Top
Home > Fact Check > मध्यप्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांच्या लसून उत्पादनाचा दावा खोटा

मध्यप्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांच्या लसून उत्पादनाचा दावा खोटा

मध्यप्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांच्या लसून उत्पादनाचा दावा खोटा
X

मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी नुकतेच ऑनलाईन एका कार्यक्रमात संबोधित केले होते. देवास कंपनीच्या प्रतिनिधींसोबत लसून उत्पादनाबाबत चर्चा केली होती. या चर्चेमधे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी कंपनी प्रतिनिधीला तुम्ही कोणते पीक घेता असा प्रश्न विचारला. त्यावर प्रतिनिधीने लसूण पीक घेतल्याचे सांगितले. त्यावर एका एकरासाठी किती खर्च येतो असं मु्ख्यमंत्र्यांनी विचारलं. त्यावर प्रतिनिधीनं एकरी १० हजार रुपये खर्च येत असल्याचं सांगितलं. लसणाचे उत्पन्न आल्यावर किती पैसे मिळतात या प्रश्नावर तीन एकरातून ३०० क्विंटल लसून मिळत असल्याचे सांगितलं. सर्व मिळून ३ लाख रुपये मिळतात असे त्यांनी सांगितले.

या विडीयो मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर भुपेन नावाच्या शेतकऱ्यानं इंदोरमधून एका शेतकऱ्यानं देवास कंपनीच्या प्रतिनिधीला फोन करुन लसणाच्या बियाण्याची मागणी केली. तीन एकरात ३०० क्विंटल उत्पादन देणारे लसून बीज मला द्याच अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर या टेलिफोन संवादात कंपनी प्रतिनिधीनं मी एकर नाही तर हेक्टर बोलल्याचा दावा केला. शेतकऱ्यांने वारंवार जाब विचारुन कंपनीचा प्रतिनिधी त्याच्या दाव्यावर ठाम राहीला.

मॅक्स महाराष्ट्रानं या दाव्याची तपासणी केंद्र सरकारच्या आयसीएआर संस्थेच्या कांदा आणि लसून संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांशी केली. यामधे सर्व दावे फोल ठरले आहे. एकरी लसून लागवडीच्या बियाण्याचा खर्च ३० हजार असल्याचे सांगितले. तीन एकरात ३०० क्विंटल लसून उत्पादन अशक्य असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री आणि कंपनी प्रतिनिधीची हेक्टर आणि एकरमधे गल्लत झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. मॅक्स महाराष्ट्राच्या पाहणीत मुख्यमंत्री शिवराजसिंह आणि देवास कंपनीचा दावा खोटा ठरला आहे.मध्यप्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांच्या लसून उत्पादनाचा दावा खोटा ठरला आहे.


Updated : 2020-10-10T10:08:19+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top