Home > Fact Check > Fact check: कंगना रणौतचा पद्मश्री परत घेण्यासाठी राष्ट्रपतींनी मागितली मोदींकडे परवानगी?

Fact check: कंगना रणौतचा पद्मश्री परत घेण्यासाठी राष्ट्रपतींनी मागितली मोदींकडे परवानगी?

Fact check: कंगना रणौतचा पद्मश्री परत घेण्यासाठी राष्ट्रपतींनी मागितली मोदींकडे परवानगी?
X

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कथित ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटमध्ये लिहिण्यात आलेलं आहे की, "कंगना रणौतने केलेली टिप्पणी देशाच्या भावना दुखावणारी आहे, तिला पद्म पुरस्कार दिल्याबद्दल मला स्वतःला लाज वाटते आहे! माझी श्री @narendramodi यांना विनंती आहे की, मला पुरस्कार मागे घेण्याची परवानगी द्यावी."

दरम्यान या स्क्रीनशॉटचा फोटो शेअर करत अनेक यूजर्सने

देशाच्या राष्ट्रपतींना आता पुरस्कार परत घेण्यासाठी पंतप्रधानांची परवानगी घ्यावी लागत असल्याचा दावा केला आहे.

Times now च्या एका कार्यक्रमादरम्यान, अभिनेत्री कंगना रणौतने स्वातंत्र्यसैनिकांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. 1947 मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक मागून मिळालेले स्वातंत्र्य आहे. भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. असं वादग्रस्त विधान कंगना रणौत ने केले होते. तिच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

'Now Mahfooz Khan' ने या फेसबूक पेजवर या स्क्रीनशॉटचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.


फेसबुकवर या ट्विटचा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.














काय आहे सत्य...?

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे अधिकृत ट्विटर हँडल '@rashtrapatibhvn' हे आहे. या युजर '@rashtrptibhvn' आयडीचं राष्ट्रपतींचं कोणतंही अधिकृत ट्वीटर हॅडल नाही. स्क्रीनशॉटमध्ये '@rashtrptibhvn' हे ट्विटर हँडल दिसत आहे.



यासोबतच, President of India च्या ऐवजी Prasident of India असं लिहीलेलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्विटर टाइमलाइनवर असं कोणतंही ट्विट दिसून येत नाही. जर त्यांनी याबाबत काहीही ट्विट केलं असतं तर मीडिया मध्ये त्याच्या बातम्या आल्या असत्या. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे ट्विट केल्याबद्दल कोणतीही बातमी आम्हाला सापडली नाही.

दरम्यान, '@rashtrptibhvn' या ट्विटर हँडलचा शोध घेतला असता, हे खाते निलंबित करण्यात आल्याचं दिसून आलं.





तसेच, या ट्विटर अकाऊंटच्या आर्काइव्ह लिंकद्वारे अकाउंटच बायो तपासलं असता, बायोमध्ये राष्ट्रपतींचे फॅन अकाउंट असं वर्णन केलेलं आपण पाहू शकतो.





याशिवाय अनेक ट्विटर युजर्सनी या हँडलच्या जुन्या ट्विटला रिप्लाय देतांना याला फेक अकाउंट म्हटले आहे. एका ट्विटर युजरने '@rashtrptibhvn' प्रोफाइलचा स्क्रीनशॉट शेअर करत गृहमंत्री कार्यालय, पंतप्रधान कार्यालय आणि दिल्ली पोलिसांना टॅग करत राष्ट्रपतींच्या नावाने काम करणाऱ्या या फेक ट्विटर अकाउंटवर कारवाई करण्याची मागणीही युजरने केली आहे.


निष्कर्ष:

एकंदरीत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावाने चालवल्या जाणार्‍या एका फेक ट्विटर अकाउंटच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. ज्या स्क्रीन शॉटमध्ये, कंगनाकडून पद्मश्री परत घेण्यासाठी राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींकडे परवानगी मागितल्याचं ट्विट करण्यात आलं होतं.

या संदर्भात Alt news ने Fact check केलं आहे. https://www.altnews.in/hindi/fake-tweet-in-the-name-of-president-ramnath-kovind-padma-shri-awad-kangna-ranaut-pm-modi/

Updated : 21 Nov 2021 6:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top