Home > Fact Check > Fact Check : POCSO संदर्भातील भारत सरकारचं पत्रच खोटं ?

Fact Check : POCSO संदर्भातील भारत सरकारचं पत्रच खोटं ?

इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे. पण हे पत्र खरंय का? जाणून घेण्यासाठी वाचा फॅक्ट चेक.....

Fact Check : POCSO संदर्भातील भारत सरकारचं पत्रच खोटं ?
X

इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या नावाने सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे. त्यामध्ये पॉस्कोसंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे हे पत्र खरं आहे का? याविषयी चर्चा सुरु झाल्या. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्रने यासंदर्भात PIB च्या ट्विटर हँडलला भेट दिली. यामध्ये सत्य समोर आले.

इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या माध्यमातून व्हायरल होत असलेल्या पत्राची PIB ने चौकशी केली. त्यामध्ये इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या पत्रात करण्यात आलेले दावे खोटे असल्याचे समोर आले. तसेच यासंदर्भात PIB ने ट्वीट करून हे पत्र खोटे असल्याचे सांगितले आहे.

यामधये पीआयबीने म्हटलं आहे की, I4C च्या नावाने व्हायरल होणारे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच यामध्ये वापरकर्त्याने मांडलेले मुद्दे निव्वळ अफवा आहेत.

याबरोबरच भारत सरकारने अशा प्रकारचे कोणतेही पत्र उपस्थित केले नाही. त्यामुळे या पत्रावर कुणीही विश्वास ठेऊ नये, असंही पीआयबीने सांगितले आहे.

Updated : 14 Aug 2023 11:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top