Home > Fact Check > Fact Check: मनीष सिसोदिया यांची अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका? काय आहे सत्य?

Fact Check: मनीष सिसोदिया यांची अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका? काय आहे सत्य?

Fact Check: मनीष सिसोदिया यांची अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका? काय आहे सत्य?
X

मेजर सुरेंद्र पूनिया यांनी ३० सेकंदाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि असं लिहिलं आहे की, "अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांचं का ऐकत नाहीत? #AdManKejriwal


या व्हिडिओमध्ये मनीष सिसोदिया असं म्हणतांना दिसत आहेत की, "पूर्ण देशातील वृत्तपत्रांवर या जाहिराती पानभर छापले गेले आहेत. सगळ्याच वृत्तपत्रांमध्ये या जाहिराती छापल्या आहेत. एवढे पैसे जर लस उपलब्ध करण्यासाठी लावले असते तर बाहेरून सुद्धा आपण लस उपलब्ध करू शकलो असतो, मला हे सांगावस वाटतंय की लोकांना जाहिरातींची नाही तर लसींची गरज आहे. जाहिराती देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव सुद्धा टाकला जातोय, जाहिराती द्या जाहिराती द्या म्ह्णून. लस तर देत नाहीत. फक्त जाहिराती द्या.

व्हिडिओमध्ये मनीष सिसोदिया बोलत असताना, दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या पेपरातील जाहिरातीचा फोटो सुद्धा वारंवार दाखवला जात आहे.

Why Mr Arvind Kejriwal doesn't listen to Sh Manish Sisodiya ?#AdManKejriwal pic.twitter.com/FqNCzAYkyo — Major Surendra Poonia (@MajorPoonia) June 24, 2021


दरम्यान फेसबुक पेज पॉलिटिकल किडा यावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या पेजवरून अनेकदा चुकीची माहिती पसरवली जाते. हा व्हिडिओ पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओचं कॅप्शन सिसोदिया अरविन्द केजरीवाल यांच्यावर टीका करत असून केजरीवाल लस देत नाहीत फक्त जाहिराती करत आहेत. असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला आहे,
अनेकदा चुकीची माहिती पसरविणार्‍या प्रोपेगंडा मीडिया आउटलेट "KreatelyMedia" ने देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Very Handsome pic.twitter.com/mawufgS8QZ


— Kreately.in (@KreatelyMedia) June 24, 2021


या व्यतिरिक्त फेसबुकवरील अनेक मोदी समर्थकांनी हा व्हिडीओ पेजवर अनेक ठिकाणी शेअर केला आहे.

काय आहे सत्य?

व्हिडिओ पाहताच हे कळून येतं की, हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. व्हिडिओ बऱ्याचदा कट होतांना सुद्धा दिसतो आहे. अल्ट न्यूजने याबद्दल सर्च केले असता, २१ जून रोजी झालेल्या मनीष सिसोदिया यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सापडला. व्हिडिओमधील काही पॅचेस वापरून हा बनावट व्हिडिओ तयार करण्यात आल्याचं दिसून आलं. खरं तर, मनीष सिसोदिया हे केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित करत होते, त्यांनी या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर सुद्धा केला होता.या व्हिडिओ मधील व्हायरल होणारा भाग ५ मिनिटानंतर येतो. मनीष सिसोदिया म्हणतात, "भारतीय जनता पक्षाच्या राज्यांच्या जाहिराती देशभरातील वर्तमान पत्रांमध्ये पानभर छापल्या जात आहेत. केंद्र सरकारने स्वतंत्रपणे आपली जाहिरात दिली आहे. ज्यात लिहिलं आहे की, 'जगातील सर्वात मोठी मोफत लसीकरण मोहीम'. दरम्यान अशाच प्रकारची जाहिरात उत्तर प्रदेश सरकारने देखील छापली आहे. उत्तराखंड सरकारनेही हिच जाहिरात करत आहे. मग कर्नाटक सरकार दिल्लीत त्यांची जाहिरात करत आहे. म्हणजेच संपूर्ण देशात लस नाही पण लसींच्या जाहिराती आहेत.

आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाची सरकार, देशात चार-पाच-पाच वर्तमानपत्रांमध्ये, प्रत्येक वर्तमानपत्रात चार-चार ते पाच-पाच वेळा जाहिराती देत आहे. एवढे पैसे जर लस उपलब्ध करण्यासाठी लावले असते तर बाहेरून सुद्धा आपण लस उपलब्ध करू शकलो असतो. आता केंद्र सरकारने दिल्ली सरकारला देखील लसीकरणा संदर्भात 'धन्यवाद मोदीजी, मोफत लस''. अशा प्रकारची लस कर्नाटक सरकारने दिली आहे. याच जाहिरातीचं टूलकिट दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांना देखील सेंड केलं असून हे छापण्यासाठी धमकावलं जात आहे. त्यांच्यावर दबाव सुद्धा टाकला जात आहे. मला असं सांगावसं वाटतंय की लोकांना जाहिरातीची नव्हे तर लसींची गरज आहे.

मला पंतप्रधानांना तसेच केंद्र सरकारला विनंती करायची आहे की, देशाला जाहिराती नको आहेत, त्यांना लस हवी आहे. मी म्हटल्याप्रमाणे दिल्लीसाठी २ कोटी ९४ लाख लसी हव्या आहेत. भाजपला लाज वाटायला हवी. दिल्लीला 15 लाख लस देतात आणि अधिकाऱ्यांवर जाहिरात देण्यासाठी दबाव टाकतात. लस तर देत नाहीत. जाहिराती मात्र, देत आहेत. सध्या दिल्लीला आणखी २ कोटी ३० लाख लसांची गरज आहे. दोन महिन्यांत तुम्ही २ कोटी ३० लाख लसी द्या. मी दिल्ली सरकारच्या वतीने सांगत आहे की आम्ही तुम्हाला धन्यवादाच्या जाहिराती लावू. परंतु इथे लसींशिवाय फक्त जाहिरातीच आहेत. मोदीजीं लस पाहिजे. लसीशिवाय कसले धन्यवाद. आम आदमी पार्टीच्या ट्विटर हँडलवरूनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान मनीष सिसोदिया यांच्या पत्रकार परिषदेतील व्हिडिओमधून, छोटे-छोटे भाग घेत हा बनावट व्हिडिओ बनवला असून सोबत केजरीवाल यांच्या जाहिरातीचे फोटो जोडले आहेत. हे दाखवण्यासाठी, मनीष सिसोदिया अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करीत आहेत. सोबतच व्हायरल व्हिडिओमध्ये १८ सेकंदावर अरविंद केरीवाल यांचं एक पोस्टर दिसून येतं ते पोस्टर सुद्धा मॉर्फ केलेलं आहे. अल्ट न्यूजने दुसर्‍या एका रिपोर्टमध्ये या फोटोचे सत्य सांगितले होतं. खरा फोटो हा नोव्हेंबर २०२० चा असून, पोस्टरमध्ये रोहतक रोडच्या दुरुस्तीच्या कामाच्या सुरूवाती बद्दल माहिती देण्यात आली होती.

Updated : 2021-06-27T21:32:20+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top