Home > Fact Check > Fact Check: शाहरुख खानने खरंच 'व्होट फॉर एमआयएम' लिहिलेला टी-शर्ट घातला का?

Fact Check: शाहरुख खानने खरंच 'व्होट फॉर एमआयएम' लिहिलेला टी-शर्ट घातला का?

Fact Check: शाहरुख खानने खरंच व्होट फॉर एमआयएम लिहिलेला टी-शर्ट घातला का?
X

सोशल मीडियावर सध्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान चा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये त्यांच्या टी-शर्टवर 'व्होट फॉर एमआयएम' असं लिहिलेलं आहे. तसंच टी शर्टवर पतंगाचा एक लोगो आहे.फोटोच्या कॅप्शनमध्ये हिंदीमध्ये "15 मिनट में 100 करोड़ हिंदुओं को मारने की बात करने वाले शाहरुख खान को ओवैसी के लिए प्रचार करने में कोई दिक्कत नहीं आई, लेकिन सिर्फ 2- 4 बात हिंदुओं के पक्ष में क्या होने लगी इसे भारत देश में असहिष्णुता दिखाई देने लगी है, वाह शाहरुख खान वाह क्या खूब धर्म निरपेक्षता है तेरी."

असं लिहिलं आहे.म्हणजे "15 मिनिटांत 100 कोटी हिंदूंना मारण्याची भाषा करणाऱ्या शाहरुख खानला ओवेसींच्या प्रचारात कोणतीही अडचण नाही. मात्र, हिंदूंच्या बाजूने फक्त 2-4 गोष्टी काय घडू लागल्या, या लोकांना भारतात असहिष्णुता दिसू लागली आहे. वाह शाहरुख खान वाह, खूप चांगली धर्मनिरपेक्षकता आहे तुझी". दरम्यान, हा फोटो फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

काय आहे सत्य...?

2012 मध्ये, अकबरुद्दीनने या संदर्भात वक्तव्य केले होते. "जर फक्त 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवले तर मुस्लिम 100 कोटी हिंदूंना दाखवू शकतात की कोण जास्त ताकदवान आहे". या वादग्रस्त वक्तव्यामुळे अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शाहरुख खानने AIMIM ला पाठिंबा दिल्याचे कोणतेही वृत्त नाही.

एडिटेड फोटो...

शाहरुख खानचा 2009 चा हा फोटो एडिट करण्यात आला आहे. Getty Images च्या कॅप्शननुसार, हा फोटो इंडिया टुडे ग्रुपच्या योगेन शाहने काढला होता. बॉलिवूड चित्रपट 'ब्लू' च्या सेटवर अक्षय कुमारला भेटण्यासाठी शाहरुख खान मुंबईत गेला होता. त्याचवेळस हा फोटो काढण्यात आला होता. फोटोमध्ये शाहरुख खानने पांढरा प्लेन टी-शर्ट घातलेला आहे.खाली आपण एडिटेड केलेला फोटो आणि मुळ फोटो पाहू शकतो.


निष्कर्ष:

एकंदरीत, शाहरुख खानचा एक एडिट केलेला फोटो शेअर करण्यात येत आहे. ज्यामध्ये त्याने "व्होट फॉर एमआयएम" असा टी-शर्ट घातला असल्याचा खोटा दावा केला जात आहे.

या संदर्भात Alt News ने Fact Check केले आहे. https://www.altnews.in/old-image-of-shahrukh-khan-morphed-to-show-him-sporting-vote-for-mim-t-shirt/

Updated : 2021-11-23T16:53:02+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top