Fact Checke : महुआ मोईत्रांनी संसदेत ई-सिगारेट ओढली का ? ११ डिसेंबरला त्या दिल्लीतच नव्हत्या
Fact Check: Did Mahua Moitra smoke an e-cigarette in Parliament? She was not even in Delhi on December 11.
X
यावर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये भाजपचे खासदार अनुराग ठाकूर हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तृणमुल काँग्रेसच्या एका खासदारानं संसदेच्या परिसरात ई-सिगारेट ओढल्याची तक्रार केली. त्यानंतर उजव्या विचारसरणीच्या सोशल मीडिया युजर्स आणि इन्फ्लुएन्सर्स ने दावा केला की, TMC च्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित ही चर्चा आहे. मोईत्रा या पश्चिम बंगाल मधील कृष्णानगर लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत.
विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, अनुराग ठाकूर यांनी ई-सिगारेट ओढणाऱ्या खासदाराचं नावचं सांगितलं नाही, ज्यांच्याविरोधात ते लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करत होते.
भाजप समर्थक इन्फ्लुएन्सर शशांक सिंह ( जो X अकाउंट Facts (@BefittingFacts) ने व्हिडिओ क्लिप शेअर करत दावा केला की, TMC च्या खासदार महुआ मोईत्रा संसदेच्या आवारात ई-सिगारेट ओढत होत्या.
TMC MP Mahua Moitra smoking e-cigarette inside Parliament.
pic.twitter.com/sy0JGp2l1D
— Facts (@BefittingFacts) December 11, २०२५
आणखी एका X अकाऊंट, शुभम (@subhsays) ने देखील हाच व्हिडिओ शेअर करत आरोप केलाय की TMC च्या खासदार महुआ मोईत्रा “ई सिगरेट पीते हुए रंगे हाथों पकडी गई”
या पोस्टला सुमारे १ लाख लोकांनी पाहिले होते.
डिजिटल मीडिया आउटलेट द तत्व
उजव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या व्हॉईस ऑफ हिंदूज (@Warlock_Shubh) ने देखील दावा केला की, महुआ मोईत्रा संसद परिसरात ई-सिगारेट ओढतांना रंगेहाथ सापडल्या.
या पोस्टला अंदाजे ५ लाख लोकांनी पाहिलंय.
डिजिटल मीडिया आऊटलेट द तत्त्व (@thetatvaindia) ने देखील हाच दावा केला होता.
WATCH | TMC MP Mahua Moitra seen vaping inside Parliament despite government ban on e-cigarettes. pic.twitter.com/A32j30v89a
— The Tatva (@thetatvaindia) December 11, 2025
उजव्या विचारसणीचा प्रभाव असलेली प्रोपोगेंडा वेबसाईट ‘द जयपूर डायलॉग्ज’ ने X पोस्ट वरील या सर्व प्रकरणावर आधारित एक लेख प्रकाशित केला. त्या आर्टिकलच्या हेडलाईनमध्ये “क्या महुआ मोईत्रा संसद में ई-सिगरेट पी रही थीं ? ” मात्र, प्रत्यक्षात या लेखामध्ये महुआ मोईत्रा ई-सिगारेट ओढत होत्या की नाही ? या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं नाही. त्यात महुआ मोईत्रा चा उल्लेख ‘रोलेक्स कुमारी’ असा करण्यात आला होता.
याशिवाय दुसऱ्या सोशल मीडिया युजर्स नी देखील खासदार अनुराग ठाकूर यांचीच व्हिडिओ क्लिप शेअर केलीय. किंवा महुआ मोईत्रा यांची सिगारेट ओढतांनाचे जुने फोटो याच दाव्यासह शेअर केले.
सोशल मीडिया युजर्स च्या आणखी एका ग्रुपनेही अनुराग ठाकूर यांच्या हवाल्यानं हाच दावा आपल्या पोस्टमध्ये केलाय.
फॅक्ट चेक
ऑल्ट न्यूज ने अनुराग ठाकूर यांनी लोकसभा अध्यक्षांकडे दिलेल्या तक्रार केलेल्या पत्राची शहानिशा केली. या पत्रात अनुराग ठाकूर यांनी आरोप केला की, ११ डिसेंबर रोजी, “ लोकसभा चेंबरमध्ये ई-सिगारेट च्या वापर करण्यात आलाय, त्यामुळं संसदीय नियम आणि कायद्याचं उल्लंघन झालंय. ठाकूर यांनी पत्रात नमूद केलं की, अधिवेशनाच्या दरम्यानही सभागृहात अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराला इलेक्ट्रॉनिक सिगारेट ओढतांना पाहिलं गेलंय”.
या पत्रात कुणाचंही नाव लिहिण्यात आलेलं नाही. ना महुआ मोईत्रा किंवा इतर कुठल्याही खासदाराचं नाव त्यात आहे.
११ डिसेंबरला महुआ मोईत्रा दिल्लीतच नव्हत्या
ऑल्ट न्यूज च्या पडताळणीमध्ये तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा या पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातल्या कृष्णानगर इथं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत “पथश्री-रास्ताश्री ४” या प्रकल्पाच्या औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या.
पश्चिम बंगालच्या स्थानिक न्यूज पोर्टल बांग्ला हंट ने ११ डिसेंबरच्या कृष्णानगर इथल्या या कार्यक्रमाचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं होतं. याच व्हिडिओमध्ये प्रकल्प उद्घाटनाच्या कार्यक्रमात खासदार महुआ मोईत्रा या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत स्पष्टपणे उपस्थित असल्याचं दिसतं आहे.
या कार्यक्रमाला स्थानिक माध्यमांनीही कव्हरेज दिलं होतं. द वॉल ने ११ डिसेंबर रोजी एक बातमी दिली होती. त्यात महुआ मोईत्रा, ममता बॅनर्जी आणि सरकारी अधिकारी दिसत होते.
महुआ मोईत्रा यांनी त्याच दिवशी बंगाल मध्ये SIR च्या प्रक्रियेविरोधात ममता बॅनर्जी यांच्यासोबत एका सार्वजनिक कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे फोटोही मोईत्रा यांनी आपल्या फेसबूक पेजवर पोस्ट केले होते.
तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी ऑल्ट न्यूजला माहिती दिली की, १० ते १२ डिसेंबर या काळात खासदार महुआ मोईत्रा या पश्चिम बंगालमध्येच होत्या. १० डिसेंबर रोजी संध्याकाळच्या विमानानं त्या दिल्लीतून कोलकाता इथं गेल्या. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी दुपारच्या विमानानं त्या पुन्हा दिल्लीला परतल्या.
शेवटी, ११ डिसेंबर रोजी महुआ मोईत्रा संसदेतच उपस्थित नव्हत्या. उलट त्या पश्चिम बंगालच्या कृष्णानगर इथं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत राज्य सरकारच्या एका प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात उपस्थित होत्या. त्यामुळं ११ डिसेंबर रोजी महुआ मोईत्रा या संसदेत ई-सिगारेट ओढत होत्या, हा दावाच फोल ठरलाय. याशिवाय भाजप खासदार अनुराग ठाकूर ने आपल्या तोंडी किंवा लेखी आरोपातही महुआ मोईत्रा यांचा उल्लेख केला नव्हता.






