महाशिवआघाडी नाही, महाविकास आघाडी!

120
महाशिवआघाडी नाही, महाविकास आघाडी!

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. शिवसेनेला पाठींबा देण्यावरून काँग्रेसच्या वर्कींग कमीटीने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे लवकरच राज्यात नवं सरकार स्थापन होऊ शकतं. याबबत लवकरच मुंबईत घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.

या तीन पक्षांच्या आघाडीला ‘महाशिवआघाडी’ असं संबोधलं जात होतं. मात्र, या आघाडीचं नाव ‘महाविकास आघाडी’ ठेवलं जाणार आहे. या र्चांमध्ये ‘संयुक्त विकास परिषद’ या नावावरही चर्चा झाली. मात्र, शेवटी ‘महाविकास आघाडी’ हे नाव अंतिम करण्यात आलं आहे.

किमान समान कार्यक्रमात वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवून विकासासंबंधीचे मुद्दे केंद्रबिंदू ठेवण्यात आले आहेत. कोणत्या पक्षाला कोणती मंत्रीपदं मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यानुसार आपापल्या पक्षाकडून मंत्रीमंडळात कोणाला स्थान द्यायचं यावर सध्या काम सुरू आहे.