Home > Fact Check > Fact Check : ‘ऑपरेशन सिंदूर’ वर ऐश्वर्या रॉयनं पंतप्रधान मोदींना विचारले प्रश्न ? डीपफेक व्हिडिओ व्हायरल

Fact Check : ‘ऑपरेशन सिंदूर’ वर ऐश्वर्या रॉयनं पंतप्रधान मोदींना विचारले प्रश्न ? डीपफेक व्हिडिओ व्हायरल

Fact Check: Aishwarya Rai asked PM Modi a question on 'Operation Sindoor'? Deepfake video goes viral

Fact Check : ‘ऑपरेशन सिंदूर’ वर ऐश्वर्या रॉयनं पंतप्रधान मोदींना विचारले प्रश्न ? डीपफेक व्हिडिओ व्हायरल
X

सोशल मीडियावर अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन चा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होतोय. यामध्ये एका कथित कार्यक्रमात ऐश्वर्या रॉय ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताचं जे नुकसान झालं त्यासंदर्भात प्रश्न विचारतेय. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या विचारते, “ मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारु इच्छिते की, आपण पाकिस्तानसोबत झालेल्या हल्ल्यात सहा जेट विमानं का गमावली ? पाकिस्तानसोबत लढतांना आपण चार राफेल लढाऊ विमानं का गमावली ? आपण पाकिस्ताशी लढतांना दोन S-400 सिस्टम का गमावली ? ३०० सैनिकांना आपण का गमावलं ? कश्मीर आणि राजस्थान च्या सीमेलगतचा बराच मोठा भूभाग हा पाकिस्तानकडे कसा जाऊ दिला ? पंतप्रधान जी, मला माहितीये की, चित्रपट क्षेत्र हे राजकारणात सहभागी नसतं...मात्र, हे असं काही आहे ज्याची माहिती देश जाणून घेऊ इच्छितो, जी तुम्हांला आम्हाला सांगावीच लागेल”.

X- हैंडल @Rameshspeech वरुन हा व्हिडिओ ब्रेकिंग न्यूज म्हणून शेअर करण्यात आला. यूजर ने लिहिलंय, “ भारतीय माध्यमं आता ही व्हिडिओ क्लिप डिलीट करण्यासाठी मजबूर होतोय. ऐश्वर्या रॉय ने पुट्टपर्थी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही थेट प्रश्न विचारले आहेत. पत्रकार संजीव शुक्ला यांनी ही व्हिडिओ क्लिप मीडियाच्या एका ग्रुपमध्ये शेअर केलीय”

पाकिस्तानी X-हैंडल @InsiderWB वरुन देखील याच दाव्यासह हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.




या हैंडलद्वारे शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलंय. ऑल्ट न्यूजनं X- हैंडल @InsiderWB या युजरला अनेक वेळा AI द्वारे तयार केलेले व्हिडिओ आणि चुकीची माहिती देतांना पकडलेलं आहे.

हाच व्हिडिओ X-हैंडल सहीत इंस्टाग्रामवरही याच दाव्यासह व्हायरल करण्यात आलेला आहे.




फॅक्ट चेक

ऑल्ट न्यूज नं या व्हिडिओची सखोल चौकशी केली. त्यामध्ये DD News च्या लोगोवर Asian News International (ANI) लाइव्ह असा लोगो लावलेला आहे. ऑल्ट न्यूजनं या व्हायरल व्हिडिओमधल्या काही की-फ्रेम ला गुगल रिवर्स इमेजमध्ये तपासून पाहिलं. त्यात ANI न्यूज़ च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर १९ नोव्हेंबर २०२५ रोजी एकूण ८ मिनिटांचा मूळ व्हिडिओ आढळला. या व्हिडिओची हेडलाईन होती, “ अभिनेत्री ऐश्वर्या रॉय पंतप्रधान मोदींसोबत आंध्रप्रदेशमधील श्री सत्यसाईबाबा शताब्दी समारंभात सहभागी झाली”. ऑल्ट न्यूजनं हा संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक बघितला. या संपूर्ण व्हिडिओमध्ये ऐश्वर्या रॉय ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना असे प्रश्न विचारतांना दिसली नाही.


यापुढे जाऊन ऑल्ट न्यूजनं ३१ ऑक्टोबर ला DD News च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर आंध्रप्रदेशमधील पुट्टपर्थी मध्ये श्री सत्य साईबाबा यांच्या जन्म शताब्दी समारंभाच्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या व्हिडिओचीही पडताळणी केली. या व्हिडिओमध्ये देखील ऑल्ट न्यूजला ऐश्वर्या रॉयचा प्रश्न विचारणारा व्हायरल व्हिडिओ दिसला नाही.


व्हायरल व्हिडिओमधील आवाजही ऑल्ट न्यूजनं लक्षपूर्वक ऐकला. त्यातही तिच्या मूळ आवाजापेक्षा व्हायरल व्हिडिओमधला आवाज वेगळा असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर AI डिडेक्टर टूलच्या माध्यमातून व्हायरल व्हिडिओतल्या आवाजाची पडताळणी करण्यात आली. त्यात व्हायरल व्हिडिओमधील आवाज हा डीपफेक असल्याचं निष्पन्न झालं.




एकूणच काय तर १९ नोव्हेंबर ला आंध्र प्रदेश इथल्या पुट्टपर्थी इथं आयोजित श्री सत्य साईबाबा यांच्या शताब्दी वर्षाच्या समारंभा दरम्यान ऐश्वर्या रॉयनं केलेल्या भाषणामध्ये छेडछाड करुन तिच्या आवाजाला AI टूलच्या माध्यमातून बदलण्यात आलं. त्यातून ऐश्वर्या रॉय हिनं पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारल्याचं दाखवण्यात आलंय... मात्र, प्रत्यक्षात या संपूर्ण समारंभात ऐश्वर्या रॉयनं ऑपरेशन सिंदूर संदर्भात पंतप्रधान मोदींना कुठलाही प्रश्न विचारला नाही. सोशल मीडियावर केला जाणारा दावा खोटा आहे.

Updated : 1 Dec 2025 6:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top