Home > Fact Check > Fact Check : थँक गॉड! अपुन के अंडरविअर का नाम डॉलर है, रूपी होता तो बार बार गिरता रहता असं जुही चावलाने खरंच म्हटलं होतं का?

Fact Check : थँक गॉड! अपुन के अंडरविअर का नाम डॉलर है, रूपी होता तो बार बार गिरता रहता असं जुही चावलाने खरंच म्हटलं होतं का?

काही दिवसांपुर्वी अमेरीकन डॉलरच्या तुलनेत रूपयाने ८१ चा आकडा पार केला आणि अभिनेत्री जुही चावलाचं ट्विट व्हायरल झालं. ज्यात ती रूपयाच्या घसरणीवरून सरकारल सुनावते आहे. पण हे ती खरंच म्हणाली आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचं हे Fact Check!

Fact Check :  थँक गॉड! अपुन के अंडरविअर का नाम डॉलर है, रूपी होता तो बार बार गिरता रहता असं जुही चावलाने खरंच म्हटलं होतं का?
X

नुकताच अमेरीकन डॉलरच्या तुलनेत भारताचा रूपया भारताचा रुपया पुन्हा एकदा घसरला आहे. एका डॉलर च्या तुलनेत ८१ रूपये आता मोजावे लागणार आहेत. यावर फारसं कुणी बोलताना दिसत नाही पण बॉलीवुड अभिनेत्री जुही चावलाचं एक ट्विट मात्र सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. २०१३ साली केलेल्या तिच्या एका ट्विटचा स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत आहे ज्यात ती म्हणाली होती की, "थॅंक गॉड आपल्या अंडरवियरचं नाव डॉलर आहे रूपया असतं तर सारखा पडला असता."


तिच्या या ट्विट चा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागला आहे. खरं तर जेव्हा जेव्हा डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण होते तेव्हा तेव्हा जुही चावलाच्या या ट्विटचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. याचाच संदर्भ असलेले काही ट्विटस आणि पोस्ट आपण पाहुयात.

शुक्रवारी २३ सप्टेंबर २०२२ रोजी MOHD ISHTIYAQUE या वापरकर्त्याने अभिनेत्री जुही चावला यांना टॅग करून लिहिलं आहे की "जुही जी आपली अंडरविय़र डॉलर तर इतकी वर वर जाते आहे की वर जाता जाता आपल्या डोक्यावरील मुकुटच बनुन जाईल"

यामध्ये त्याने अनेक कलाकारांचे रूपयाच्या घसरणीवर असलेले ट्विट्स चे स्क्रिन शॉट आहेत. आता त्यात दोन फोटो जुही चावलांच्या ट्विट चे आहेत. त्यापैकी एक फोटो वरील स्क्रिनशॉट आहे. ज्यामध्ये आपण बारकाईने पाहिलं तर ट्विट ची वेळ १९.४० म्हणजे संध्याकाळी पावणे आठची असल्याचं दिसून य़ेत आहे.

हे काही पहिल्यांदाच झालं आहे असं नाही. या आधी देखील २०२० मध्ये रूपयाची घसरण झाली होती तेव्हा No More BJP या फेसबुक पेज ने जुही चावलाचा हाच स्क्रिन शॉट पोस्ट केला आहे.


शिवाय याच वर्षी १० मे २०२२ ला ट्विटर वर सत्यजित डे या व्यक्तीने देखील जुही चावलच्या या ट्विटचं स्क्रिन शॉट वापरून पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलल्यामुळे तिचे आभार मानले आहेत.


तर जाबांज खान पठाण यांनी हाच स्क्रिन शॉट २०१८ मध्ये शेअर केल्याचं आपल्याला पाहयला मिळतंय.

खरंच जुही चावला यांनी असं ट्विट केलं होतं का? तर हो जुही चावला य़ांनी असं ट्विट २१ ऑगस्ट रोजी पहाटे ७ वाजून १० मिनिटांनी केलं होतं. त्यांच्या या ट्विट वर १८०० प्रतिक्रीया आल्या होत्या. साडेचार हजार रिट्विट आणि साडे सहा हजार लाईक्स होत्या. पण त्यानंतर त्यांनी ते ट्विट डीलिट केलं होतं पण त्यांचं हे मुळ ट्विट आपण इथे अर्काइव्ह लिंक मध्ये पाहु शकता.


याशिवाय जुही चावला यांनी त्याच दिवशी आणखी एक ट्विट केलं होतं. त्यात त्या असं म्हणाल्या होत्या की "रुपयाला जर यापुढे टिकायचं असेल तर डॉलर ला राखी बांधून माझी रक्षा करा असं सांगावं लागेल तरच रूपयाची घसरण थांबेल."

आता या रुपयाच्या घसरणीवर बोलणारी जुही चावला काही एकटी अभिनेत्री नाहीये. तिच्या सोबतच त्यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील सरकारवर रूपयाच्या घसरणीमुळे निशाणा साधला होता. त्यांनी १ सप्टेंबर २०१३ ला "इंग्रजी शब्दकोशात एक नवीन शब्द जोडला गेला आहे. RUPEED ( ru - pee - d ), हे एक क्रियापद आहे. म्हणजे- खाली जाणे." असं म्हणत तेव्हाच्या मनमोहन सरकारवर टीका केली होती.



चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांनी देखील तत्कालीन पंतप्रधानांचे आभार मानत त्यांच्यावर टीका केली होती. "एका डॉलरचे मूल्य 60 रुपयांच्या पुढे गेले आहे. देशाला आपत्तीच्या दिशेने नेल्याबद्दल पंतप्रधान साहेबांचे आभार" असं अशोक पंडीत त्यावेळी म्हणाले होते.


तर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी देखील त्यावेळी केंद्रावर टीकास्त्र सोडलं होतं. "सर्व काही पडत आहे. रुपयाची किंमत आणि माणसाची किंमत. 'आम्ही त्या देशाचे आहोत ज्या देशात गंगा रडते'" असं म्हणत त्यांनी टीका केली होती.


तर प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील त्यावेळी केंद्र सरकारवर कठोर टीका केली होती. "तुमचा आनंद पेट्रोलच्या किमतीप्रमाणे वाढो, तुमचे संकट भारतीय रुपयाप्रमाणे घसरावे आणि तुमचे हृदय भारतातील भ्रष्टाचाराप्रमाणे आनंदाने भरून जावो." असं ट्वीट त्यांनी त्यावेळी केलं होतं.



तर या सगळ्य़ा कलाकारांचे ट्विट जे त्यांनी केले आहेत ते २०१४ च्या आधीचे ट्विट आहेत जेव्हा डॉलरची किंमत ६० रूपये झाली होती. त्यानंतर आज २०२२ मध्ये जेव्हा ८१ रूपये प्रति डॉलर इतकी घसरण झाली असताना हे कलाकार मात्र मुग गिळून गप्प आहेत.

नेमकं सत्य काय ?

व्हायरल झालेला जुही चावला हिच्या ट्विट चा स्क्रिनशॉट खरा आहे. आणि ते ट्विट देखील खरं असून २०१३ मधील आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात वगैरे हे ट्विट केल्याची माहिती धादांत खोटी आहे. कारण २०१३ मध्ये केंद्रात पंतप्रधान मनमोहन सिंह यांच सरकार होतं.

Updated : 26 Sep 2022 4:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top