Home > Fact Check > भारतीय सैनिकांनी भाजपा आणि आरएसएसविरोधात घोषणाबाजी केली? काय आहे सत्य?

भारतीय सैनिकांनी भाजपा आणि आरएसएसविरोधात घोषणाबाजी केली? काय आहे सत्य?

भारतीय सैनिकांनी भाजपा आणि आरएसएसविरोधात घोषणाबाजी केली? काय आहे सत्य?
X

सध्या सोशल मीडियावर येणारे प्रत्येक व्हिडिओ खरे असतीलच असं नाही... हिंसा, द्वेष समाजात वाढविण्यासाठी काही व्हिडिओ एडिट करून लोकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात.

सोशल मीडियावर 15 सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय सैनिकांच्या वर्दीत दिसणारे काही लोक हिंसक घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटिझन्सने शेअर करताना असा दावा केला आहे की, भारतीय सैनिकांनी भाजपा आणि आरएसएसच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. फेसबुक युजर्स प्रिया बांगा यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत असं कॅप्शन दिलं आहे.

आणखी एका फेजबुक युजर्स ने हा व्हिडिओ पोस्ट करत हेच कॅप्शन दिलं आहे. फेसबुकवरील अनेक नेटिझन्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

काय आहे सत्य?

या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी की-वर्ड्स सर्च केल्यानंतर 10 फेब्रुवारी 2020 रोजी पीआयबी ने केलेलं फ़ॅक्ट-चेक आर्टिकल मिळालं. आर्टिकल मध्ये एक टिक-टॉक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सांगतिलं आहे की, भाजपाविरोधात कोणतीही घोषणाबाजी केली गेली नाही. तसेच या लेखात टिक-टॉक व्हिडिओची लिंक एम्बेड केली आहे. परंतु आम्ही ते पाहू शकत नाही. कारण भारत सरकारने जून २०२० ला टिकटॉक बॅन केलं आहे.

दरम्यान एम्बेड केलं गेल्या पोस्टचं कॅप्शन आणि हॅशटॅग नक्की पाहू शकतो. याशिवाय टॉर ब्राऊजरवर लिंक ओपन केल्यानंतर ऑल्ट न्यूज हा व्हिडिओ पाहू शकला. या व्हिडिओ भाजपा, आरएसएस च्या विरोधात घोषणाबाजी केली गेली नाही. या व्हिडिओत सैनिकांच्या कपड्यात दिसणारे लोक

'देश के गद्दारों को गोली मारो... को, जो नहीं है साथ में चूडी पहनो हाथ में.'

अशा पद्धतीच्या घोषणाबाजी करत आहे. तुम्ही टिक-टॉक व्हिडिओ खाली पाहू शकता.

पुढे, की-वर्डस सर्च केल्यानंतर ऑल्ट न्यूज ला फेसबुक वर काही फोटो शेअर केलेले मिळाले. या फोटोमध्ये दिसणारा एक माणूस व्हायरल व्हिडिओमध्येही पाहायला मिळतोय. ज्याने भारतीय झेंडा गुंडाळलेला आहे. फेसबुक वर हे फोटो १६ फेब्रुवारी २०१९ ला चौहान विशाल ने पोस्ट केली होती.

खाली टिक-टॉक व्हिडिओ आणि फेसबुक वर मिळालेल्या फोटोमध्ये दिसणारे एक समानता दिसत आहे.

1) भारतीय झेंडा गुंडाळलेला माणूस

2) या व्यक्तिच्या आजू-बाजूला दिसणाऱ्या लोकांनीही गळ्यात पिवळ्या रंगाची फुलमाळ घातली आहे.
विशाल चौहान च्या फ़ेसबुक टाइमलाइनला चेक केल्यानंतर आम्हाला 16 फेब्रुवारी 2019 ला पोस्ट केलेला एक व्हिडियो मिळाला. हा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ सारखाच आहे. या व्हिडिओ मध्ये टिक-टॉक व्हिडिओ सारखी घोषणाबाजी करताना दिसतात.

बूम ने चौहान विशाल शी या व्हिडिओ संदर्भात बातचीतही केली होती. आर्टिकलमध्ये विशालने सांगितल्यानुसार, ही रॅली हरिद्वार मध्ये पुलवामा हल्ल्यात शहीदांच्या सन्मानकरिता काढण्यात आली होती. त्या रॅलीत भाजप आणि आरएसएसच्या विरोधात कोणतीही घोषणाबाजी झालेली नाही. मी स्वतः या रॅलीत सहभागी होतो. ही रॅली हरिद्वारच्या भूमानंद रुग्णालय आणि हर की पौडी दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

निष्कर्श:

एकंदरित २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या आठवणीत हरिद्वारमध्ये ही रॅली काढण्यात आली होती. परंतू या व्हिडिओला एडिट करून खोटा दावा करण्यात आला आहे की, सेनेतील लोकांनी भाजप आणि आरएसएस च्या विरोधात घोषणाबाजी केली.

या संदर्भात alt news ने फॅक्ट चेक केलं आहे.

Updated : 13 Sep 2021 3:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top