Home > Environment > माऊंट ऑलम्पिक ते डेल्फीचा ग्रीस..

माऊंट ऑलम्पिक ते डेल्फीचा ग्रीस..

ग्रीस म्हंटले कि डोळ्या समोर येतो तो निळाशार समुद्र, पांढऱ्या आणि निळ्या रंगाची सुंदर एकमेकांना जोडलेली घरे आणि डॅफोडिलची रंगबेरंगी फुले..प्राचीन इतिहास आणि अविस्मरणीय निसर्गाने नटलेल्या ग्रीसच्या प्रवासवर्णन कहाणी मयुरी भिलारे यांच्याकडून...

माऊंट ऑलम्पिक ते डेल्फीचा ग्रीस..
X

सँटोरिनीचा जगप्रसिद्ध सूर्यास्तग्रीस म्हंटले कि डोळ्या समोर येतो तो निळाशार समुद्र, पांढऱ्या आणि निळ्या रंगाची सुंदर एकमेकांना जोडलेली घरे आणि डॅफोडिलची रंगबेरंगी फुले पण माझ्या नुकत्याच प्रवासात जो ग्रीस मी अनुभवाला तो या सगळ्यांच्या पलीकडे होता. प्राचीन इतिहास, १००० वर्षापेक्षा हि जुनी मंदिरे, पुरातन सभ्यतेतील घरे, मेकिंईन ते रोमन साम्राज्यातील अजून हि जतन करून ठेवलेल्या गोष्टी आणि त्यांना साथ देण्यासाठी माऊंट ऑलम्पिक ते डेल्फी परेंत पसरलेले उंचच उंच डोंगर रंगा


द पार्थेनॉन


अथेन्स

अथीना या ग्रीक देवी वरून या शहराला हे नाव पडले आणि हि ग्रीकची सध्याची राजधानी आहे. ग्रीक पौराणिक कथाच्या प्रमाणे इकडे पोईसडेन (समुद्र देवता) आणि अथीना यांच्यात युद्ध झाले ज्यात पोईसडेनला मात देत अथीना विजयी झाली आणि तेथून या शहराला पडलेले हे नाव अथेन्स.

अॅक्रोपॉलिस, ज्याचा ग्रीक अर्थ होतो उंचावरील गाव हे तेथील सर्वात मोठील आकर्षण. अॅक्रोपॉलिस हे जगातील सर्वात प्रसिद्ध प्राचीन पुरातत्व स्थळांपैकी एक आहे.



अॅक्रोपॉलिस



अॅक्रोपॉलिसवर अनेक ग्रीक देवांची मंदिरे आहेत पण सर्वात मोठे आकर्षण आहे ते द पार्थेनॉन. ५ व्या शतकात अथीनासाठी बांधलेले एक भव्य पण सुंदर आणि कोरीव संगमरवरी मंदिर. हे ग्रीकने पाहिलेले सर्वात मोठे आणि भव्य मंदिर होते.

शतकानुशतके, पार्थेनॉनने भूकंप, आग, युद्धे, स्फोट आणि लूटमार यांचा सामना केला, तरीही ते प्राचीन ग्रीस आणि अथेनियन संस्कृतीचे शक्तिशाली प्रतीक राहिले. आजही हे जगातील सर्वात मान्यताप्राप्त इमारतींपैकी एक आहे.

१६०० च्या शतकात रोमन, ऑट्टोमन, अश्या अनेक साम्राज्यात मतभेद आणि युध्य झाली. त्यामध्ये ग्रीकची अनेक शहरे आणि मंदिरे उध्वस्त झाली आणि त्यात अॅक्रोपॉलिस आणि त्याचा आजूबाजूचा परिसरही अपवाद ठरला नाही. आजही अथेन्स मध्ये जागोजागी सुंदर पण मोडकळीस आलेली मंदिरे आहेत.

ग्रीकला दाक्षिणात्य संस्कृतीचे जन्मस्थान मानले जाते, कला, वाणिज्य, गणित, विज्ञान या सर्वांमध्येच ग्रीक संस्कृतीचा खूप मोठा वाट आहे. ही सुंदर, कोरीव आणि विचारपूर्वक बांधकामाने आणि मंदिरे बघून याची जाणीव तुम्हाला जागोजागी होते. मुळात अथेन्स आणि त्याचा आजूबाजूचा परिसर इतिहास प्रेमींसाठी एक वेगळीच सहल आहे.


