Home > Fact Check > Fact check : वाजपेयी सरकारने काढलेला नौदलाच्या ध्वजातील क्रॉस मनमोहन सिंह सरकारने पुन्हा जोडला?

Fact check : वाजपेयी सरकारने काढलेला नौदलाच्या ध्वजातील क्रॉस मनमोहन सिंह सरकारने पुन्हा जोडला?

Fact check : वाजपेयी सरकारने काढलेला नौदलाच्या ध्वजातील क्रॉस मनमोहन सिंह सरकारने पुन्हा जोडला?
X

2 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी यांनी नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. यामध्ये सेंट जॉर्ज क्रॉस वगळून शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेत नव्या लोगोची निर्मीती केली. यापुर्वीही वाजपेयी सरकारच्या काळात नौदलाच्या ध्वजातील क्रॉस वगळला होता. पण 2004 साली मनमोहन सिंह सरकारने क्रॉस पुन्हा नौदलाच्या ध्वजात जोडला, असा दावा केला जात आहे. पण खरंच अटलबिहारी वाजपेयी यांनी नौदलाच्या ध्वजातील वगळलेला क्रॉस मनमोहन सिंह सरकारने पुन्हा जोडला का? जाणून घेण्यासाठी वाचा फॅक्ट चेक...

नौदलाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नव्या लोगोचे अनावरण केले. या लोगोतील क्रॉस हटवून त्याजागी शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेत अष्टकोणी लोगो जोडण्यात आला तर वरच्या बाजूला तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे. नौदलाच्या लोगोच्या अनावरणानंतर अशा प्रकारे यापुर्वी वाजपेयींनी ध्वजातील क्रॉस हटवला होता. पण मनमोहन सिंह यांनी 2004 साली पुन्हा नौदलाच्या ध्वजात क्रॉस जोडल्याचा दावा प्रमुख माध्यमांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेत नौदलाने नवा लोगो तयार केला. या नव्या लोगोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथे अनावरण केले. या नव्या लोगोत नौदलाच्या ध्वजावरील सेंट जॉर्जचा क्रॉस हटवून आला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेत ढाल जोडली आहे. या नव्या ध्वजावर 'शं नो वरूणः' असे लिहीले आहे. यापुर्वी नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्जचा क्रॉस होता. ज्यामध्ये वरच्या बाजूला तिरंगा तर त्यामध्ये राष्ट्रीय चिन्ह असलेले सत्यमेंव जयते या मुद्रेचा समावेश होता.

पंतप्रधान मोदी यांनी नौदलाच्या लोगोचे अनावरण केल्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी चर्चा घडवून आणली. यामध्ये असा दावा केला आहे की, यापुर्वीही अटलबिहारी वाजपेयी यांनी सेंट जॉर्जचा क्रॉस हटवला होता. मात्र 2004 मध्ये काही कारणांनी पुन्हा एकदा सेंट जॉर्जचे क्रॉस जोडण्यात आले. यासाठी काही वृत्तवाहिन्या आणि भाजप नेत्यांनी तात्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना जबाबदार धरले. तसेच हा बदल करत असताना देशात UPA चे सरकार होते आणि डॉ. मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते, असाही दावा करण्यात आला. तसेच सोनिया गांधी यांचा सेंट जॉर्ज क्रॉसशी संबंध असल्यानेच नौदलाच्या ध्वजात पुन्हा क्रॉस जोडण्यात आला, असा आरोप भाजपने केला आहे.

30 ऑगस्ट रोजी इंडिया टुडे (India Today) चॅनलच्या 5ive Live शोमध्ये अँकर शिव अरूरने दावा केला की, 2001 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी नौदलाच्या ध्वजातील सेंट जॉर्ज क्रॉस हटवला होता. मात्र 2004 मध्ये नौदलाच्या ध्वजावर पुन्हा सेंट जॉर्ज क्रॉस जोडण्यात आला. याच शोमध्ये इंडिया टुडेचे मॅनेजिंग एडिटर आणि अँकर गौरव सावंत यांनीही असाच दावा केला. शिव अरूर याने शो सुरू करताना गौरव सावंत यांचा परिचय देतांना म्हटले की, 2001 मध्ये अटलबिहारी वाजपेयींनी नौदलाच्या ध्वजावरील हटवलेला क्रॉस 2004 मध्ये मनमोहन सिंह सरकारने पुन्हा जोडल्याची बातमी गौरव सावंत यांनी सगळ्यात आधी कव्हर केली होती. मात्र याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, शिव अरूर डिफेंस आणि एरोस्पेस न्यूज वेबसाईट LiveFist चे संस्थापक सुध्दा आहेत.

