Home > Fact Check > Fact Check | BJP चा भारतातल्या २२० कोटी लोकांना मोफत कोविड लस दिल्याचा दावा खोटा

Fact Check | BJP चा भारतातल्या २२० कोटी लोकांना मोफत कोविड लस दिल्याचा दावा खोटा

Fact Check | BJP चा भारतातल्या २२० कोटी लोकांना मोफत कोविड लस दिल्याचा दावा खोटा
X

भारतीय जनता पार्टी ने एक ट्विट करत दावा केला की, भारतातील २२० कोटी लोकांना मोफत कोविड लस दिल्याचा दावा केला. एक ग्राफिक ट्विट करत भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिण्यात आलं की, “ कधी विचार केला होता का ? २२० कोटी लोकांना मोफत कोरोनाची लस दिली जाईल”. नंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं.

बारमेड इथले भाजपचे खासदार आणि मंत्री कैलाश चौधरी, राजसमंद इथले भाजपच्या खासदार दिव्य कुमारी, उत्तराखंड चे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमेश पोखरियाल निशांक बलिया इथले भाजप खासदार वीरेंद्र सिंह, दरभंगा इथले भाजपा खासदार गोपाल ठाकूर, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि कटिहार चे भाजपा आमदार तारकिशोर प्रसाद यांनीही याच दाव्याची पोस्ट फेसबूक पोस्ट केली होती.




मेटा च्या सोशल मॉनिटरिंग टूल क्राऊडटैंगल चा स्क्रीन रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. ज्यातून स्पष्ट होतं की, भाजपशी संबंधित कित्येक नेते, आमदार आणि मंत्र्यांनी याच दाव्याला फेसबूकवर पोस्ट केलं होतं.

भारतीय जनता पार्टी द्वारा करण्यात आलेला हा दावा पहिल्याच नजरेत खोटा वाटतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताची लोकसंख्याच मुळात २२० कोटी नाहीये. नुकताच UNFPA State of World Population Report 2023 च्या आकडेवारीचा संदर्भ देत द इंडियन एक्सप्रेस ने २० एप्रिल २०२३ एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार भारत चीन ला मागे टाकत जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून पहिल्या क्रमाकांचा देश होण्याची शक्यता आहे. त्या बातमीनुसार या वर्षाच्या मध्यापर्यंत भारताची लोकसंख्या १४२ कोटी ८६ लाख इतकी प्रचंड होईल, असा अंदाज आहे. सध्या चीन ची लोकसंख्या ही १४२ कोटी ५७ लाख इतकी आहे.

भारत सरकारच्या कोविड लसीकरणाशी संबंधित असलेल्या CoWn या वेबसाईटवर जाऊन पडताळणी केल्यानंतर ऑल्ट न्यूज च्या निदर्शनास आलं की, एकूण लसीकरणाची संख्या ही २२० कोटी आहे. म्हणजेच, आतापर्यंत १०२ कोटी ७४ लाख १० हजार ८७२ लोकांनी कोविडच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरीकडे ९५ कोटी १९ लाख ७७ हजार ९७९ लोकांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. आणि २२ कोटी ७३ लाख १६ हजार ९०८ लोकांनी कोविडचा बूस्टर/प्रीकॉशन डोस घेतलाय. या तीनही आकड्यांना एकत्र केल्यानंतर जो आकडा येतोय तो आहे २२० कोटी ६७ लाख ५ हजार ७५९ इतका.





आता यातील आकडेवारीची बेरीज-वजाबाकी केली तर लक्षात येईल की एकूण किती लोकांना कोविडची लस देण्यात आलीय. ज्या लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला, साहजिकच त्यांनी पहिला डोसही घेतला आहे. आणि ज्या लोकांनी बूस्टर/प्रीकॉशन डोस घेतला त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यामुळं एकूण लसीच्या आकड्यांची तुलना ही लोकसंख्येशी होऊ शकत नाही. कारण ज्यांनी बूस्टर/प्रीकॉशन डोस घेतला आहे त्यांची संख्या ही तीन आकडी आहे. आणि ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे, त्यांची आकडेवारी दोन आकड्यांमध्ये आहे.

आता कोविड लस ही १०२ कोटी ७४ लाख १० हजार ८७२ लोकांपर्यंत पोहोचलीय. त्यात ९५ कोटी १९ लाख ७७ हजार ९७९ लोकांनी लसीचा दुसरा डोस आणि २२ कोटी ७३ लाख १६ हजार ९०८ लोकांपर्यंत बूस्टर/प्रीकॉशन डोस पोहोचलाय.