डेल्फी

अथेन्सच्या २०० किलोमीटर अंतरावर मोठ्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेले छोटे गाव. येथील मुख्य आकर्षण म्हणजे प्राचीन इतिहासातील ८ व्या शतकात बांधलेली मंदिरे, टेम्पल ऑफ अपोलो म्हणजेच सूर्यदेवाचे मंदिर आणि ओरॅकल ऑफ डेल्फी

१४०० काळात ओरॅकल आणि तेथील पुरोहित पायथिया यांना महत्वाचे स्थान होते. ती भविष्याबद्दल भाकीत सांगण्यासाठी संपूर्ण प्राचीन जगामध्ये प्रसिद्ध होती आणि सर्व मोठ्या उपक्रमांपूर्वी त्यांचा सल्ला घेतला जात असे.



टेम्पल ऑफ अपोलो

ऑलिम्पिकनंतर ग्रीसमधील दुसरा सर्वात महत्त्वाचा खेळ असलेल्या पायथियन गेम्सचे देखील ते घर होते. ख्रिश्चन धर्माच्या वाढीसह डेल्फी नाकारले गेले आणि शेवटी १८०० व्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत नवीन गावाच्या जागेखाली गाडले गेले.

आजही इंग्रजीत ओरॅकलचा अर्थ भविष्य सांगणारा आरसा असाच होतो. जर तुम्हीही कधी डेल्फीच्या वाटेवर असाल तर त्याच्या आजूबाजूच्या सुंदर आणि छोट्या गावांना नक्कीच भेट दया. मला सर्वात जास्त आवडलेले गाव म्हणजे गॅलॅक्सिडी. समुद्रकिनारी वसलेले सुमारे ३००० लोकवस्ती असलेले छोटेसे पण अत्यंत सुंदर असे हे गाव. पर्यटाकांसाठी एक सुंदर अनुभव आहे.



ओरॅकल ऑफ डेल्फी

३ दिवसाच्या इतिहास सहल नंतर वेळ होती ती समुद्राकडे वळण्याची. पुढील १० दिवस आम्ही सँटोरिनी, पारोस, मिलोस अश्या सुंदर बेटांवर काढली.



सँटोरिनी

ग्रीसमधील सर्वात जास्त पर्यटकांना आकर्षित करणारे शहर. सँटोरिनी हे एजियन समुद्रातील सायक्लेड बेटांपैकी एक आहे. इ.स.पूर्व १६ व्या शतकात ज्वालामुखीच्या उद्रेकाने ते उद्ध्वस्त झाले होते पण त्यामुळेच त्याला दुर्मिळ नैसर्गिक सौंदर्य, विलक्षण ज्वालामुखी किनारे आणि चंद्रकोर आकार मिळाला

समुद्रकिनारी डोंगराच्या कडेवर वसलेले ज्वालामुखीच्या उद्रेकाने बनलेले हे सुंदर ठिकाण. येथील २ मोठी गावे फिरा आणि ओईआ प्रसिद्ध आहेत ती त्यांच्या पांढऱ्या आणि निळ्या रंगांच्या घरे, पवनचक्या आणि विस्मरणीय सूर्यास्तासाठी.


सँटोरिनीचा जगप्रसिद्ध सूर्यास्त



हे ग्रीस मधील सर्वात लोकप्रिय बेट असल्याने, इतर बेटांपेक्षा इथे पर्यटकांची जास्तच गर्दी तुम्हाला दिसते. रोज हजाराहून अधिक पर्यटक ओईआच्या छोट्या टेकडीवर जमतात ते जगातील सर्वात सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी. सँटोरिनीमध्ये लाल, पांढया आणि काळ्या रंगाचे लाव्हाने बनलेले सुंदर समुद्रकिनारे आहेत. जगातील अनेक महाग पण नयनरम्य हॉटेल्स इथे आहेत. तुम्ही हे संपूर्ण बेट ३-४ तासात पार करू शकता आणि त्यासाठी १५ km ची आखून दिलेली पायवाट आहे.

द्राक्षांच्या गुणवते मूळे येथील वाईन्स खूप प्रसिद्ध आहेत आहेत आणि त्यामुळे जागोजागी तुम्हाला लहान विनयार्डस म्हणजेच वाईन बनवण्यासाठी तयार केलेल्या द्राक्षांच्या बागा दिसतील.

सँटोरीनीचा आजूबाजूचा परिसरही खूप निसर्गरम्य आहे आणि तुम्ही तो नौका आणि ज्वालामुखी सहलीतुन बघू शकता. ज्वालामुखी उद्रेकानंतर येथील पाण्याखालील जीवन एवढे संपन्न नसले तरी समुद्रात डायव्हिंग करायची संधी सोडू नका. तो एक उत्तम अनुभव असेल



सँटोरिनी

सॅंटोरिनीमध्ये प्रवास करताना काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे:

१) हे बेट वर्षभर पर्यटकाने गजबजलेले असते त्यामुळे येथील जेवण आणि राहणे इतर शहरांपेक्षा महाग आहे

२) प्रसिद्ध रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला नेहमीच गर्दी मिळेल त्यामुळे आधीच टेबल बुक करायची तयारी ठेवा

