Home > Fact Check > गायीचे मांस खाल्ले म्हणून 1लाख 38 हजार लोकांना अमूलने काढले? काय आहे सत्य?

गायीचे मांस खाल्ले म्हणून 1लाख 38 हजार लोकांना अमूलने काढले? काय आहे सत्य?

गायीचे मांस खाल्ले म्हणून 1लाख 38 हजार  लोकांना अमूलने काढले? काय आहे सत्य?
X

Photo courtesy : social media

अमूल दूध कंपनीने अलीकडेच आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींसह दुधाच्या किंमती वाढल्याने सामान्य माणसाच्या खिशावर वाईट परिणाम झाला आहे. याच दरम्यान अमूल दुधाशी संबंधित एक दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे. या दाव्यात अमूल कंपनीचे मालक आनंद सेठ यांनी गायीचे मांस खाल्ल म्हणून 1 लाख 38 हजार लोकांना कामावरुन काढून टाकल्याचा मेसेज सध्या व्हायरल केला जात आहे.

'श्री राधे कृष्ण' या फेसबुक युझर्सने 'केंद्रीय मंत्री स्मृती इराणी - अमेठी खासदार', 'कंगना राणौतचे चाहते. (अभिनेता)', 'मुख्यमंत्री - योगी आदित्यनाथ जी' यांच्या नावाने असलेल्या फेसबुक ग्रुपमध्ये हा दावा शेअर केला आहे. यासंदर्भात लिहिलेल्या पोस्टला हजारो लोकांनी लाइक केलं आहे.


भाजप समर्थक युविका शर्मा यांनी देखील या संदर्भात ट्विट केलं आहे.काय आहे सत्य?

सर्वप्रथम, अमूल कंपनीचा कुणीही मालक नाही. अमूल गुजरात ऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन लिमिटेड (GCMMF) द्वारे संचालित आहे. म्हणजेच अमूलचे मालक आनंद सेठ असल्याचा दावा खोटा आहे. याशिवाय शामलभाई बी पटेल हे GCMMF चे अध्यक्ष आहेत. वालमजीभाई आर हंबल हे उपाध्यक्ष आहेत. आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोधी आहेत. GCMMF ची स्थापना 1973 मध्ये झाली. अमूलचे मुख्यालय गुजरातमधील आनंद शहरात आहे.
पुढे, ऑल्ट न्यूजने व्हायरल दाव्याशी संबंधित मीडिया रिपोर्ट शोधले. परंतु सोशल मीडियावरील दाव्याची पुष्टी करणारा कोणताही मीडिया अहवाल त्यांना मिळाला नाही.

या व्हायरल दाव्याबद्दल बीबीसीने अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोधी यांच्याशी बोलले. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "आम्हाला माहित नाही की अशा प्रकारच्या बातम्या कशा पसरवल्या जात आहेत. गेल्या दोन वर्षात आम्ही आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढले नाही. कारण आमचा व्यवसाय वाढत आहे. आम्ही जर कोणाला बाहेर काढले तरी त्याचा आधार धर्म कधीच असू शकत नाही.

आर.एस. सोढी यांचे म्हणणे आहे की, अमूलच्या कारखान्यांमध्ये 16 हजार ते 17 हजार कर्मचारी काम करतात. सोधी यांनी सामाजिक-धार्मिक पार्श्वभूमीवर नव्हे तर गुणवत्तेच्या आधारावर कर्मचाऱ्यांच्या निवडीबद्दल बोलले.

निष्कर्श:

म्हणजेच, अमूल कंपनीने गायीचे मांस खाणारे 1 लाख 38 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे बनावट आहे. अमूलने अलीकडे असे कोणतेही पाऊल उचलले नाही.

Updated : 2021-08-11T14:45:00+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top