Home > Fact Check > Fact Check : कर्नाटक निवडणूकीत भाजपच्या प्रचार गाडीवर हल्ला केला आहे का?

Fact Check : कर्नाटक निवडणूकीत भाजपच्या प्रचार गाडीवर हल्ला केला आहे का?

कर्नाटकमध्ये निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. त्यापार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये भाजपच्या प्रचार गाडीवर हल्ला झाल्याचा दावा करत व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. पण खरंच कर्नाटकमध्ये भाजपच्या प्रचार गाडीवर हल्ला करण्याएवढा नागरिकांचा विरोध आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा फॅक्ट चेक....

Fact Check : कर्नाटक निवडणूकीत भाजपच्या प्रचार गाडीवर हल्ला केला आहे का?
X

कर्नाटकमध्ये निवडणूकांच्या प्रचारांचा धुराळा उडाला आहे. कर्नाटकमधील 224 जागांची विधानसभा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोठी ताकद तावली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान कर्नाटकमध्ये लोक भाजपच्या प्रचाराच्या गाडीवर हल्ला करत असल्याचा दावा करत व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. तर या व्हिडीओसाठी कर्नाटक निवडणूकीचा संदर्भ दिला जात आहे.

तेलंगणातील वाय सतिश रेड्डी यांनीही अशाच प्रकारचे ट्वीट केले आहे. ज्यामध्ये कर्नाटकमधील मतदारांच्या मनात काय आहे हे दाखवणारा हा व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे.





INC कर्नाटकच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ कन्नड कॅप्शनसह ट्वीट केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, रिकाम्या खुर्च्यांचे संमेलन घेतले जात आहे. एवढंच नाही तर भाजपविरोधात जनआक्रोश जारी आहे. भाजपचे उमेदवारच नाही तर वाहनाविरोधात सुध्दा लोकांचा राग पहायला मिळत आहे. गाडीवर पडणारा प्रत्येक हात हा भ्रष्टाचार, धोकेबाजी आणि वाईट प्रशासनाच्या विरोधातील उत्तर आहे. हे ट्वीट 88 हजार 200 लोकांनी पाहिले आहे. तर या ट्वीटला 419 रिट्वीट, 56 कोट आणि 1 हजार 370 पेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत.





आणखी एका ट्विटर वापरकर्ता Eptar ने अशाच प्रकारचा दावा करत व्हिडीओ ट्वीट केला होता. हे फॅक्ट चेक करण्यापर्यंत हे ट्वीट 2 लाख 22 हजार 600 पेक्षा जास्त लोकांनी पाहिले होते.

पडताळणी ( Reality Check)

अल्ट न्यूजने InVid सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्हिडीओच्या फ्रेम ब्रेक केल्या. त्यामध्ये एक फ्रेम गुगल रिव्हर्समध्ये सर्च केली. त्यानुसार 1 नोव्हेंबर 2022 रोजीचा एक व्हिडीओ मिळाला. त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ही घटना तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील मुनुगोडे पोटनिवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी TRS आणि BJP कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्या घटनेच्या व्हिडीओत भाजपच्या प्रचार वाहनाचा व्हिडीओ 15 सेकंदानंतर दिसत आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव बदलून आता भारत राष्ट्र समिती करण्यात आले आहे. वर्तमान मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी स्थापन केली आहे.

अल्ट न्यूजला टाइम्स नाऊ चा एक रिपोर्ट मिळाला. व्हिडीओ लक्षपूर्वक पाहिल्यास भाजपची गाडी 2 मिनिट 27 सेकंदाला एका फ्रेममध्ये दिसली.

या गोष्टी लक्षात घेन आम्ही काही की-वर्ड्स सर्च केले. त्यामध्ये आम्हाला 1 नोव्हेंबर 2022 रोजी इंडिया टीव्हीचा एक रिपोर्ट मिळाला. त्यामध्ये या घटनेवर केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांचा एक ट्विटर थ्रेड मिळाला.

जी किशन रेड्डी यांनी ट्वीट करत टीआरएस फस्ट्रेशन आणि निराशा काढत असल्याचे म्हटले आहे.

निष्कर्ष-

वरील सर्व बाबी तपासल्यानंतर व्हायरल व्हिडीओ आणि सध्या या फॅक्ट चेकमध्ये जुळवलेले डॉट्स एकाच घटनेचे असल्याचे स्पष्ट होत आहेत. त्यामुळे व्हायरल होत असलेला व्हिडीओ कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या काळातील नाही. तर हा व्हिडीओ नोव्हेंबर 2022 मधील तेलंगणा येथील मुनुगोड पोटनिवडणूकीच्या दरम्यान BJP आणि TRS समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षाचा व्हिडीओ आहे. त्यामुळे सध्याच्या कर्नाटक निवडणूकीशी संबंधित हा व्हिडीओ नाही. त्यामुळे कर्नाटक काँग्रेसने केलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट आहे.

Updated : 9 May 2023 3:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top