Home > Fact Check > Fact Check: "जिन्नांनी आपल्या स्वातंत्र्य मिळवून दिले" अखिलेश यादव यांनी खरंच असा दावा केला आहे का?

Fact Check: "जिन्नांनी आपल्या स्वातंत्र्य मिळवून दिले" अखिलेश यादव यांनी खरंच असा दावा केला आहे का?

Fact Check: जिन्नांनी आपल्या स्वातंत्र्य मिळवून दिले अखिलेश यादव यांनी खरंच असा दावा केला आहे का?
X

भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांचा 18 सेकंदाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये केलेल्या व्हिडीओमध्ये अखिलेश यादव यांनी 'जिन्ना यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिल्याचा' दावा करताना दिसत आहेत.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये अखिलेश यादव असं म्हणताना ऐकू येत आहेत की, ''जिन्ना हे एकाच संस्थेतुन शिकुन बॅरिस्टर बनले होते. एकाच ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते बॅरिस्टर झाले. त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांना कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला तर ते मागे..."

मात्र, हा व्हिडिओ ऐकून अखिलेश यादव हे केवळ मोहम्मद जिन्ना यांच्याबद्दलच बोलत आहेत, असं वाटतं. दरम्यान, भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागार कांचन गुप्ता यांनीही हा व्हिडिओ शेअर करतांना हाच दावा केला आहे.

यासोबतच, हा व्हिडिओ अरुण पुदूर, पायल मेहता यांनीही शेअर केला आहे. तसेच फेसबुकवरही हा व्हिडिओ याच दव्यासह शेअर केला जात आहे. तर,

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा, हिंदू युवा वाहिनीचे प्रभारी योगी देवनाथ आणि भाजप उत्तर प्रदेशचे अमित कलराज यांनी अखिलेश यादव यांचा हवाला देत हा व्हिडिओ शेअर न करता ट्विट केला आहे.

काय आहे सत्य...?

दरम्यान, कांचन गुप्ता यांच्या ट्विटला उत्तर देतांना एका ट्विटर युजरने अखिलेश यादव यांचा 2 मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अखिलेश यादव यांच्या शब्दांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला जात असल्याचे स्पष्ट ऐकु येते. खरं तर, ते सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि जिन्ना यांच्याबद्दल बोलत होते. पण व्हायरल झालेल्या व्हिडिओची सुरुवात जिन्ना यांच्यापासूनच होते. त्यातील मागील भाग कापला आहे.

31 ऑक्टोबरला ANI ने अखिलेश यादव यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामध्ये त्यांचं संपूर्ण भाषण ऐकू येतं. अखिलेश यादव म्हणतात, "सरदार पटेल जमीन ओळखायचे, जमीन धरून निर्णय घ्यायचे. ते जमीन समजून घ्यायचे मगच निर्णय घ्यायचे. म्हणूनच त्यांना 'आयर्न मॅन' म्हणून ओळखले जाते, त्यांना लोहपुरुष असेही म्हणतात."

पुढे ते म्हणतात, "सरदार पटेल जी, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, जिन्ना हे एकाच संस्थेतुन शिकून बॅरिस्टर झाले होते. त्याच ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं आणि बॅरिस्टर झाले. त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांना कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला सामोरे जावे लागले तरी ते मागे हटले नाहीत. एक विचारधारा (RSS) ज्यावर बंदी घालण्यात आली होती. कोणी बंदी घातली असेल तर लोहपुरुष सरदार पटेल यांनी घातली होती."

निष्कर्ष:

अमित मालवीय यांच्यासह अनेकांनी एक अपूर्ण व्हिडिओ शेअर करत अखिलेश यादव यांनी मोहम्मद जिन्ना यांनी देशाला स्वातंत्र्य दिल्याबद्दल बोलल्याचा दावा केला आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, अखिलेश यादव सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हरदोई येथील सभेला संबोधित करत होते. मात्र, त्यावेळी त्यांनी फक्त जिन्ना यांचंच नाव घेतलेलं नाही. त्यामुळे चुकीचा संदर्भ देत व्हिडिओ क्लिप शेअर होत असल्याचं स्पष्ट होते. अखिलेश यादव यांच्या संबोधनाचा संपूर्ण व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे.

दरम्यान, या संदर्भात आम्ही दिल्लीतील इतिहासकार इरफान हबीब यांच्याशी चर्चा केली. भारताच्या स्वातंत्र्यात मोहम्मद जिन्ना यांची भूमिका काय होती? यावर ते म्हणाले

"मोहम्मद जिना हे 1910 आणि 1920 च्या दशकात आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दूतही म्हटले जायचे. पण नंतर लीग मजबूत करण्यासाठी आणि देशाचे विभाजन करण्यासाठी आलेला सांप्रदायीक टप्पा त्याच्याकडून घडला. अखिलेश यादव यांचं वक्तव्य टाळता आले असते. कारण आपल्यालाकडे तथ्यं तोडून मोडून सांगितलं जाते. जीन्नांनी केलेल्या या कार्यामुळे ते नेहमीच विभाजनकारी व्यक्ती राहतील." असं मत हबीब यांनी व्यक्त केलं आहे.

या संदर्भात alt News ने फॅक्ट चेक केलं आहे. https://www.altnews.in/fact-check-did-sp-leader-akhilesh-yadav-said-jinnah-got-us-freedom/

Updated : 9 Nov 2021 10:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top