Home > Fact Check > Fact Check : भारत-पाक तणाव, दिल्लीत मुस्लिमांची जाळपोळ ? खोटा दावा, जुना व्हिडिओ

Fact Check : भारत-पाक तणाव, दिल्लीत मुस्लिमांची जाळपोळ ? खोटा दावा, जुना व्हिडिओ

Fact Check : भारत-पाक तणाव, दिल्लीत मुस्लिमांची जाळपोळ ? खोटा दावा, जुना व्हिडिओ
X

जम्मू-काश्मीरच्या पहलागममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याविरोधात भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून एअरस्ट्राईकर करत पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी छावण्या उध्वस्त केल्या. त्यानंतर या तणावाचे पडसाद व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावरही दिसू लागले.

दरम्यान, पाकिस्तानमधील काही सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन एक व्हिडिओ एका दाव्यासह शेअर करण्यात आला. त्यामध्ये भारतीय मुस्लिमांनी दिल्लीत जाळपोळ करायला सुरुवात केल्याचा दावा करण्यात आला.

९ मे २०२५ रोजी पाकिस्तानी अभिनेता आणि कॉमेडियन, दिग्दर्शक मुस्तफा चौधरी याच्या फॅनपेजवरुन ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत हाच दावा करण्यात आलाय.

मुस्तफा चौधरीच्या फॅनपेज अकाऊंट वरून एक कॅम्पेन स्वरुपात हाच व्हिडिओ पुन्हा शेअर करत लिखित आवाहन करण्यात आलं की, “भावांनो, हा व्हिडिओ भारतात मोठ्या प्रमाणावर पसरवा, कारण आम्ही त्या घाबरट लोकांना अजून घाबरवू शकू”

फॅक्ट चेक

ऑल्ट न्यूज ने या दाव्याची पडताळणी करण्यासाठी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या की-फ्रेम ला रिवर्स इमेज सर्चमध्ये तपासलं. त्यानंतर NDTV इंडियाच्या युट्युब चॅनेलवर ३० एप्रिल २०२५ रोजी पब्लिश झालेली एक बातमी दिसली. या बातमीमध्ये व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचा समावेश आहे. या बातमीनुसार, दिल्लीत INA जवळच्या दिल्ली हाट बाजारामध्ये बुधवार, ३० एप्रिल २०२५ रोजी रात्री भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास ३० दुकानं जळाली होती.

इंडिया न्यूज ला दिल्लीच्या अग्निशमन विभागाचे सर्विस चेअरमन अतुल गर्ग यांनी सांगितलं की, दिल्ली हाट बाजार मध्ये आग लागल्याची माहिती अंदाजे नऊ वाजता मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं. या आगीत कुठल्याही प्रकारच्या जीवितहानी झाली नसल्याचं गर्ग यांनी सांगितलं होतं.

याचाच अर्थ, व्हायरल होणारा व्हिडिओ हा ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या एक आठवडा पूर्वीचा म्हणजे ३० एप्रिलचा असून दिल्ली हाट या प्रसिद्ध बाजारपेठेतल्या आगी दरम्यानचा आहे. याच आगीचा व्हिडिओ पाकिस्तानमधील काही सोशल मीडिया युजर्सकडून भारतात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं शेअर केला जातोय.

भारत सरकारच्या फॅक्ट चेक युनिटनं अर्थात पीआयबीनं देखील या व्हायरल केला जाणारा व्हिडिओ खोटा असल्याचं स्पष्ट केलंय.

https://www.altnews.in/hindi/old-and-unrelated-video-shared-communal-angle-misrepresented-amid-india-pakistan-tensions/

Updated : 11 May 2025 5:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top