31 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा शिव अरुर (Shiv Arur) याने इंडिया टुडेच्या डिजिटल न्यूज व्हिडीओ व्हर्टिकल (News Video Vertical) NewsMO मध्येही दावा केला की, डॉ. मनमोहन सिंह यांनी सेंट जॉर्ज क्रॉस नौदलाच्या ध्वजात पुन्हा जोडला. यासंदर्भातील ट्वीट इंडिया टुडेने केले आहे.

आज तकचे कन्सल्टिंग एडिटर आणि अँकर सुधीर चौधरी यांनीही 1 सप्टेंबर रोजी त्यांच्या ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमात हाच दावा केला. यामध्ये त्यांनी म्हटले की, 2001 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी इंडियन नेव्हीच्या ध्वजावरील सेंट जॉर्ज क्रॉस हटवला. मात्र 2004 मध्ये डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारने नेव्हीच्या ध्वजात पुन्हा एकदा क्रॉस जोडला.

2 सप्टेंबर रोजी भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही हाच दावा करत काँग्रेसवर निशाणा साधला. यामध्ये भाजप नेते तेजस्वी सुर्या आणि ताजिंदर सिंह बग्गा यांनी ट्वीट करून म्हटले की, 2004 मध्ये डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान बनल्यानंतर सेंट जॉर्ज क्रॉस पुन्हा नौदलाच्या ध्वजावर जोडण्यात आला.

उजव्या विचारसरणीचे एन्फ्लुएंसर अंशुल सक्सेना आणि गोवा भाजपनेही हे ट्वीट करत असाच दावा केला होता. मात्र अंशूल सक्सेना यांनी नंतर हे ट्वीट डिलीट केले.

यानंतर काही वृत्तवाहिन्यांनीही 2004 मध्ये सेंट जॉर्ज क्रॉस पुन्हा जोडण्यासाठी काँग्रेसला आणि तात्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना जबाबदार धरले. 2 सप्टेंबर रोजी आज तकच्या (Aaj Tak) अँकर श्वेता त्रिपाठी (Shweta Tripathi) यांच्या 'दंगल' या शोमध्ये (Dangal Show) भाजप प्रवक्त्याने एक ग्राफिक्स दाखवले. यामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी 2001 मध्ये नौदलाच्या ध्वजावरील सेंट जॉर्ज क्रॉस हटवल्याचा दावा केला. मात्र काँग्रेसने पुन्हा एकदा 2004 मध्ये सें

जॉर्ज क्रॉस नौदलाच्या ध्वजात जोडला. यावरून श्वेता त्रिपाठी यांनी काँग्रेस प्रवक्ते अलोक वर्मा यांना म्हटले हे खरं आहे की, 2001 ते 2004 मध्ये नौदलाच्या ध्वजात बदल केले होते. मात्र 2004 मध्ये सेंट जॉर्ज क्रॉसचा पुन्हा समावेश करण्यात आला. त्यामुळे त्याबद्दल एवढं प्रेम कुणाला होतं, असा प्रश्न तर विचारला जाईलच, असं श्वेता त्रिपाठी म्हणाल्या.

3 सप्टेंबर रोजी इंडिया टुडेचे मुख्य संपादक आणि चेअरमन (India TV editor in chief Rajat Sharma) रजत शर्मा यांनी त्यांचा शो 'आज की बात' (Aaj ki Bat) मध्ये दावा असाच दावा केला होता. त्यामध्ये रजत शर्मा म्हणाले होते की, 2001 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी इंग्रजांची निशाणी असलेला सेंट जॉर्ज क्रॉस हटवला होता. मात्र 2004 मध्ये मनमोहन सरकार आले आणि त्यांनी ते निशाण पुन्हा नौदलाच्या ध्वजात जोडले.

काय आहे सत्य? (Reality Check)

भाजपसहीत काही प्रमुख वृत्तवाहिन्यांच्या अँकरने दावा केला की, मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळात पुन्हा एकदा नौदलाचा सेंट जॉर्ज क्रॉस असलेला ध्वज आणण्यात आला. पण हा दावा खरा आहे भ्रामक आहे. तो कसा ते पाहूयात...

