Home > Environment > Kolhapur Weather Update | कोल्हापूरचा पाऊस ओसरला

Kolhapur Weather Update | कोल्हापूरचा पाऊस ओसरला

Kolhapur Weather Update | कोल्हापूरचा पाऊस ओसरला
X

कोल्हापूर मधील पावसाचा जोर आता थोडाफार ओसरला आहे. येथील महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणी पातळी अजूनही 40 फूट 5 इंचावर स्थिर आहे. यातच राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) पाच पैकी एक दरवाजा बंद झाल्याने दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरकर आता सुखावल्याचे दिसून येत आहे. पण धरणाचे चार दरवाजे अद्यापही सुरूच आहेत. गेल्या 20 तासापासून पंचगंगा नदीची पाणीपातळी सुद्धा स्थिरावली आहे.

दरम्यान राधानगरी धरणाचे काल 26 जुलै 2023 रोजी 5 दरवाजे उघडल्यानंतर भोगावती नदीतून 8540 क्यूसेक पाण्याचा प्रवाह पंचगंगा नदीच्या दिशेने सुरू आहे. आज 27 जुलै 2023 सकाळी 8 पर्यंत तारळे बंधारा येते 6 फूट, शिरगाव बंधारा येथे 9 फूट आणि राशिवडे बंधारा येथे 2 फूट 6 इंच पाणी पातळी वाढली आहे.

Updated : 27 July 2023 8:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top