Home > Fact Check > Fact Check: ट्रॅक्टर रॅली थांबवण्यासाठी भाजप नेत्याचं पत्र व्हायरल, काय आहे सत्य?

Fact Check: ट्रॅक्टर रॅली थांबवण्यासाठी भाजप नेत्याचं पत्र व्हायरल, काय आहे सत्य?

Fact Check: ट्रॅक्टर रॅली थांबवण्यासाठी भाजप नेत्याचं पत्र व्हायरल, काय आहे सत्य?
X

दिल्ली येथे दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधींपासून तीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. मोदी सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत म्हणून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून शेतकरी नेते 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. या ट्रॅक्टर रॅलीला भाजपने विरोध करावा असा मजकूर असलेले एक पत्र सोशल मीडिया वर व्हायरल झालं आहे. कॉंग्रेस नेते सुरेंद्र राजपुत यांनी हे ट्विट केलं आहे. नंतर हे पत्र त्यांनी डिलीट केलं. मात्र, हे ट्विट archived मध्ये आहे. हे पत्र पाहण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करा...

https://archive.is/फँ५सीझ




या ट्विट मध्ये भाजप नेते राजेश भाटीया यांची सही असलेले पत्र आहे. या पत्रात भाजप कार्यकर्त्यांना शेतकरी रॅली ला विरोध करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कॉंग्रेस नेत्या अल्का लाम्बा यांनी देखील हे पत्र ट्विट केलं असून शेतकरी आंदोलन हिंसेने संपवण्याची भाषा केली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच या पत्राची सत्यता समोर यायला हवी. वेळेवर हे सर्व थांबवणं गरजेचं आहे. नाही तर दिल्लीच्या दंगलीप्रमाणे यावेळी उशीर होता कामा नये. असं अल्का लांबा यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.


काही लोकांनी या पत्राला कपील मिश्राच्या भडकाऊ भाषणाशी जोडलं आहे.

काय आहे सत्यता...?

या संदर्भात राजेश भाटीया यांनी एक ट्विट केलं असून त्यांनी त्यांच्या सहीचा वापर करत हे खोटं पत्र व्हायरल केल्याचा दावा त्यांनी या ट्विट मध्ये केला आहे.


तसंच त्यांनी काही वृत्तपत्रांची कात्रण देखील ट्विट केली आहेत.


Updated : 21 Jan 2021 12:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top