Home > Fact Check > Fact Check : राहुल गांधी यांनी माईक म्यूट असतानाही भाषण केलं का?

Fact Check : राहुल गांधी यांनी माईक म्यूट असतानाही भाषण केलं का?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या दरम्यान भाषण करताना राहुल गांधी यांचा माईक म्यूट असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण राहुल गांधी यांनी माईक म्यूट असतानाही भाषण केलं आहे का? जाणून घ्या नेमकं काय आहे सत्य मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी केलेल्या फॅक्ट चेकमधून....

Fact Check : राहुल गांधी यांनी माईक म्यूट असतानाही भाषण केलं का?
X

राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो यात्रा सुरु आहे. ही यात्रा मध्यप्रदेशातील महू येथे असताना राहुल गांधी यांनी एका जनसभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांचा माईक बंद असतानाही त्यांनी भाषण सुरु ठेवल्याचा दावा करणारा व्हिडीओ भाजप नेते अरुण यादव यांनी ट्वीट केला आहे. त्यामध्ये अरुण यादव यांनी म्हटले आहे की, बिना आवाजाचे पंतप्रधान देशाने झेलले आहेत. आता देश पुन्हा तीच चूक करणार नाही.

राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ अनेक भाजप नेत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये भाजप नेते नवीनकुमार जिंदाल यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, माईक ऑफ आहे. मात्र बंदा पुर्ण मेहनत करीत आहे.

@vipinsharmaji8 या ट्विटर हँडलवरून ट्वीट करत अरुण यादव यांनी केलेला दावाच पुन्हा एकदा केला आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी याच दाव्यासह ट्वीट केले आहेत.


पडताळणी (Reality Check)

राहुल गांधी यांचा व्हिडीओ मॅक्स महाराष्ट्रच्या फॅक्ट चेक टीमच्या निदर्शनास आला. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने गुगलवर काही की-वर्ड्स सर्च केले. त्यामध्ये वेगवेगळे सर्च रिझल्ट मिळाले. यामध्येच Inidan National Congress च्या युट्यूबवर एक व्हिडीओ मिळाला.

मॅक्स महाराष्ट्रच्या फॅक्ट चेक टीमने या व्हिडीओ कधी अपलोड करण्यात आला ते पाहिले. यावेळी मॅक्स महाराष्ट्रच्या टीमला हा व्हिडीओ 27 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महू या जन्मगावी जनसभेला संबोधित करतानाचा हा व्हिडीओ असल्याचे दिसून आले. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला चढवला होता.

राहुल गांधी म्हणाले, RSS आणि BJP मध्ये समोरून लढण्याची हिंमत नाही. ते संविधान नष्ट करू इच्छित आहेत. ते भीती, द्वेष आणि हिंसेची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विधानसभा, न्यायपालिका या लोकशाहीच्या संस्था आहेत. यांच्या माध्यमातून एक विश्वासार्हता निर्माण केली जाते. मात्र अनेकदा माझ्यासह माझ्या सहकार्यांनी नोटबंदी, चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेला जीएसटी, तीन काळे कृषी कायदे, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा असो या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही बोलायला लागलो की, लोकसभा आणि राज्यसभेतील आमचा माईक असा बंद होतो, असं सांगत राहुल गांधी यांनी माईक बंद केला. मॅक्स महाराष्ट्रच्या टीमने हा संपूर्ण व्हिडीओ पाहिला. यामध्ये 5 मिनिट 4 सेकंदाला व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी माईक ऑफ केला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी यांनी 5 मिनिट 36 सेकंदाला माईक सुरु केला आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात असल्याचे म्हटले आहे.

काय आहे सत्य ? (What is Fact)

राहुल गांधी यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ चुकीच्या दाव्याने शेअर होत आहे. यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा आवाज कसा दाबला जातो, हे राहुल गांधी यांनी माईक बंद करण्यातून सांगितले आहे. मात्र भाजप नेत्यांनी हा व्हिडीओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला आहे. तसेच अशा प्रकारच्या दाव्यातून राहुल गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न या व्हिडीओच्या माध्यमातून भाजप नेत्यांनी केला आहे.


Updated : 10 Dec 2022 4:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top