Home > Fact Check > FACT CHECK: हिंदू धर्मासाठी घटनेत बदल करा, माजी सरन्यायाधीश रंजन गोगईंच्या व्हायरल ट्वीटचं सत्य काय?

FACT CHECK: हिंदू धर्मासाठी घटनेत बदल करा, माजी सरन्यायाधीश रंजन गोगईंच्या व्हायरल ट्वीटचं सत्य काय?

FACT CHECK: हिंदू धर्मासाठी घटनेत बदल करा, माजी सरन्यायाधीश रंजन गोगईंच्या व्हायरल ट्वीटचं सत्य काय?
X

भारताचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेल्या कथित ट्विटचा एक स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ट्वीट @RanjanGogoii या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या व्हायरल ट्विटमध्ये "मुस्लिम", "बौद्ध" आणि "ख्रिश्चन" आपले सण कसे साजरे करतील? हे त्यांच्या समाजातील लोक ठरवतील, पण हिंदू त्यांचे सण कसे साजरे करतील? हे भारतातील न्यायालय ठरवतील. भारतीय राज्यघटनेचे 'भेदभाव' मूळ अनुच्छेद २५, २६, २७, २८, २९, ३० आणि ३१ मध्ये आता सुधारणा केली पाहिजेल.

या कथित ट्वीटचा स्क्रिनशॉट फेसबुकवर अनेकांनी शेअर केला आहे. फेसबूक युजर आर्यन सिंग यांनी सुद्धा या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

काय आहे सत्य...?

ट्विटरवर या संदर्भात सर्च केलं असता असता आम्हाला रंजन गोगोई यांच्या नावाचे अनेक ट्विटर अकाउंट्स असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, यापैकी कोणतंही त्यांचं अधिकृत (व्हेरीफाईड) अकाउंट नव्हतं. सोबतच @RanjanGogoii या नावाचं अकाउंट सुद्धा नव्हतं.

दरम्यान @RanjanGogoii या ट्विटर हँडलचा शोध घेण्यासाठी अल्ट न्यूजने वेब आर्काइवची मदत घेतली. @RanjanGogoii या ट्विटर हँडलवरील अनेक ट्विट पाहायला मिळाले. या वेब संग्रहातून ट्विटर हँडलच्या बायोमध्ये हे अकाउंट 'पैरोडी अकाउंट' असल्याचं म्हटलं आहे.

या वेब आर्काइवमध्ये आम्हाला हे व्हायरल ट्विट सुद्धा सापडलं. जे २६ मार्च २०२० रोजी ट्विट केलं गेलं होतं. या ट्विटची लिंक कॉपी करून गूगलवर सर्च केल्यानंतर ट्विटर हँडल @PuspendraTweet पर्यंत आम्ही पोहोचलो.

दरम्यान हे दोनही ट्विटर हँडल एकच असल्याचं समोर आलं, म्हणजेच अगोदर @RanjanGogoii नावाने सुरु असलेल्या ट्विटर हँडलच नाव आता @PuspendraTweet असं करण्यात आलं होतं.


दरम्यान व्हायरल ट्विट हे @PuspendraTweet या ट्विटर हॅंडलवरूनच २६ मार्च २०२० रोजी दुपारी ३:४५ वाजता करण्यात आलं असल्याचं समोर आलं. मात्र, लक्षणीय बाब म्हणजे @RanjanGogoii आणि आता @PuspendraTweet या नावाने सुरु असलेल्या ट्विटर अकाउंटला बरेच व्हेरीफाईड अकाउंट्स फॉलो करतात, त्यामध्ये कपिल मिश्रा, मेजर सुरेन्द्र पुनिया तसेच गजेन्द्र चौहान या सारख्यांचा यामध्ये समावेश आहे.

एकंदरीत भारताचे माजी मुख्य न्याया

धीश रंजन गोगोई यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होणारे ट्विट हे त्यांचे नसून एका बनावट अकाऊंटवरून त्यांच्या नावाने शेअर केल्याचं स्पष्ट होतंय. या अगोदरही नीता अंबानी, डॉ. कफील खान, शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या नावाने सुद्धा असे बनावट ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Updated : 24 Jun 2021 3:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top