Home > Environment > पावसाची सुट्टी संपणार

पावसाची सुट्टी संपणार

पावसाची सुट्टी संपणार
X

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सून सुट्टीवर गेल्याचं पहायला मिळत आहे. त्यापार्श्वभुमीवर आता मान्सूनची सुट्टी संपण्याचे संकेत मिळाले आहेत.

गेल्या तीन आठवड्यांपासून मान्सून सुट्टीवर गेला होता. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यातच पावसाळा संपण्यास अवघा महिना-दीड महिना राहिला असताना पाऊस कधी येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र आता पावसाची ही सुट्टी संपणार आहे.

शनिवारपासून राज्याच्या काही भागात पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. त्यामध्ये कोकणातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी तर विदर्भात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये 19 ते 25 ऑगस्ट या कालावधीत जोरदार पाऊस होणार आहे. त्याबरोबरच बुलढाणा, वाशिम, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यात 19 ऑगस्ट रोजी मुसळधार तर लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना आणि औरंगाबाद या जिह्यात मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. याबरोबरच मध्य महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

22 दिवसानंतर पाऊस पुन्हा सक्रीय होणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे.

Updated : 19 Aug 2023 3:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top