Top
Home > Fact Check > Fact Check | केरळमधील चर्चमधे 7 हजार कोटी सापडले का?

Fact Check | केरळमधील चर्चमधे 7 हजार कोटी सापडले का?

Fact Check it department raids believers church properties fact check

Fact Check | केरळमधील चर्चमधे 7 हजार कोटी सापडले का?
X

महीनाभरापासून फेसबुक, व्हाट्सअपसह अनेक सोशल मीडिया माध्यमांवर एक मेसेज व्हायरल होत आहेत. आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांना असा मेसेज आला असेल की केरळच्या चर्चमधे ७ हजार कोटीचं घबाड सापडलं परंतू मिडीया ही बातमी तुम्हाला दाखवणार नाही. मात्र आता याविषयी वेगळीच माहिती समोर आली आहे.

व्हायरल पोस्ट्स :

https://www.hindujagruti.org/news/129880.html

काय आहे प्रकरण:

५ नोव्हेंबर रोजी मेट्रोपॉलिटन आर्चबिशप अथनासियस योहान १ (के.पी. योहानन) यांच्या धार्मिक प्रतिष्ठान असलेल्या तिरुवल्ला-आधारित बेलिव्हरच्या ईस्टर्न चर्चच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापा टाकला. ही कारवाई सकाळी सुरू झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. केरळच्या या चर्चशी संबंधित असलेल्या अनेक व्यक्तींच्या कार्यालये आणि निवासस्थानावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. छापा टाकल्या गेलेल्या जागांपैकी तिरुवल्ला येथील चर्चचे मुख्यालय, चर्चद्वारे चालवले जाणारे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि निवासस्थानं होती.चर्च मुख्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमधून अधिका्यांनी ₹ 57 लाखांची बेहिशेबी रक्कम जप्त केली.धार्मिक प्रतिष्ठानच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित अनेक कागदपत्रे देखील हस्तगत केली आहेत.मॅक्स महाराष्ट्राच्या सखोल पाहणीत अधिकाऱ्यांनी कर चुकवेगीरी आणि अनधिकृत परकीय व्यवहारावरील माहीती मिळाल्यानंतर छापा टाकल्याचे सांगितले होते. स्वयंसेवी संस्थांमार्फत कोट्यवधी रुपये परकीय निधी मिळाल्याचा आरोप झाल्यानंतर चर्च केंद्र सरकारच्या रडारवर आली होती. अहवालानुसार 2015-16 वर्षात ₹2,397 कोटींची रोख गुंतवणूक केली होती, ज्यात नवीन परदेशी निधी, इतर स्थानिक स्रोतांकडून हस्तांतरण, मागील वर्षातील योगदान आणि त्यांचे व्याज यांचा समावेश होता. 2017 मध्ये, गृह मंत्रालयाने चर्च आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या तीन स्वयंसेवी संस्थांना परकीय निधी मिळण्यास मनाई केली होती.निष्कर्ष : केरळमधील एका चर्चवर आयकर विभागातील धाडसत्रात ७ हजार कोटीपेक्षा जास्त रुपये जप्त केल्याचा दावा मॅक्स महाराष्ट्राच्या तपासणीत खोटा ठरला आहे. या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणात सोशल मिडीया आणि मिडीयामधे धाडसत्रात मोठं घबाड मिळालं असून प्रसारमाध्यमं जाणीवपूर्व बातम्या देत नसल्याचं म्हटलं होतं. परंतू कारवाईदरम्यान फक्त ५७ लाख रुपये जप्त झाल्याचं स्पष्ट झालं आहे.


Updated : 17 Nov 2020 2:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top