Home > Fact Check > Fact Check: बेरोजगारीच्या प्रश्नावर विद्यार्थ्याने राहुल गांधींना अपमान केला का?

Fact Check: बेरोजगारीच्या प्रश्नावर विद्यार्थ्याने राहुल गांधींना अपमान केला का?

Fact Check: बेरोजगारीच्या प्रश्नावर विद्यार्थ्याने राहुल गांधींना अपमान केला का?
X

काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सातत्याने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 19 मार्चला त्यांनी आसाममध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांचा याच संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत झाला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधींची खिल्ली उडवली गेल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडिओ मागची नेमकी सत्यता काय आहे हे जाणून घेऊ या..!

या व्हिडीओत राहुल गांधी एका विद्यार्थ्याला 'भाजप काळात बेरोजगारी वाढली की नाही?' असा प्रश्न विचारतात. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना विद्यार्थी बेरोजगारी नाही वाढली असं उत्तर देताना ऐकू येते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधींची टिंगल केली गेली आहे. अतुल आहुजा नामक व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत वर 'गजब बेज्जती है यार' असं लिहिले आहे. या व्हिडीओला 22 हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिलं असून, 3 हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केलं आहे..

ट्विटरप्रमाणे हा व्हिडीओ फेसबुकवर सुद्धा व्हायरल केला जात आहे. फेसबुकवर नीराज सक्सेना नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हा व्हिडिओ काहीजण गंमत म्हणून शेअर करत आहे, तर काही जण खरा व्हिडीओ असल्याचं समजत आहेत. त्यामुळे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी ह्या व्हिडीओचे 'फॅक्ट चेक' केला असता हा व्हिडीओ अपूर्ण आहे आणि एडिट करुन खोटे दाखवण्याचे प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

काय आहे सत्यता?

राहुल गांधींना त्या विद्यार्थ्यांने बेरोजगारीवरच उत्तर दिलं होतं आणि ते नाही हेच उत्तर होतं. पण प्रत्यक्षात झालं असं की, संबंधित विद्यार्थ्याला हिंदी येत नसल्याने आणि राहुल गांधींना आसामी येत नसल्याने तिसऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीने राहुल गांधी त्या विद्यार्थ्याशी संवाद साधत होते.

राहुल गांधींनी मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली की नाही? असा प्रश्न विचारला मात्र त्या विद्यार्थ्याला प्रश्न व्यवस्थित कळला नाही आणि त्याने लगेच नाही असे उत्तर दिले. पण नंतर मध्यस्थी व्यक्तीने प्रश्न पुन्हा आसामी भाषेत सांगितला आणि विद्यार्थ्याला प्रश्न कळल्यानंतर त्याने लगेच बेरोजगारी वाढली असल्याचं स्पष्ट केलं. एवढेच नाही तर बेरोजगारी वाढण्याचे कारणही त्या विद्यार्थ्यांनी पुढे सांगितले आहे, मात्र ह्या व्हिडिओचा केवळ पहिलाच भाग व्हायरल केला गेला आहे.

राहुल गांधी यांच्या यु ट्यूबवर हा व्हिडीओ उपलब्ध आहे. यामध्ये 13 मिनटं 14 सेकंदांनी राहुल गांधी आणि त्या विद्यार्थ्यमध्ये संभाषण सुरू होते. तर 20 मिनटं 12 सेकंदाला व्हायरल व्हिडीओतील प्रसंग येतो.

त्यामुळे पूर्ण व्हिडीओ पहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेला व्हिडीओ अर्धवट आणि जाणीवपूर्वक एडिट करून पोस्ट केला जात असून,सोबत केलेला दावा खोटा आहे.

Updated : 24 March 2021 3:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top