Home > Fact Check > पंडीत नेहरु आरएसएसच्या शाखेत जात होते का?

पंडीत नेहरु आरएसएसच्या शाखेत जात होते का?

पंडीत नेहरु आरएसएसच्या शाखेत जात होते का?
X

सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान काँग्रेसने एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आरएसएस ला टार्गेट केलं आहे.


काँग्रेसच्या या ट्विटला उत्तर म्हणून भाजपच्या हिमंत बिस्वा शर्मा यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांच्या ट्वीट मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा शॉर्ट पँट आणि आखूड बाह्याचा शर्ट घातलेला गणवेश परिधान केलेला एक फोटो शेअर केला गेला आहे. या फोटोमधील गणवेश आणि आरएसएस चा गणवेश यामध्ये बऱ्यापैकी साम्य असल्याचं दिसतं आहे.


काही लोक हा फोटो आरएसएसशी संबंधीत असल्याचा दावा देखील करत आहे. नेहरूंचा हा फोटो पाहून तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की नेहरू आरएसएसच्या शाखेत जात होते.


पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे याच गणवेशातील फोटो व्हायरल होत आहेत...


काय आहे व्हायरल फोटोचं सत्य? (What is reality)

या व्हायरल झालेल्या फोटोची सत्यता तपासण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्च इमेजचा वापर केला. यावेळी आम्हाला याच गणवेशातील नेहरू यांचे अनेक फोटो सापडले..


त्यामुळे फोटोमधील व्यक्ती ही पंडित जवाहरलाल नेहरूच असल्याची खात्री पटली. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू आरएसएस शाखेत जात असल्याच्या दाव्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या संदर्भात आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नाही.

मात्र, पंडीत जवाहरलाल नेहरू यांना सेवा दलाने सलामी दिल्याचा एक फोटो ट्वीटर आढळला.


मिळालेल्या माहितीनुसार आम्ही इंटरनेटवर Pandit Jawaharlal Nehru guard of Honor congress seva dal हे की वर्ड सर्च केले.

त्यानंतर आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाचा जुना फोटो सापडला.






यावरून हा फोटो सेवा दलाचं असल्याचं स्पष्ट झालं.

आरएसएस आणि सेवा देलाच्या फोटोत काय फरक आहे?

आरएसएसचा गणवेश टोपी,चामड्याचा बेल्ट आणि लांब काठी असल्याचं आरएसएस च्या वेबसाइटवरून लक्षात येतं. त्यावेळच्या आरएसएसच्या गणवेशामध्ये काळया रंगाची टोपी होती. मात्र. पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी सफेद रंगाची टोपी घातल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे व्हायरल फोटो मधील पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परिधान केलेल्या गणवेशाचा आरएसएसशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट होतं. तसेच, नेहरूंचे या गणवेशातील अनेक फोटो इंटरनेटवर पाहायला मिळतात, त्या फोटोनुसार हा गणवेश हा काँग्रेस सेवादलाचा असल्याचं समजतं. काँग्रेस सेवा दलाचा इतिहास आरएसएस पेक्षाही जुना आहे. स्वतः पंडीत जवाहरलाल या काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष राहिलेले आहेत.

एकंदरी, व्हायरल होत असलेला फोटो हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे. मात्र, फोटो सोबत पंडीत जवाहरलाल नेहरू आरएसएसच्या शाखेत जात असल्याचा दावा खोटा आहे.

Updated : 20 Sep 2022 6:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top