Top
Home > Fact Check > Fact Check: ई-कचऱ्यापासून ड्रोन बनवणारा प्रताप, DRDO मधील नेमणुकीबाबत काय आहे सत्य?

Fact Check: ई-कचऱ्यापासून ड्रोन बनवणारा प्रताप, DRDO मधील नेमणुकीबाबत काय आहे सत्य?

Fact Check: ई-कचऱ्यापासून ड्रोन बनवणारा प्रताप, DRDO मधील नेमणुकीबाबत काय आहे सत्य?
X

आपल्या देशात निरनिराळ्या कल्पक युक्त्या लढवून प्रयोग करणाऱ्यांची संख्या कमी नाही. आतापर्यंत अनेकांनी अशा कल्पना लढवून अनेक शोध लावले आहेत. कर्नाटक राज्यातील एनएम प्रताप यानेही अशीच आयडियाची कल्पना लढवली.

कोणतंही प्रशिक्षण आणि माहिती नसताना केवळ जिज्ञासेतून वयाच्या १६ व्या वर्षी त्याने कचऱ्यापासून ड्रोनची निर्मिती केली. त्याच्या कामगिरीबद्दल देशभरातून त्याचं कौतुक झालं. त्याने बनवलेल्या ड्रोनला आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

आता प्रतापबद्दल काही चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील काही पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची नेमणूक DRDO (संरक्षण संशोधन विकास संस्था) मध्ये केल्याचा दावा करण्यात येत आहे. हिंदी, इंग्रजी, कन्नड या भाषांमध्ये ट्विटर, फेसबुकसारख्या माध्यमांमध्ये या आशयाच्या अनेक पोस्ट्स आणि ग्राफिक्स व्हायरल आहेत.

व्हायरल पोस्ट्स:

हे आहे सत्य:

या पोस्ट्स व्हायरल झाल्यानंतर फॅक्टचेकिंग वेबसाईट 'अल्टन्यूज'ने प्रतापशी संपर्क साधला आणि या दाव्यातील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रतापने सांगितलं की, DRDO च्या नियुक्त्या पंतप्रधान कार्यालायकडून केल्या जात नाहीत. त्याला पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात कसलाही मेल किंवा अधिकृत पत्र आलेलं नाही.

डिसेंबर २०१९ मध्ये DRDO च्या एका प्रोजेक्टसाठी बंगळुरूस्थित कंपनी काम करत होती. या कंपनीसाठी प्रताप काम करत होता. त्यामुळे प्रतापची DRDO साठी नियुक्ती झाली अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याचं रूपांतर आता आणि सोशल मीडियावरील अफवांमध्ये झालं.

DRDO साठी प्रतापची नियुक्ती करण्यात आलेली नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी शिफारस केली असल्याची माहिती पूर्णपणे तथ्यहीन आहे.

कोण आहे प्रताप?

कर्नाटक येथील मैसूरजवळील मंड्या जिल्ह्यात एन. एम. प्रतापचा जन्म झाला. त्याचे वडील पेशाने शेतकरी आहेत. शालेय शिक्षण सुरु असताना प्रतापने ई-कचऱ्यामधून ड्रोन बनवण्याचा प्रयत्न सुरु केला. जवळपास ८० प्रयत्न फोल ठरल्यानंतर अखेर ड्रोन तयार करण्यात प्रताप यशस्वी ठरला. आयआयटी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत त्याच्या या मॉडेलला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

त्यानंतर २०१७ मध्ये प्रतापने जपानमध्ये तब्बल १२७ देशांचा सहभाग असलेल्या प्रदर्शनात भाग घेतला. याठिकाणी त्याला प्रथम क्रमांक मिळाला आणि १० हजार यूएस डॉलर इतक्या घसघशीत रकमेचे बक्षीस मिळाले. आयआयएससी, आयआयटी मुंबईसारख्या नामांकित संस्थांकडून त्याला व्याख्यान देण्यासाठी बोलावण्यात आलंय.

प्रतापने २०१८ साली, जर्मनी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ड्रोन एक्स्पोमध्ये अल्बर्ट आइन्स्टाइन इनोव्हेशन गोल्ड मेडल पटकावले आहे. अलीकडेच कर्नाटकमध्ये आलेल्या महापुरात अडकलेल्या हजारो लोकांना प्रतापने तयार केलेल्या ६०० ड्रोन्सच्या साहाय्याने अन्न आणि औषधं पाठवण्यात आली होती.

Updated : 10 July 2020 3:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top