Home > Fact Check > Fact Check: पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या मंडप फलकावर नमाजची वेळ लिहिण्यात आली आहे का?

Fact Check: पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या मंडप फलकावर नमाजची वेळ लिहिण्यात आली आहे का?

Fact Check: पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या मंडप फलकावर नमाजची वेळ लिहिण्यात आली आहे का?
X

दुर्गापूजेच्या मंडपाच्या बाहेर फलकावर नमाजाची वेळ लिहिलेली असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये, मंडपाच्या बाहेर एक बोर्ड दिसत आहे. ज्यावर नमाजची वेळ लिहिलेली आहे. दरम्यान, बऱ्याच लोकांनी असा दावा केला आहे की, हा मंडप पश्चिम बंगालचा आहे. जिथे हिंदूंना नमाज सुरू असताना पूजा करू नये असे सांगितले गेले आहे.


या फोटो फेसबुक ट्विटरवर देखील शेअर केला जात आहे.


बांगलादेश चा फोटो...

बोर्डाच्या खालच्या बाजूला बंगाली भाषेत लिहिलेलं आपण पाहू शकतो - "উত্তরা সার্বজনীন পূজা কমিটি" (अनुवाद- उत्तरा सारबोजोनिक पूजा समिती). ही बांगलादेशमधील ढाका पूजा समिती आहे.

पूजा समितीची एक वेबसाईट देखील आहे.

https://uttarasarbojaninpujacommittee.com/

दरम्यान, उत्तरा सराबोजनीक पूजा समितीचा शोध घेतला असता, आम्हाला एका बांगलादेशी फेसबुक पेजवर एक फेसबुक लाईव्ह व्हिडिओ सापडला.

या लाईव्ह व्हिडीओमध्ये दिसणारे मंडप आणि व्हायरल फोटोमध्ये दिसणारे मंडपमध्ये समानता आहेत. दुर्गा मूर्तीच्या वरील पायऱ्या, झुंबर आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूचे खांब सारखेच आहेत.

तसेच, व्हिडिओमध्ये नमाजचं वेळापत्रक असलेला बोर्ड देखील दिसत आहे.

दरम्यान, एका बांगलादेशी फेसबुक युजरने असं लिहिलं आहे की, उत्तरा सराबोजनीक पूजा समितीने नमाज दरम्यान संगीत वाजवण्यापासून रोखण्यासाठी एक फलक लावला होता.

निष्कर्ष:

एकूणच, हे निश्चित आहे की हा फोटो पश्चिम बंगालचा नसून बांगलादेशातील दुर्गा पूजेचा आहे. https://www.altnews.in/hindi/durga-puja-pandal-displaying-namaz-timings-is-from-bangladesh-not-west-bengal/ या संदर्भात Alt news ने Fact check केलं आहे.

Updated : 21 Oct 2021 11:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top