Home > Fact Check > Fact Check : भारतात कॅडबरीच्या उत्पादनात गोमांसाचा वापर होतो?

Fact Check : भारतात कॅडबरीच्या उत्पादनात गोमांसाचा वापर होतो?

भारतात कॅडबरीच्या उत्पादनात गोमांसाचा वापर होत असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं या दाव्यात तथ्य आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा फॅक्ट चेक....

Fact Check : भारतात कॅडबरीच्या उत्पादनात गोमांसाचा वापर होतो?
X

भारतात कॅडबरीच्या (Cadbury india) उत्पादनात गायीच्या मांसाचा (Beef) वापर केला जात असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यासंदर्भात अल्ट न्यूजकडे फॅक्ट चेक करण्यासाठी एक स्क्रीनशॉट आला. यामध्ये चॉकलेट कंपनी कॅडबरीने लिहीले आहे की, प्लीज लक्ष द्या. आमच्या उत्पादनांवर जिलेटिन लिहीले असेल तर हे पूर्णतः हलाल आहे आणि ही उत्पादनं गोमांसापासून बनवले जात आहेत.



2021 मध्येही अशाच प्रकारचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता.

17 जुलै मधु पूर्णिका कीश्वर यांनी हा स्क्रीनशॉट शेअर करताना म्हटले होते की, जर हे सत्य असेल तर हिंदूंना हलाल गोमांस खाण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल कॅडबरीला कोर्टात खेचायला हवं. हा स्क्रीनशॉट RSS सदस्य राजेश गेहानी यांनीही हे ट्वीट केलं आहे.

भाजप समर्थक अरुण पुदूर यांनी हाच दावा केला आहे. मात्र यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे यापुर्वीही अरुण पुदूर यांनी सोशल मीडियावर अनेकदा चुकीची माहिती शेअर केली आहे.

अशाच प्रकारे अनेक युजर्सने हा स्क्रीनशॉट फेसबुक (Facebook) आणि ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे. यामध्ये भारतात गोमांसाचा वापर करुन विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाबाबत चिंता व्यक्त केली आहे.




पडताळणी (Reality Check)

व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट आपण लक्षपूर्वक पाहिल्यानंतर हे स्पष्टपणे दिसून येत आहे की, हा स्क्रीनशॉट ऑस्ट्रेलियातील वेबसाईटचा स्क्रीनशॉट आहे. यामध्ये कॅडबरीच्या उत्पादनांमध्ये जर जिलेटिन आहे तर ते हलाल आहे. ही गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटवर दिसून येत आहे.




कॅडबरी इंडियाने जुलै 2021 मध्ये ट्वीट करून हा दावा फेटाळून लावला होता. यामध्ये कॅडबरी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ट्वीटमध्ये देण्यात आलेल्या स्क्रीनशॉटमध्ये भारतात मिळणारे Mondelez/ cadbury उत्पादनांशी संबंधित नाही. भारतात बनवण्यात येणारे आणि विकले जाणारी सगळी उत्पादनं 100 टक्के शुध्द शाकाहारी आहेत. याबरोबरच प्रत्येक पॅकेटवर उत्पादन शाकाहारी असल्याचे दाखवणारा हिरवे चिन्ह दिसून येते.

कॅडबरीने मधु कीश्वरबरोबरच इतर व्हायरल होणाऱ्या ट्वीटवर उत्तर देतांना हेच सांगितले आहे. मात्र अजूनही मधु कीश्वर किंवा अरुण पुदूर यांनी आपले ट्वीट डिलीट केले नाही.

मॅक्स महाराष्ट्रने अॅमेझॉन इंडिया वेबसाईटवरील कॅडबरीची उत्पादने पाहिली. त्यामध्ये आम्हाला हिरव्या रंगाचे चिन्ह नसलेले एकही उत्पादन मिळाले नाही. त्यासंदर्भातील कॅडबरी बोर्नविल कोको डार्क चॉकलेटच्या माहितीचा स्क्रीनशॉट आहे.


हिरव्या रंगाच्या चिन्हाची विस्तृत माहिती?

फूड सेफ्टी आणि स्टॅंडर्ड (पॅकेजिंक अँड लेबलिंग) नियम 2011 नुसार, पोषण संदर्भातील माहिती सूचनांच्या विभागात प्रत्येक शाकाहारी खाद्यपदार्थाशी संबंधित माहिती, चिन्ह रंगाच्या माध्यमातून उत्पादन शाकाहारी असल्याचे दाखवणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पादनावर हिरव्या रंगाचे गोल चिन्ह आवश्यक असते.

यामध्ये शाकाहारी खाद्यपदार्थ पुढीलप्रमाणे परिभाषित केले आहेत. त्यामध्ये म्हटलं आहे की, अशा पध्दतीने कोणत्याही प्रकारचे सामान ज्यामध्ये नियम संख्या 1.2.1(7) अनुसार मांसाहार श्रेणीत येत नाही.

त्यामुळे मांसाहारी खाद्य पदार्थांची व्याख्या करताना म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ ज्यामध्ये जनावर, पक्षी, स्वच्छ पाणी अथवा समुद्री जीव, त्यांची अंडी किंवा मांसाचा वापर करायला हवा. मात्र यामध्ये दुधाशी संबंधित पदार्थांचा समावेश केला जात नाही.

2019 मध्ये पॅकेजिंगवर हिरव्या रंगाचे चिन्ह दाखवलेले असतानाही खाद्य पदार्थांमध्ये जनावरांचे मांस वापरल्याचे FSSAI ला आढळून आले. त्यामुळे या कंपन्यांविरोधात फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड एथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI)ने कारवाई केली होती. यामध्ये काही औषध कंपन्यांचाही समावेश होता. यासंदर्भात मुंबईतील FnBnews ने एक रिपोर्ट केला होता. हा रिपोर्ट FSSAIने आपल्या वेबसाईटवर अपलोड केला होता.

यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे या रिपोर्टमध्ये कोणत्याही कंपनीचे नाव घेण्यात आले नाही. FSSAI ने फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड एक्ट 2006 नुसार संबंधित राज्य अधिकारिऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले होते.

यापुर्वीही कॅडबरीच्या मुद्द्यावरून अनेक देशांमध्ये चुकीची माहिती प्रसारित करून कंपनीवर निशाणा साधला होता. 2017 मध्ये अल्ट न्यूजने कॅडबरी उत्पादनातून HIV प्रसारित होत असलेल्या दाव्याचे फॅक्ट चेक केले होते.

यासर्व मुद्द्यांचा विचार केला तर दक्षिणपंथी विचारधारा मानणारे लोक कॅडबरी ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट शेअर करून खोटा दावा करत आहेत. यामध्ये भारतात कॅडबरी उत्पादनात गोमांस वापरल्याचा दावा करण्यात आला होता. यापुर्वीही हिमालया कंपनीवर अशाच पध्दतीने चिखलफेक करण्यात आली होती.

Updated : 13 April 2023 2:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top