Home > Fact Check > Fact Check: पाकिस्तानी खासदार 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर नाचल्याची भारतीय माध्यमातील बातमी फेक आहे का?

Fact Check: पाकिस्तानी खासदार 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर नाचल्याची भारतीय माध्यमातील बातमी फेक आहे का?

आज तक या वृत्तवाहिनीने 6 जानेवारी रोजी प्रसिध्द केलेल्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की पाकिस्तानी खासदाराने ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर डान्स केल्याने पाकिस्तानात त्याचा निषेध करण्यात येत आहे. तर या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेचे सदस्य आणि टीव्ही निवेदक अमिर लियाकत हुसैन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अमिर, कतरीना कैऱ आणि अक्षय कुमारच्या ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यावरून पाकिस्तानी नागरीकांनी त्यांचा निषेध केल्याचा दावा केला आहे.

Fact Check: पाकिस्तानी खासदार टिप टिप बरसा पानी गाण्यावर नाचल्याची भारतीय माध्यमातील बातमी फेक आहे का?
X

आज तक या वृत्तवाहिनीने 6 जानेवारी रोजी प्रसिध्द केलेल्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की पाकिस्तानी खासदाराने 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर डान्स केल्याने पाकिस्तानात त्याचा निषेध करण्यात येत आहे. तर या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेचे सदस्य आणि टीव्ही निवेदक अमिर लियाकत हुसैन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अमिर, कतरीना कैऱ आणि अक्षय कुमारच्या 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यावरून पाकिस्तानी नागरीकांनी त्यांचा निषेध केल्याचा दावा केला आहे.

अमिर लियाकत हुसैन पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष असलेल्या तहरीक-ए-इंसाऱ या पक्षाचे खासदार आहेत.

https://tinyurl.com/2p82hvbk

ANI, नवभारत टाइम्स, हिंदुस्तान टाइम्स, झी न्यूज UP उत्तराखंड, न्यूज 24, पंजाब केसरी, नवोदय टाइम्स, झी सलाम, लोकमत या माध्यमांनीही अशाच आशयाचे वृत्त दिले होते.

https://i1.wp.com/www.altnews.in/hindi/wp-content/uploads/sites/2/2022/01/2022-01-06-17_12_15-https___www.lokmat.com_international_pakistani-mp-aamir-liaquat-hussain-dancing-.jpg?resize=883,842&ssl=1

भारतीय माध्यमांनी दिलेल्या ट्वीटमध्ये जवळपास सगळ्यांच्या रिपोर्टमध्ये अमन मलिक यांचे ट्वीट जोडले आहे. ज्यांनी अमिर लियाकत हुसैन यांनी टिप टिप बरसा पानी गाण्यावर डान्स केल्याबद्दल पाकिस्तानी नागरीकांनी त्यांचा निषेध केल्याचा दावा केला आहे. तर ANI ने आपल्या रिपोर्टमध्ये कोणत्याही ट्वीटविना पाकिस्तानी खासदाराने बॉलिवूड गाण्यावर डान्स केल्याचा दावा केला आहे.पडताळणी-

भारतीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तात दावा केलेले आणि व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेली व्यक्ती पाकिस्तानचे खासदार आमिर लियाकत हुसैन नाहीत. तर व्यवसायाने डान्सर आणि कोरिओग्राफर असलेले शोएब शकूर आहेत. एक ट्वीटर वापरकर्त्याने या व्हिडीओवर कमेंट करताना हा दावा केला आहे.अल्ट न्यूजने केलेल्या पडताळणीनुसार शोएब शकूर याने 4 जानेवारी 2021 रोजी हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.

https://www.instagram.com/p/CYSsKsxDcpT/?utm_source=ig_embed&ig_rid=558e0e13-9111-42c2-be3a-bd00934ba819

फेसबुकवर पाकिस्तानी HS Studio च्या अकाऊंटवर या कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यामध्ये हा व्हिडीओसुध्दा आहे. तसेच या व्हिडीओसोबत शओएब शकूर याला टॅग करताना लेहिले आहे की, टिप टिप गाने पर डान्स करते हुए शोएब.

https://i0.wp.com/www.altnews.in/hindi/wp-content/uploads/sites/2/2022/01/2022-01-06-17_40_43-10-HS-Studio-by-Bilal-Saeed-_-Facebook-Brave.jpg?ssl=1

निष्कर्ष- यावरून असे दिसून येते की, भारतीय माध्यमांमध्ये करण्यात येत असलेला दावा खोटा आहे. पाकिस्तानी खासदाराने बॉलिवूड गाण्यावर डान्स केल्याचा दावा करण्यात येत होता. तर भारतीय माध्यमांनी यातील तथ्य न तपासता व्हायरल केला होता. तर आज तकने नंतर रिपोर्टमध्ये अपडेट केले होते. मात्र आज तकची अर्काईव्ह लिंक सोबत जोडत आहोत.

तसेच आज तक ने अपडेट केलेल्या वृत्तात हे वृत्त अप़डेट असल्याचे म्हटले नाही. तर अल्ट न्यूजने हा लेख लिहीण्याच्या वेळेपर्यंत इतर कोणत्याही माध्यमांनी त्यांचे वृत्त डिलीट केलेले आढळले नाही.


Updated : 7 Jan 2022 9:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top