Home > Fact Check > Fact Check | आयुर्वेदिक उपचारांनी कोरोना व्हायरस बरा होत असल्याच्या दाव्यात किती आहे तथ्य?

Fact Check | आयुर्वेदिक उपचारांनी कोरोना व्हायरस बरा होत असल्याच्या दाव्यात किती आहे तथ्य?

Fact Check | आयुर्वेदिक उपचारांनी कोरोना व्हायरस बरा होत असल्याच्या दाव्यात किती आहे तथ्य?
X

चीनमधल्या कोरोना व्हायरसबद्दल जगभरात चिंतेचं वातावरण असताना भारतात मात्र अफवांच पेव पसरलंय. रोज नवनव्या अफवांनी फेसबुक, व्हॉट्सअपसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भरून जात आहेत.

आयुर्वेदिक, होमियोपॅथी आणि यूनानी उपचारांनी कोरोना व्हायरसवर उपचार केला जाऊ शकतो असा दावा करणारे वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज सध्या सर्वच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहेत. अनेक ठिकाणी केंद्र सरकार, आयुष मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने त्याबद्दल सूचना दिल्याचे दावेही करण्यात येत आहेत.

कोणतीही खात्री न करता अनेकजण चुकीची माहिती पोस्ट आणि फॉरवर्ड करत आहेत. या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरत आहेत. म्हणून ‘मॅक्स महाराष्ट्र’ने अशा सर्व मेसेजची पडताळणी केली.

हे आहेत व्हायरल मेसेज आणि पोस्ट्स –

कोरोना विषाणूपासून रक्षण होण्यासाठी तुळस, काळे मिरे, लसूण, गोमुत्र, मध अशा पदार्थांचा वापर करण्याचा दावा करणारे वेगवेगळे मेसेज सध्या व्हायरल आहेत. यात वरील पदार्थांची नावं बदलून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.

काही ठिकाणी केंद्र सरकार, आयुष मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांनी त्याबद्दलच्या सूचना केल्याचाही दावा करण्यात आला आहे.

व्हायरल मेसेज

वृत्तपत्रातील बातम्यांच्या स्वरूपातही काही माहिती पसरवली जात आहे.

फेसबुक पोस्ट -

फेसबुकवर व्हायरल असलेला मेसेज

सनातन प्रभात या वेबसाईटवरही अशाप्रकारचा दावा करण्यात आला आहे. कोरोना विषाणूपासून रक्षण होण्यासाठी आयुष मंत्रालयाने तुळस, काळे मिरे यांचा काढा वापरण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. हा मेसेज फेसबुक आणि व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे.

व्हॉट्सअपवर व्हायरल होत असलेला मेसेज - स्क्रिनशॉट

मूळ बातमीचा स्क्रिनशॉट

मूळ बातमीची लिंक

एका इंग्रजी वेबसाईटवरही दावा करण्यात आल आहे की, लसूण उकळलेलं पाणी पिल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होतो.

बातमीचा स्क्रीनशॉट

बातमीची लिंक -

तथ्य पडताळणी आणि निष्कर्ष -

वरील अनेक मेसेजमध्ये आयुष मंत्रालयाच्या नावाने दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे असे मेसेज व्हायरल व्हायला सुरूवात झाल्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने आयुष मंत्रालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून आवश्यक माहिती मिळू शकली नाही. मात्र, ‘पत्र सूचना कार्यालय’ अर्थात ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ (PIB) यांनी याबाबत अधिकृत खुलासा केला आहे.

कोरोना व्हायरस आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा युनानी अशा उपचारांनी बरा होतो हे सांगणारी कोणतीही अधिसूचना केंद्र सरकारच्या कोणत्याही मंत्रालयाकडून काढण्यात आलेली नाही, हे पीआयबीने स्पष्ट केलं आहे.

यासोबतच लसूण उकळलेल्या पाण्याचा वापर केल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होतो, या दाव्यातही कसलंच तथ्य नसल्याचं पीआयबीने सांगितलं आहे.

Updated : 7 Feb 2020 6:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top