Home > Fact Check > Fact Check : भारत-पाक तणाव : रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त झाल्याचे फोटो AI निर्मित

Fact Check : भारत-पाक तणाव : रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त झाल्याचे फोटो AI निर्मित

Fact Check : भारत-पाक तणाव : रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त झाल्याचे फोटो AI निर्मित
X

सध्या सोशल मीडियावर एका उध्वस्त स्टेडियमचे फोटो व्हायरल होत आहेत...भारत-पाकिस्तानच्या संघर्षा दरम्यानच हे फोटो शेअर केले जात आहेत...भारतानं पाकिस्तानवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उध्वस्त झाल्याच्या दाव्यासह हे फोटो शेअर केले जात आहेत...

X – युजर नागेंद्र पांडेय यानेही याच दाव्यासह फोटो शेअर करत लिहिलं की, “पाकिस्तान च्या रावळपिंडी स्टेडियमवर ड्रोन हल्ला झाला आणि धूरच धूर झालाय”

भाजप समर्थक अमिताभ चौधरी ने X- हँडलवरूनही याच दाव्यासह हे फोटो शेअर करण्यात आले. ऑल्ट न्यूजनं आर्टिकल लिहेपर्यंत या पोस्टला ७३ लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितलं होतं...

इंस्टाग्राम पेज ‘asgardiwana_official‘ ने देखील हेच फोटो शेअर करत दोन वेगवेगळ्या पोस्ट केल्या आहेत...

फॅक्ट चेक

ऑल्ट न्यूजने या व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी की-वर्ड सर्च केलं...त्यात टाइम्स ऑफ इंडिया चा व्हिडिओ रिपोर्ट आढळला. या रिपोर्टनुसार कथित भारतीय ड्रोन हा ८ मे रोजी सामन्याच्या काही तास आधी रावळपिंडी स्टेडियमवर पडला, त्यानंतर स्टेडियमचा एक भाग उध्वस्त झाला...या रिपोर्टमध्ये काही दुकानं आणि छोट्या हॉटेल्सच्या खिडक्या तुटलेल्या दिसत आहेत...

याच पडताळणी दरम्यान अनेक न्यूज रिपोर्ट तपासण्यात आले...मात्र, स्टेडियम उध्वस्त झालेली कुठलीही बातमी आढळली नाही...

ऑल्ट न्यूजनं रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम चा फोटो आणि व्हायरल फोटोची तुलना केली...दोन्ही फोटोत स्पष्ट फरक दिसतोय की, रावळपिंडी स्टेडियम मध्ये प्रेक्षकांना बसण्यासाठी केवळ दोन टियर्स आहेत...तर दुसरीकडे व्हायरल होत असलेल्या फोटोमधील स्टेडियममध्ये तीन वेगळे टियर्स आहेत...व्हायरल फोटोतील स्टेडियम क्षेत्रफळानुसार छोटं आहे...तर रावळपिंडी स्टेडियम प्रत्यक्षात खुप मोठं आहे... या सोबतच स्टेडियमची रचनेतही फरक आहे...

व्हायरल होणाऱ्या फोटोचं निरीक्षण केल्यानंतर दिसतंय की, भिंत आणि जमीन एकत्र जोडल्याचं दिसतं...याशिवाय आसपासची झाडं देखील कृत्रिम वाटतात...AI निर्मित फोटोंमध्ये अशी कृत्रिम झाडं दिसतात...

व्हायरल होणाऱ्या फोटोला वेगवेगळ्या AI डिटेक्टिंग टूल्सचा वापर करुन तपासण्यात आलं...या टुल्सनं देखील व्हायरल होणारा फोटो हा AI निर्मित असल्याचं स्पष्ट केलं... sightengine या टूलनं देखील हा फोटो ९६ टक्के AI निर्मित असल्याची शक्यता वर्तवलीय...

आणखी एक टूल decopy.ai ने देखील व्हायरल होणारा फोटो हा ९९.९८ टक्के AI निर्मित असल्याचं म्हटलंय...

एकूणच काय तर व्हायरल फोटो हा AI निर्मित आहे... हाच फोटो रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त झाल्याचा दावा करत शेअर करण्यात येतोय...

https://www.altnews.in/hindi/india-pakistan-conflict-ai-generated-image-shared-to-show-destruction-of-rawalpindi-stadium/

Updated : 16 May 2025 8:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top