Home > Fact Check > Fact Check : २२ वर्षाच्या मुलाचं ५२ वर्षांच्या महिलेशी लग्न? न्यूज चॅनेल्स ने स्क्रिप्टेड व्हिडिओला सत्य मानलं

Fact Check : २२ वर्षाच्या मुलाचं ५२ वर्षांच्या महिलेशी लग्न? न्यूज चॅनेल्स ने स्क्रिप्टेड व्हिडिओला सत्य मानलं

Fact Check : २२ वर्षाच्या मुलाचं ५२ वर्षांच्या महिलेशी लग्न? न्यूज चॅनेल्स ने स्क्रिप्टेड व्हिडिओला सत्य मानलं
X

मुख्य प्रवाहातील काही माध्यमांनी नुकतीच एक बातमी प्रसिद्ध केली. यात एका २१/२२ वर्षांच्या मुलानं ५२ वर्षांच्या महिलेशी लग्न केलं, अशी ती बातमी होती. या बातमीत या नवविवाहित जोडप्याची कुठल्याही प्रकारची माहिती दिली नव्हती, मात्र त्यांचा व्हिडिओ शेयर करण्यात आला होता. बातमी हे स्पष्ट करण्यात आले होते की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला म्हणून.

आज तक सारख्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने ही स्वतःच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेयर केला होता. त्याला ४५ हजार पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते, मात्र नंतर त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केला.



आज तक प्रमाणेच एबीपी न्यूज, झी न्यूज़, NDTV, टीवी9 भारतवर्ष, टाइम्स नाउ, न्यूज़24, झी राजस्थान, टीवी9 तेलुगू, झी न्यूज़ तमिळ, वन इंडिया, एशियानेट न्यूज़, लोकमत, लेटेस्टली, सच तक (मनीष कश्यप ची वेबसाइट) आणि लक्ष्य मीडिया यांनी देखील हा व्हायरल व्हिडिओ शेयर केला आहे.


























टाइम्स नाऊ नवभारत ने हा व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट करत लिहिले होते की, "२१ वर्षांचा नवरदेव, ५२ वर्षांची नवरी ! " ऑल्ट न्यूज ने हे फॅक्ट चेक करेपर्यंत टाइम्स नाऊ नवभारत च्या फेसबुक पेज वर हा व्हिडिओ १० हजार वेळा पाहिला गेला होता. त्याचवेळी टाइम्स नाऊ नवभारत च्या युट्युब चॅनेल वर देखील ५ हजार वेळा हाच व्हिडिओ पाहण्यात आला होता.





आज तक चॅनेल ने १४ डिसेंबर रोजी हाच व्हिडिओ फेसबुक पेज वर पोस्ट करत लिहिले होते की, " जेव्हा गोष्ट संबंधांची येते तेव्हा वयाच्या मर्यादा नसतात ". ऑल्ट न्यूज ने फॅक्ट चेक करेपर्यंत या व्हिडिओ ला ५ लाख व्ह्यूज, १० हजार लाईक्स, ३,५०० कमेंट्स आणि ९७७ नेटिझन्सनी हा व्हिडिओ शेयर देखील केला होता. आज तक च्या इंस्टाग्राम वर या व्हिडिओ ला ७ लाख २ हजार वेळा पाहिले गेले, शिवाय ६६ हजार लाईक्स देखील मिळाले आहेत.











आज तक चा न्यूज ॲंकर शुभांकर मिश्रा ने देखील हा व्हिडिओ शेयर करत असं लग्न झाल्याचा दावा केला होता.





Fact Check

ऑल्ट न्यूज ने युट्युब वर जाऊन की-वर्ड टाकून या व्हिडिओची माहिती घेतली तेव्हा लक्षात आले की, कित्येक चॅनेल्स ने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. साडेदहा लाख सब्सक्राइबर्स असलेल्या 'ऑल इन वन न्यूज' चॅनेल ने या व्हिडिओ साठी इंस्टाग्राम यूज़र ‘@techparesh' ला क्रेडिट दिले होते. हाच व्हिडिओ दोन आठवड्यांपूर्वी इंस्टाग्राम यूज़र ‘@techparesh याच्या टाइमलाइन वर पोस्ट करण्यात आला होता. या इस्टांग्राम वर या व्हिडिओ ला १ कोटी ६८ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या इंस्टाग्राम यूज़र च्या अकाऊंटवर सर्व व्हिडिओ हे विवाह/संबंधांवर आधारित आहेत.

ऑल्ट न्यूज ला फॅक्ट चेक दरम्यान लक्षात आले की, व्हायरल व्हिडिओ दिसणारा २२ वर्षीय नवरदेव हाच इंस्टाग्राम वरील ‘@techparesh या अकाऊंटवर देखील रिलेशनशिप बद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगताना दिसतो. हाच नवरदेव ‘@techparesh याच इंस्टाग्राम अकाऊंटवरील एका व्हिडिओत दोन मुलींचा प्रेमी म्हणून ही अभिनय करताना दिसतोय.

याशिवाय, १४ डिसेंबर २०२२ रोजी हाच तथाकथित नवरदेव एका व्हिडिओत त्याच्या वयाच्या एका दुसऱ्या मुलीसोबत दाखवण्यात आला आहे. यात तो मुलगा मुलीशी लग्न करायला नकार देत असल्याचं दाखवण्यात आले आहे.





आता दुसऱ्या बाजूला व्हायरल व्हिडिओ मधील ५२ वर्षीय महिला देखील रिलेशनशिप च्या विविध व्हिडिओ मध्ये दिसते. इंस्टाग्राम च्या ‘@techparesh' याच अकाऊंटवर ही महिला एका व्हिडिओत दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न करण्यासंदर्भात बोलताना दिसते. या व्हिडिओतील व्यक्ती स्वतःचं वय २२ वर्ष तर महिला स्वतः ५२ वर्षांची असल्याचा दावा करत आहे.






हा सगळा घटनाक्रम पाहिल्यावर लक्षात येते की, इंस्टाग्राम चॅनेल वर स्क्रिप्टेड व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता, त्यालाच सत्य समजून विविध प्रसार माध्यमांनी शेयर केला. २२ वर्षांच्या मुलाचं ५२ वर्षांच्या महिलेशी लग्नाचा व्हिडिओ हा स्क्रिप्टेड होता. व्हायरल व्हिडिओतील मुलगा आणि महिलेला कित्येक नाट्यरूपांतर असलेल्या व्हिडिओ मध्ये या आधीही पाहिले गेले आहे.

नोट : यासंदर्भात अल्ट न्युज ने देखिल फॅक्ट चेक केलं आहे

https://www.altnews.in/hindi/no-22-yr-old-man-didnt-marry-52-yr-old-woman-news-outlets-fell-for-scripted-video/

Updated : 12 Feb 2023 10:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top