या दाव्यासंदर्भातील सत्य जाणून घेण्यासाठी अल्ट न्यूजने अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात झालेल्या बदलांचे दस्तऐवज मिळवण्यासाठी गूगल एडव्हान्स सर्चचा उपयोग केला. यात गुगलवर डेट फिल्टर आणि वेबसाईट फिल्टर याचा उपयोग करत की-वर्ड सर्च केले. त्यानुसार भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) च्या वेबसाईटवर 2001 चे अर्काईव्ह मिळाले. यात 8 ऑगस्ट 2001 रोजी जारी केलेली एक प्रेस रिलीज मिळाली. या प्रेस रिलीजमध्ये दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट 2001 रोजी इंडियन नेव्हीच्या नव्या ध्वजात बदल करून त्यातील सेंट जॉर्ज क्रॉस हटवून नवे चिन्ह जोडण्याविषयी सांगितले आहे. या मिळालेल्या माहितीनंतर अल्ट न्यूजने गूगल फिल्टरवर डेट फिल्टर आणि फाईल फिल्टरच्या मदतीने काही की-वर्डस् सर्च केले. त्यात या प्रेस रिलीजची ओरिजिनल स्कॅन कॉपी दिसून आली. ही स्कॅन कॉपी PIB च्या वेबसाईटवर पहायला मिळते. या दोन्ही कॉपी खालील ग्राफिक्समध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

यासंदर्भातील अधिक माहिती मिळवण्यासाठी अल्ट न्यूजने लोकसभेच्या वेबसाईटचा धांडोळा घेतला. त्यामध्ये एक Unstarred प्रश्न मिळाला. यामध्ये शाजापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार थावरचंद गेहलोत यांनी संरक्षण मंत्रालयाता प्रश्न विचारला होता की, भारतीय नौदलाचे युध्दपोत आणि पानबुड्यांवर सेंट जॉर्जचा विदेशी झेंडा फडकवला जातो. पण आपल्या सरकारने यावरील झेंडा बदलाला परवानगी दिली आहे? यावर तात्कालिन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी 21 मार्च 2002 रोजी या प्रश्नावर उत्तर देतांना म्हटले होते की, सगळे भारतीय नौदलाचे जहाज, पानबुड्या आणि तटरक्षक दलाकडे भारतीय नौदलाचा ध्वज आहे. 26 जानेवारी 1950 नंतर भारतीय नौदलाचे जहाज आणि पानबुड्या यावर नौदलाचा ध्वज दिसून येत आहे. ज्यामध्ये रेड क्रॉसने चार भागात विभाजित केले आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला भारतीय ध्वज होता. 15 ऑगस्ट 2001 पासून भारतीय नौदलाचे जहाज, पानबुड्या आणि तटरक्षक दलाच्या जहाजांवर भारतीय नौदलाचा नवा ध्वज आहे.

2004 मध्ये भारतीय नौदलाच्या ध्वजात बदल करण्यात आलेल्या बदलासंदर्भात माहिती गोळा करण्यासाठी गूगलच्या डेट फिल्टरसोबत की-वर्ड्स सर्च करण्यात आले. त्यात अल्ट न्यूजला रेडिफच्या वेबसाईटवर 24 एप्रिल 2004 मध्ये प्रकाशित झालेली एक बातमी मिळाली. या बातमीत दिलेल्या माहितीनुसार 25 एप्रिल 2004 मध्ये भारतीय नौदलाच्या ध्वजात सेंट जॉर्ज क्रॉस पुन्हा जोडण्यात आला. यासाठी भारतीय नौदलाने केलेली तक्रार कारणीभूत होती. यामध्ये असंही म्हटलं होतं की, 2001 मध्ये सेंट जॉर्ज क्रॉस हटवून नवे निशाण जोडण्यात आले. पण नेमकी अडचण ही होती की, आकाश आणि समुद्राचा रंग निळा असल्याने निळ्या रंगाचा ध्वज दूरवरून दिसून येत नव्हता. त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घायला हवी की, ही तक्रार केली त्यावेळी 25 एप्रिल 2004 या तारखेला अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंह यांनी 22 मे 2004 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

यासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अल्ट न्यूजने 'The Hindu'या दैनिकाची 24 एप्रिल 2004 रोजी प्रसिध्द झालेल्या बातम्यांचे अर्काईव्ह चेक केले. त्यामध्येही नौदलाच्या ध्वजातील बदलासंदर्भात माहिती मिळाली. त्यात 'फायनान्शियल एक्सप्रेस' (Financial Express) च्या अर्काईव्हमध्ये यासंदर्भातील बातमी 24 एप्रिल 2004 रोजी प्रकाशित झाली असल्याचे आढळून आले. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते.