सर्व लोकांना मोफत लसीचा दावाही खोटा

सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे Guidance note for COWIN 2.0 या मार्गदर्शक सूचनांच्या पान नंबर ५ वर अगदी स्पष्टपणे लिहिलंय की, सरकारी रूग्णालयांमध्ये ही लस मोफत दिली जाईल आणि खासगी रूग्णालयांमध्ये भारत सरकारकडून वेळोवेळी ठरवून दिलेल्या दरानुसार पैसे देऊन ही लस उपलब्ध करून दिली जाईल.




२७ फेब्रुवारी २०२१ रोजी भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं होतं. त्यात स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की, “ सीवीसी च्या रूपात सक्रिय असलेल्या खासगी रूग्णालयांनी एका लसीसाठी प्रत्येक व्यक्तीकडून जास्तीत-जास्त २५० रूपये शुल्क आकारावेत. या राष्ट्रीय स्तरावरील लसीकरण मोहीमेला आता १ मार्च २०२१ पासून खाली दिलेल्या वयोगटांपर्यंत जलद गतीनं पोहोचवायचं आहे.

1) ६० वर्षांवरील सर्व नागरिक आणि

2) निर्देशित सह रूग्णांसोबत ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सर्व नागरिक


केरळ आणि आसाम सरकारच्या वेबसाईटवर भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे ८ जून २०२१ रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित राज्यांना पाठवलेली मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहे. त्यात स्पष्टपणे लिहिण्यात आलंय की, “ ८ जून २०२१ रोजी राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहीमेच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार, खासगी रूग्णालयांसाठी कोविड लसीची किंमत ही लस निर्माता कंपन्या घोषित करतील. खासगी रूग्णालयं सेवा शुल्काच्या स्वरूपात जास्तीत जास्त १५० रूपये प्रति डोस शुल्क आकारू शकतात. या सूचनेनुसार खासगी सीवीसी (कोविड वॅक्सिनेशन सेंटर) द्वारा GST आणि सेवा शुल्क मिळून कोविशिल्ड लसी साठी जास्तीत जास्त ७८० रूपये शुल्क आकारू शकतं. कोवॅक्सिन लसी साठी १ हजार ४१० आणि स्पुतनिक वी या लसीसाठी १ हजार १४५ शुल्क आकारू शकतं.




वेळोवेळी या मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल होत राहिले. ९ एप्रिल २०२२ रोजी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला आणि भारत बायोटेक च्या संस्थापक सुचित्रा एला यांनी ट्विट करून माहिती माहिती दिली की, बूस्टर/प्रीकॉशन डोस च्या मुद्द्यावर भारत सरकार सोबत चर्चा केल्यानंतर खासगी रूग्णालयांसाठी कोविशील्ड लसीचा दर हा ६०० रूपयांनी कमी करून २२५ रूपये प्रति डोस आणि कोवॅक्सिन चा दर हा १२०० रूपयांवरून २२५ रूपये प्रति डोस करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं १० एप्रिल २०२२ पासून खासगी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्वांसाठी कोविड १९ लसीचा बूस्टर/प्रीकॉशन डोस उपलब्ध असल्याची घोषणा केली होती. कारण की, खासगी लसीकरण केंद्रांवर लसीसाठी लोकांना पैसे मोजावे लागले होते. त्यामुळं भारत सरकारनं सर्वांना मोफत लसीकरण केल्याचा भारतीय जनता पार्टी नं केलेला दावा खोटा सिद्ध होतोय.




एकूणच, कोविडची पहिली लस सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहोचली तो आकडा हा १०३ कोटी आहे. भाजपा आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी २२० कोटी लोकांना कोविडची लस देण्यात आल्याचा खोटा आणि संभ्रम निर्माण करणारा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात २२० कोटींची संख्या ही लोकांची नसून देण्यात आलेल्या डोसची आहे. ज्यात पहिला, दूसरा आणि बूस्टर/प्रीकॉशन या तीनही डोसच्या संख्यांचा समावेश आहे. यासोबतच भाजपच्या सर्वांनी मोफत लसीकरण केल्याचा खोटा दावा केला होता. प्रत्यक्षात, वेळोवेळी लसीकऱणाच्या धोरणात बदल होत राहिले आणि खासगी रूग्णालयांनी लसीकरणासाठी शुल्क आकारलं होतं.

Updated : 29 Jun 2023 8:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top