Home > Fact Check > Fact check: RSS च्या स्वयंसेवकांनी इंग्लंडच्या राणीला खरंच मुजरा केला होता का?

Fact check: RSS च्या स्वयंसेवकांनी इंग्लंडच्या राणीला खरंच मुजरा केला होता का?

Fact check: RSS च्या स्वयंसेवकांनी इंग्लंडच्या राणीला खरंच मुजरा केला होता का?
X

सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो मोठ्याप्रमाणात शेअर केला जात आहे. या फोटोसोबत हा दावा देखील केला जात आहे की, आरएसएसच्या (RSS) स्वयंसेवकांनी ब्रिटनच्या महाराणीला मुजरा केला होता. या फोटोमध्ये आरएसएसचा गणवेश घातलेले काही लोक रांगेत उभी दिसत आहे आणि ब्रिटनची महाराणी त्यांच्या समोरून जाताना पाहायला मिळतेय.




फेसबुक युजर 'आप का ब्रिजेश यादव' यांनी हा फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे की, इंग्रजांची वंशज असलेल्या राणी विक्टोरिया ला मुजरा करताना हा फोटो पाहा.

'ब्रिटन माता की जय' हा फोटो मोठ्या मुश्किलने हाती आला आहे. हा फोटो प्रत्येक फोनपर्यंत पोहोचला पाहिजे. सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे की, 'देशाचा गद्दार कोण आहे.' जेव्हा संपूर्ण देश इंग्रजांशी लढत होता. तेव्हा काही गद्दार इंग्लंडच्या राणीला मुजरा करत होते. यांचे वंशज स्वतःला देशभक्त बोलतात.



'सच्चाई की आवाज' या नावाने असलेल्या फेसबुक पेजने ही हा फोटो शेअर केला आणि लिहिलं आहे की, गद्दार गद्दारी ही करेंगे याला जवळपास ५०० लाईक्स मिळाले आहे.





काय आहे सत्यता?

या फोटो मधील टेक्सचा काही भाग काढून या फोटोला रिव्हर्स इमेज मध्ये सर्च केल्यानंतर आम्हाला डेक्कन हेरोल्ड च्या फ्रेबुवारी २०१५ च्या आर्टिकल मध्ये एक फोटो मिळाला. यामध्ये आरएसएस चे कार्यकर्ते दिसत आहे. परंतु त्यांच्या समोर कुणीही नाही. यावरून स्पष्ट आहे की सोशल मीडियावर शेअर केला जाणारा हा फोटो एडिट केलेला आहे. टाईम्स ऑफ इंडिया च्या २०१७ च्या आर्टिकल मध्येही या फोटोचा वापर करण्यात आला आहे.




आता ब्रिटन च्या महाराणी चा फोटो शोधल्यानंतर आम्हाला CNN च्या २०१६ च्या आर्टिकल मध्ये हा फोटो मिळाला. या फोटोसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या महाराणी एलिजाबेथ हिने फेब्रुवारी १९५६ मध्ये आपल्या कॉमनवेल्थ दौऱ्याच्या दरम्यान, नायजीरियाच्या कडुना हवाई अड्ड्यावर Queen's Own Nigeria Regiment, Royal West African Frontier Force चं निरीक्षण केलं होतं.



व्हायरल फोटो या दोन फोटोना जोडून बनवला आहे. तुम्ही खाली पाहू शकता.





या फोटोची सत्यता २०१६ मध्ये SMHoax Slayer यांनी देखील सांगितली होती. जेव्हा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी हा फोटो शेअर करत आरएसएसवर (RSS )निशाणा साधला होता.

निष्कर्श: आरएसएस च्या स्वयंसेवकांनी इग्लंडच्या राणीला मुजरा केला हा दावा करणारा फोटो खोटा आहे.

या संदर्भात Alt news ने फॅक्ट चेक केलं आहे. https://www.altnews.in/hindi/fact-check-rss-workers-are-not-saluting-british-queen-morphed-image/


Updated : 26 Sep 2021 2:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top