३) अरुंद रस्ते, पर्यटकांची लोकसंख्या त्यांच्या स्थानिक रहिवाशांपेक्षा जास्त असल्यामूळे जागोजागी तुम्हाला ट्रॅफिक मिळेल तर थोडावेळ हाताशी बाळगूनच तयारी करा

या काही गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्ही योग्य नियोजन केले तर सँटोरीनीची भेट खरंच आर्विसमरणीय ठरेल



पारोस आणि मिलोस

अविश्वसनीय, शांत आणि निसर्गरम्य. ही बेटे सँटोरिनी इतकी प्रसिद्ध नसली तरी ही सुंदरतेत कुठेही मागे नाहीत. उलट माझ्या संपूर्ण ग्रीस प्रवासात मला सर्वात जास्त आवडलेली ही शहरे. सँटोरिनी हे वर्षभर पर्यटकाने भरलेले असते त्यामुळे तुम्हाला निसर्गात एकांत मिळणे थोडे अवघड आहे. तो एकांत आणि शांतता आम्हला पारोस आणि मिलोस मध्ये मिळाला.

निळेशार आणि अगदी तळ दिसे परेंतचे शुद्धपाणी, पांढऱ्या रेती आणि खडकांची बनलेले समुद्र किनारे चंद्रावर आल्या सारखा भास देतात, आणि मासेमारांची इवलीशी गावे तुम्हला एका वेगळाच विश्वात घेऊन जातात

मिलोस मध्ये आम्ही एक वैयक्तिक बोट भाड्याने घेतली आणि दिवसभर सुंदर पण एकमेकांहून वेगळे असे समुद्र किनारे पहिले. या बेटांवर अशी कित्तेक किनारे आहेत जिथे तुम्ही रस्त्याने नाही तर फक्त बोटीनेच जाऊ शकता. हे समुद्र किनारे पर्यटकांच्या गर्दी पासून अलूप्त आहेत आणि त्यांचे नैसर्गिक सौंदर्य मंत्रमुग्ध करणारे आहे

पुढील ३ दिवस आम्ही अशेच किनारे, संगमनरावरी घरे असलेली छोटी गावे बघण्यात, पोहण्यात, आणि क्लीफ जम्पिंग (टेकडीवरून सरळ समुद्रात उडी) करण्यात घालवली. जेव्हा आम्ही परतीच्या वाटेवर लागलो तेव्हा तो निळाशार समुद्र, नजर जाईल तिथपरेंत पसरलेले क्षितिज डोळ्यासमोर अजूनही तरंगत होते.


Lefkes पारोस मधील एक गाव


मला आवडलेली काही ग्रीक पाककृती (Greek Cuisine) –

ग्रीकच्या जेवणात तुम्हाला इटली आणि तुर्की जेवणाची झलक दिसते. येथील जेवणात मांसाहार आणि भाज्यांची उत्तम ताळमेळ मला दिसली.

१) मुसाका, गायरोसी, बकलावा आणि कबाब येथील काही लोकप्रिय गोष्टी

२) बेटांवरील जेवणात माश्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. ऑक्टोपस, बांगडा, स्क्विड यांच्यापासून बनवलेले वेगवेगळ्या पाककृती तुम्हाला इथे दिसतील

ग्रीसला जाण्यासाठी सर्वोत्तम महिने:

मे आणि जून मध्ये तापमान सर्वोत्तम असते, सुमारे २५ C आणि पर्यटकांची गर्दी कमी असते . जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत या महिन्यांत किमती स्वस्त असतात जो पर्यटकांसाठी प्रसिद्ध कालावधी आहे



Lefkes

ग्रीसहुन काय आणावे -

१) ज्वालामुखीच्या राखेतून बनलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला सँटोरीनी मध्ये मिळतील.

२) घरात सजवण्या साठी तुम्हाला अनेक गोष्टी येथे दिसतील Evil eye नजर लागू नये म्हणून ग्रीस मध्ये प्राचिन काळापासून त्याचा उपयोग होतो, dreamcatcher आणि रंगबेरंगी दिवे

३) जर तुम्ही वाईन प्रेमी असाल तर नक्कीच येथील वाईन घेऊन या

४) मिलोस आणि पारोस मध्ये धातूच्या आणि संगमरवरी दगडाच्या बनलेल्या ग्रीक देवांच्या कोरीव प्रतिमा

ग्रीस प्राचीन इतिहास आणि अविस्मरणीय निसर्ग अश्या दोन अभूतपूर्व गोष्टीने जोडला आहे. इथे प्रत्येकासाठी काहीतरी आहे.

Article by

Mayuri Bhilare (@thatglocalgirl)




Updated : 14 Dec 2022 8:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top