News Update
Home > Fact Check > दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खरंच लोकांकडून कोळसा मागितला का?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खरंच लोकांकडून कोळसा मागितला का?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खरंच लोकांकडून कोळसा मागितला का?
X

सध्या देशात कोळश्याचा अपुरा पुरवठा आहे. त्यामुळं देशावर वीज संकट कोसळणार आहे. या आशयाचे वृत्त माध्यमांनी दिले होते.

या संदर्भात सोशल मीडियावर पाहायला, वाचायला मिळत आहेत. याच बातम्यांच्या धरतीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोळश्याचा अपुऱ्या पुरवठा असल्यामुळे वीज संकट निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र ही लिहिलं आहे.

याच दरम्यान, सोशल मीडिया वर हिंदुस्तान वृत्तपत्राचा एक फोटो मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असून या फोटोसोबत

'बिजली की कमी दूर करने के लिए कोयला दान देकर दिल्ली सरकार की मदद करे' असं टेक्स लिहून खाली शेवटी "आपका एक तसल्ला कोयला पूरे दिल्ली का अंधेरा दूर कर सकता है". असा फोटो ट्विटर यूझर देवेंद्र त्रिपाठी यांनी शेअर करत

'#केजरीकेहसीन_सपने' असा हॅशटॅग वापरला आहे.

आणखी एका ट्विटर युझर ने हा फोटो ट्वीट केला आहे.

एका फेसबुक युझर ने तर थेट हा फोटो शेअर करत अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाना साधला आहे.

ट्विटर आणि फेसबुक वर हा फोटो व्हायरल झाला आहे.

काय आहे सत्य?

या संदर्भात आम्ही सदर वृत्तपत्र तपासले असता फोटो खाली दिलेल्या टेक्सचे स्वरूप सटायर लिखान आहे.
वृत्तपत्रावर ९ जुलै २०२१ दिनांक आहे. हा पेपर निरखून पाहिल्यानंतर हिंदुस्थान वृत्तपत्राची बिहार आवृत्ती असल्याचं दिसून येत.
पुढे, ऑल्ट न्यूज ने हिंदुस्तान वृत्तपत्राची बिहार आवृत्तीचा ९ जुलै २०२१ चा ईपेपर चेक केला. तेव्हा वेबसाइट असलेल्या वृत्तपत्रात वेगळाच फोटो आहे. आणि व्हायरल होणारा फोटो वेगळा आहे.वृत्तपत्रात लिहिलं आहे की, "कोविड से जो दुनिया छोड़ गए, उनके परिवारों के साथ है दिल्ली सरकार". यामध्ये लिहिलं आहे. कोरोना मुळे ज्या कुटुंबियातील कमवणाऱ्या व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. त्यांना दर महिना २,५०० रुपयांची मदत दिल्ली सरकार कडून दिली जाणार आहे. बाकी कोरोनामुळे ज्या कुटुंबियातील सदस्यांचा मृत्यू झाला होता. अशांना ५० हजार रुपये दिले जाणार आहे.

निष्कर्ष:

एकंदरित ९ जुलै २०२१ च्या हिंदुस्तान वृत्तपत्रात छापलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भातल्या फोटोवरील टेक्स बदलले गेले. आणि हा बनावटी स्वरुपाचा फोटो शेअर करून अरविंद केजरीवाल यांची खिल्ली उडवली जात आहे.

या संदर्भात Alt News ने फॅक्ट चेक केलं आहे.


Updated : 13 Oct 2021 3:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top