वरील माहिती मिळाल्यानंतर यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे अल्ट न्यूजच्या टीमने राज्यसभेची वेबसाईट धुंडाळली. त्यात एक Unstarred प्रश्न मिळाला. यामध्ये तात्कालिन राज्यसभा सदस्य एकनाथ के ठाकुर यांनी संरक्षण मंत्रालयाला प्रश्न विचारला होता की, काय हे खरं आहे का? की, भारतीय नौदल आपल्या जहाजांना, पानबुड्यांना नवा ध्वज, लोगो आणि पेंडेटने सजवू इच्छित आहे का? जर हे खरं असेल तर त्याचे कारण काय आहे? त्यावर तात्कालिन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांनी 14 जुलै 2004 रोजी नौदलाने नवा लोगो, ध्वज आणि पेंडेट सादर केले आहे. या ध्वजात बदल करण्याचे कारण हे आहे की, झेंड्यात नीळा आणि पांढरा रंग जो दूरवरून सहजरित्या स्पष्ट दिसू शकत नव्हता. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना बदल करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

वरील सर्व माहिती पाहिल्यानंतर आज तक, इंडिया टुडे, आज तक, इंडिया टीव्ही न्यूज आणि भाजप नेत्यांनी खोटा दावा केला आहे. त्यामुळे असं सांगितलं आहे की, 2001 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी नौदलाच्या ध्वजातील सेंट जॉर्ज क्रॉस हटवला होता. मात्र जेव्हा 2004 मध्ये UPA सरकार असताना मनमोहन सिंह पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांनी नौदलाच्या ध्वजात सेंट जॉर्ज क्रॉस पुन्हा जोडला. खरंतर हा बदल 2001 ते 2004 या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झाला होता. त्यावेळी युपीएचे सरकार नव्हते.

आज तकने एक फॅक्ट चेक आर्टिकलमध्ये भाजप नेत्यांचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांनी आपल्या स्वतःच्या अँकरने खोटा दावा केल्याचे कुठेही म्हटले नाही. यापुर्वीही आज तकने अनेक वेळा स्वतः चुकीची बातमी चालवून त्याच पसरलेल्या अफवेचे फॅक्ट चेक केले आहे.

अपडेट (Update) : अल्ट न्यूजने केलेल्या फॅक्ट चेकनंतर इंडिया टुडेच्या अँकर शिव अरुर याने 16 सप्टेंबर रोजी एक ट्वीट करून यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये त्याने 30 ऑगस्ट रोजी 5ive Live मध्ये नौदलाच्या बदललेल्या ध्वजातील बदलासंदर्भातील फॅक्ट चेकमध्ये लिहीले आहे की, नौदलाच्या ध्वजात झालेल्या बदलासंदर्भात माझा एक शो होता. त्यामध्ये मला 2004 मध्ये सेंट जॉर्ज क्रॉस इंडियन नेव्हीच्या झेंड्यात पुन्हा जोडल्याची चुकीची माहिती मिळाली होती. या माहितीमागे कोणतीही चुकीची भावना नव्हती. मात्र हे चुकीला कमी करू शकत नाही. त्यामुळे मी स्पष्ट करू इच्छितो की, ध्वजामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव इंडियन नेव्हीने दिला होता.

16 सप्टेंबर रोजी सायंकाळी इंडिया टुडे ने 5ive live शोमध्ये झालेल्या चुकीचे स्पष्टीकरण दिले आहे.

यासंदर्भात अल्ट न्यूजने फॅक्ट चेक केलं आहे.


भाजपा नेताओं, मीडिया चैनल्स का झूठा दावा: 2004 में UPA ने नेवी ध्वज में 'सेंट जॉर्ज क्रॉस' फिर से जोड़ा


Updated : 22 Sep 2022 11:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top