Home > Environment > Air pollution : महाराष्ट्राची हवा 'अतिवाईट'

Air pollution : महाराष्ट्राची हवा 'अतिवाईट'

Air pollution : महाराष्ट्राची हवा अतिवाईट
X

दिवाळी निमित्त संपूर्ण देशात आनंदाच वातावारण आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जोरदार दिवाळी साजरी करत फटाके फोडले जातायंत. या पार्श्वभूमीवर देशातील दूषित हवेचा निर्देशांक वाढत आहे. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाला रविवारी मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाल्यामुळे या शहरांमधील हवेची गुणवत्ता ‘अतिवाईट’ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीनंतर पिंपरी-चिंचवड हे दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे. मुबंई आणि उपनगरात उच्च न्यायालयाचे आदेश डावलून फटाक्यांची आतषबाजी झाल्यामुळे हवेची पातळी कमालीची खालावल्याचे दिसत आहे.

फटाक्यांच्या धुरामुळे दिवाळीती हवा, ध्वनी प्रदूषणा नेहमीच वाढ होत असते. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर रात्री ८ ते १० वाजेपर्यंत फोडण्याला सुट देत वेळेवर बंधन घातले होते. मात्र, ही मर्यादा कुठेही पाळली गेली नसल्याचे समजते आहे. प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मात्र, रविवारी नरक चतुर्दशी असल्याने पहाटेपासूनच फटाके फोडण्यास सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी दिवसभर आतषबाजी सुरूच होती. सायंकाळी लक्ष्मीपूजनानंतर सुरू झालेले मोठय़ा आवाजाचे फटाके रात्री उशिरापर्यंत फुटत होते. हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या ‘सफर’ प्रणालीनुसार सोमवारी प्रदूषणकारी धूलिकणांचे प्रमाण कोथरूडमध्ये ३५८, शिवाजीनगरमध्ये ३८२, हडपसरमध्ये ३३२, कात्रजमध्ये ३५५, लोहगावमध्ये ३८२, पिंपरी चिंचवडमधील भूमकर चौकात ३१३, निगडी ३४१, आळंदी ३१२, भोसरीमध्ये ३४२ नोंदविले गेले.

दिल्लीत सर्वाधिक प्रदूषित हवा

रविवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सोमवारी सकाळी दिल्लीतील हवेची पातळी खालावली. परिणामी स्वित्र्झलडस्थित ‘आयक्यू एअर’ या प्रदूषणाच्या नोंदी ठेवणाऱ्या कंपनीच्या नोंदीनुसार दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे.

मुंबईची हवा

गेल्या महिनाभरापासून मुंबईची हवा दूषित आहे. हवेचा दर्जा सलग खालावत आहे. सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार मुंबईच्या हवेची गुणवत्ता अतिवाईट असल्याची नोंद करण्यात आली. मालाड येथे सोमवारी अतिवाईट हवेची नोंद झाली. परंतू आज हवेची गुणवत्ता निर्देशांक २५६ नोंदवला गेला. , बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे २०८, चेंबूर येथे २५६ , सायन येथे १५९ आहे. मागील तीन दिवस पावसाच्या शिडकाव्यामुळे सुधारलेली हवा फटाक्यांनी पुन्हा खराब केली.


पुण्याचीही हवा दूषित

फटाक्याच्या आतषबाजी पुण्याचीही हवा देखील खराब झाली आहे. हवेच्या गुणवत्ता मोजणाऱ्या ‘सफर’ प्रणालीनुसार सोमवारी प्रदूषणकारी धूलिकणांचे प्रमाण कोथरूडमध्ये ३५८, शिवाजीनगरमध्ये ३८२, हडपसरमध्ये ३३२, कात्रजमध्ये ३५५, लोहगावमध्ये ३८२, पिंपरी चिंचवडमधील भूमकर चौकात ३१३, निगडी ३४१, आळंदी ३१२, भोसरीमध्ये ३४२ नोंदविले गेले.

Updated : 14 Nov 2023 3:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top