Home > Fact Check > अमित शहा यांनी खरंच या उड्डान पुलाचं उद्घाटन केलं आहे का?

अमित शहा यांनी खरंच या उड्डान पुलाचं उद्घाटन केलं आहे का?

अमित शहा यांनी खरंच या उड्डान पुलाचं उद्घाटन केलं आहे का?
X

सध्या सोशल मीडियावर एका उड्डाणपुलाचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना असा दावा केला जात आहे की, अहमदाबादच्या वैष्णवदेवी उड्डाणपुलाचा हा फोटो आहे.
ट्विटर यूजर कुलदीप सांगवी यांनीसुद्धा हा फोटो याचं दाव्याजासह ट्विट केला आहे.अहमदाबादचे नगरसेवक चेतन पटेल यांनीही हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केला आहे.
तसेच गुजरात मीडिया वेबसाइट 'आय एम गुजरात' यांनीही हा फोटो शेअर केल्याचं दिसून आलं.काय आहे सत्य...?

अहमदाबाद मधील वैष्णोदेवी सर्कल येथे असलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन हे गृहमंत्री अमित शहा यांनी 21 जून 2021 रोजी केलं होतं. त्यावेळी द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टमध्ये वैष्णवदेवी उड्डाणपुलाचा फोटो शेअर केला होता. दरम्यान, या रिपोर्टमध्ये असणाऱ्या फोटोवरून हे निश्चित होतं की व्हायरल होणारा फोटो हा वैष्णवदेवी उड्डाणपुलाचा नाही. 'देश गुजरात' या वेबसाइटनेही वैष्णोदेवी उड्डाणपुलाचा फोटो शेअर केला होता.


जो की वायरल होणाऱ्या फोटो सोबत अजिबात मिळता - जुळता नाही. याव्यतिरिक्त गुजरातमधील एक यूट्यूब चॅनल 'नमस्कार गुजरात स्पोर्ट्स' या युट्युब चॅनलवर उड्डाणपुलाचं 'एरियल फुटेज' पाहायला मिळालं. यामध्येसुद्धा उड्डाणपुलाचा ढाचा हा व्हायरल होणाऱ्या फोटोसोबत मिळताजुळता दिसत नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, व्हायरल होणारा फोटो हा वैष्णव देवी उड्डाणपुलाचा नाही. खाली दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये वैष्णवदेवी उड्डाणपुलाचा ढाचा आपण पाहू शकतो.


व्हायरल होणारा फोटो कुठला आहे ?

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या फोटोचं रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर, अनेक रिपोर्टमध्ये हा फोटो असल्याचं दिसून आलं. 2012 साली 'ऑटो न्यूज' च्या रिपोर्टमध्ये हा फोटो शेअर केला गेला होता. रिपोर्टनुसार हा फोटो युक्रेनच्या क्रीव शहरातील शुल्यावस्का मेट्रो स्टेशनच्या नूतनीकरण प्रकल्पाचा आहे. या प्रकल्पाचे नाव 3 लेव्हल इंटरचेंज असं आहे. या प्रकल्पाबाबत 2013 च्या अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाईल असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.


तसेच रिपोर्टमध्ये प्रोजेक्ट डिझाईन क्रेडिट विक्टर पेट्रक यांना देण्यात आलं आहे. दरम्यान, मिस्टो साइटच्या 2017 च्या रिपोर्टमध्ये, प्रोजेक्ट डिझाईन निर्माते व्हिक्टर पेट्रुक यांनी त्यांचा 3 स्तरीय इंटरचेंज प्रकल्प अधिकृत प्रकल्पापेक्षा चांगला का आहे. तर मार्च 2019 च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, शुलियाव्स्का पुलाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे. याचं आधारावर आम्ही व्हिक्टर पेट्रुक बद्दल सर्च केले असता, व्हिक्टरने हे डिझाईन फेसबुकवर अनेक वेळा शेअर केले होते.
याव्यतिरिक्त, काही फेसबुक ग्रुपमध्ये सुद्धा त्यांनी या इंटरचेंज प्रकल्पाचे फोटो शेअर केले होते. दरम्यान, या ग्रुपची टाइमलाइन तपासल्यावर, आम्हाला या प्रकल्पा संबंधित एक व्हिडिओ देखील सापडला ज्यात प्रकल्पाची डिझाईन फ्रेमवर्क तयार करण्यात आली होती. जे व्हायरल होत असलेल्या फोटोप्रमाणे दिसत आहे.
अनेक वेबसाइटस आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या फोटोला जगातील वेगवेगळ्या शहरांमधील असल्याचं सांगितलं आहे. जसं की, नैरोबी, नायजेरिया. दरम्यान, बूम लाईव्हने या फोटोबद्दल एक फॅक्ट चेकिंग रिपोर्ट सुद्धा केला होता.

निष्कर्श:

एकंदरीत, भाजप समर्थकांनी केलेला दावा की, हा फोटो अहमदाबादच्या वैष्णवदेवी उड्डाणपुलाचा आहे. हा खोटा आणि भ्रामक आहे. खरं तर हा फोटो युक्रेनमधील शुलियाव्स्का मेट्रो स्टेशनसाठी बनवलेल्या एका प्रकल्पाचा आहे. या संदर्भात alt news वृत्त दिलं आहे. मुळ वृत्त तुम्ही येथे वाचू शकतात.

BJP समर्थकों ने वैष्णोदेवी फ़्लाईओवर की तस्वीर बताकर यूक्रेन के एक प्रोजेक्ट की तस्वीर शेयर की

Updated : 17 Aug 2021 1:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top