Home > Fact Check > राजीव गांधी यांना वाचवताना SPG ने भिकाऱ्याला गोळी मारली होती का?

राजीव गांधी यांना वाचवताना SPG ने भिकाऱ्याला गोळी मारली होती का?

राजीव गांधी यांना वाचवताना SPG ने भिकाऱ्याला गोळी मारली होती का?
X

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 1986 साली राजीव गांधी राजघाट यात्रेवर असल्याचे असोसिएटेड प्रेसच्या कव्हरेजचे फुटेज आहे. त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, राजीव गांधी यांच्या दौऱ्यावेळी SPG (Special Protection Group) ने झाडांच्या पाठीमागे संशयास्पद हालचाल दिसल्याने तात्काळ गोळी मारली. ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र, ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता तो व्यक्ती एक भिकारी होता, असे म्हटले आहे.

भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नीरज जैन यांनी ट्वीट करत याच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला आहे.


या ट्वीटमध्ये केलेला दावा फेसबुक आणि ट्वीटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


काय आहे सत्य?

गुगलवर की-वर्ड सर्च केल्यानंतर एसोसिएटेड प्रेसच्या अर्काइव्जच्या युट्यूब चॅनलवर तेव्हाचा व्हिडीओ मिळाला. त्या व्हिडीओच्या डिस्क्रीप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 1986 मध्ये दिवंगत महात्मा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राजीव गांधी राजघाट येथे गेले होते. तेव्हा झाडाच्या आड लपलेल्या एका शीख व्यक्तीने राजीव गांधी यांनी गोळी झाडली. तेव्हा त्या व्यक्तीला पकडले गेले. तर राजीव गांधी यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नव्हती.

3 ऑक्टोबर 1986 रोजी द वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार या बातमीची सत्यता तपासण्यात आली. त्यामध्ये असे म्हटले होते की, आरोपीने गावठी पिस्तुलातून गोळी झाडली होती. या घटनेत 6 लोक किरकोळ जखमी झाले होते. आरोपी व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले. तेव्हा त्या व्यक्तीने आपले नाव मनमोहन देसाई सांगितले होते. मात्र, त्याने अनेक वेळा आपले नाव बदल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. या बरोबरच लॉस एंजिलिस टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अशाच प्रकारची माहिती देण्यात आली होती. तर लॉस एंजिलिस टाइम्सने सांगितले आहे की, शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिस प्रवक्त्याने गोळी चालवणारा व्यक्ती शीख कट्टरपंथीय नसल्याचे विधान केले होते.

राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रयत्नानंतर एक महिन्यानंतर इंडिया टुडेने एक रिपोर्ट दिला होता. त्यामध्ये त्या पुर्ण दिवसाचे पुर्ण विवरण देण्यात आले आहे. इंडिया टुडेने त्या व्यक्तीची ओळख करमजीत सिंह अशी सांगितली होती.

काय आहे सत्य?

वरील सर्व गोष्टी पाहिल्यानंतर जेव्हा माजी पंतप्रधान राजीव गांधी, महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी राजघाट येथे जात होते. तेव्हा एका बंदुकधारी व्यक्तीने त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यामुळे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सुरक्षारक्षकांनी झाडाच्या मागे लपलेल्या एका भिकाऱ्यावर गोळी झाडल्याचा व्हिडीओ खोटा आहे. त्यामुळे खोट्या दाव्यासह फेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर त्यावेळी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला नव्हता तर 6 लोक किरकोळ जखमी झाले होते.


Updated : 20 Aug 2022 3:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top