्रीनशॉटमध्ये मीडिया आउटलेटचे नाव 'Al Jajeera' असे लिहिले आहे तर प्रत्यक्षात ते Al Jazeera आहे. तर ट्विटर हँडलचे नाव '@AJENews' असं आहे.





दरम्यान स्क्रीनशॉटवरील युजरनेम बरोबर आहे. मात्र वापरलेला लोगो अल जंजिरा इंग्रजीचा आहे. त्यामुळे हा स्क्रीनशॉट बनावट असल्याचं दिसून येत आहे.








तसेच स्क्रीनशॉटमध्ये शेअर करण्यात येणाऱ्या दाव्याबद्दल पडताळणी केली असता, डेली मेलच्या रिपोर्टनुसार, तालिबान घरोघरी जाऊन मुलींना जबरदस्तीने नेतात. मात्र, त्यापैकी काही मुली या 12 वर्षांच्या देखील आहेत. ज्यांचं तालिबान सैनिक लैंगिक शोषण करतात.





दरम्यान तालिबानने हा दावा फेटाळला असला तरी या बद्दल अनेक रिपोर्ट मिळालेले आहेत.

NDTV चा स्क्रीनशॉट

एनडीटीव्हीच्या कथित स्क्रीनशॉटमध्ये तालिबानचा हवाला देत म्हटलं आहे की, तालिबान आता पूर्वीसारखी दहशतवादी संघटना राहिलेली नाही. तालिबान आता उदारवादी झाला आहे.

मात्र, NDTV ने हा दावा केला नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे NDTV च्या व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये चॅनलची स्टोरी चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली आहे. दरम्यान अँकर श्रीनिवासन जैन यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले होते की, तालिबानने ते आता पूर्वीसारखे हिंसक राहिले नाही. तर रिअॅलिटी चेक नावाच्या कार्यक्रमात तालिबानने आता महिला त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतात आणि त्या नोकरीही करू शकतात. याशिवाय महिला सरकारी पदांवर सुद्धा काम करू शकतात. असं सांगितलं होतं.

कार्यक्रमादरम्यान, श्रीनिवासन यांनी द न्यूयॉर्क टाइम्स मॅगझीनसाठी काम करणाऱ्या अझमत खान हिला तालिबानच्या दाव्यावर तिचे मत विचारले, ती म्हणाली की, सध्या भविष्याबाबत कोणताही दावा करता येत नाही. तालिबानने यापूर्वीही आपले आश्वासन मोडले होते.

त्यांच्या म्हणण्यानुसार, तालिबानने आपली 'मध्यम' प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला असेल कारण संपूर्ण जगाची नजर अफगाणिस्तानवर आहे, पण माध्यमांचे लक्ष हटवल्यानंतर तालिबान आपल्या खऱ्या स्वरूपात परत येऊ शकतो.

निष्कर्श:

एकूणच, अल जजीराचे बनावट ट्विट एनडीटीव्हीच्या स्क्रीनशॉटसह सोशल मीडियावर शेअर केले गेले असून याव्यतिरिक्त, एनडीटीव्ही तालिबानच्या बाजूने बोलत असल्याचं खोटं मत तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या संदर्भात Alt news ने फॅक्ट चेक केलं आहे.

https://www.altnews.in/fake-al-jazeera-tweet-misleading-portrayal-of-ndtvs-report-on-taliban-shared-online/

Updated : 27 Aug 2021 2:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top