News Update
Home > Election 2020 > शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तर रोहित पवारांच्या अंगावर उधळला 30 जेसीबीतून गुलाल

शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तर रोहित पवारांच्या अंगावर उधळला 30 जेसीबीतून गुलाल

शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तर रोहित पवारांच्या अंगावर उधळला 30 जेसीबीतून गुलाल
X

रोहित पवार हे शरद पवार यांचे राजकीय वारसदार आहेत. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना रोहित पवार यांच्या आजच्या कृतीने त्यांच्या या इमेजला तडा जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

एकीकडे परतीच्या पावसानं राज्यातील शेतकरी हैरान झाला आहे. शेतकऱ्यांची परिस्थितीची पाहणी करण्यासाठी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्य़ांच्या बांधावर गेले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांचे नातू असलेले रोहित पवार जेसीबीतून विजयाचा गुलाल उधळण्यात मग्न आहेत.

विशेष म्हणजे त्यांच्याच मतदारसंघात एका पारधी समाजाच्या व्यक्तीची हत्या झाली असताना मतदार संघाचे प्रतिनिधी मात्र, विजयोत्सव साजरा करण्यात मग्न आहेत. हत्या झालेल्य़ा खर्डा गावात आजही तणावाचे वातावरण आहे. या खर्डा गावातच नितिन आगे प्रकरण घडलं होतं. कदाचित याची रोहित यांना कल्पना नसावी.

रोहित पवार यांनी निकालानंतर आज कर्जत जामखेड मतदारसंघात आभार यात्रा काढली. आज सकाळ पासून सुरू झालेली ही यात्रा दुपार होता होता जामखेड ला पोहोचली. जामखेड मध्ये कार्यकर्त्यांनी 30 जेसीबींनी गुलाल उधळून त्यांचं स्वागत केलं. यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळाली.

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, मला एवढी मोठी मिरवणुक काढायची नव्हती. मात्र, कार्यकर्त्यांचा आग्रह होता मला माहित नव्हतं की, एवढी मोठी मिरवणूक असेल. इथं आल्यावर कळाले आणि तुम्ही ही पाहिले या दोन दिवसांत मतदारसंघात विकास कामांना सुरवात होणार असून शिक्षण, महिला बचत गटाची काम करणार असल्याचं रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं.

आता आमदार रोहित पवार जरी आपल्याला या जेसीबीची कल्पना नव्हती असं सांगत असले तरी आज सकाळपासून रोहित यांच्या स्वागतासाठी तयार असणाऱ्या या जेसीबीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे जेसीबीची रोहित पवार यांना कल्पना नव्हती असं म्हणणं किती खरं आहे? हा संशोधनाचा विषय आहे.

राज्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान तर झालं आहे. त्याचबरोबर रस्ते देखील खराब झाले आहेत. रस्त्यावर मोठ्य़ा प्रमाणात खड्डे झाले आहेत. हे खड्डे या 30 जेसीबीनं बुजवता आली असती. कमीत कमी कर्जत जामखेड या मतदारसंघातील खड्डे तरी या 30 जेसीबीनं बुजवता आली असती.

एकूणच आजच्या या घडामोडीतून शरद पवारांचा राजकीय वारसदार आहे. असं म्हणणं आणि शरद पवारांचा राजकीय वारसदार असणं यात खूप मोठा फरक असल्याची जाणीव होते असंच म्हणावं लागेल.

Updated : 1 Nov 2019 4:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top