विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असली तरी शिवसेना भाजपमध्ये अद्याप जागावाटप झालेलं नाही. युतीचं जागावाटप हे भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षा भयंकर असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. २८८ जागांचं वाटप करणं कठीण आहे असं राऊत म्हणाले.
यासोबतच "मागच्या विधानसभा निवडणुका वेगवेगळे लढल्यानंतर सरकारमध्ये न राहता विरोधी पक्षात बसलो असतो तर आजचे चित्र वेगळं असतं" असंही राऊत यांनी म्हटलंय.
Updated : 24 Sep 2019 8:32 AM GMT
Next Story