Home > Coronavirus > Lockdown : संतप्त व्यापाऱ्यांचे सांगलीत भीक मांगो आंदोलन

Lockdown : संतप्त व्यापाऱ्यांचे सांगलीत भीक मांगो आंदोलन

Lockdown :  संतप्त व्यापाऱ्यांचे सांगलीत भीक मांगो आंदोलन
X

सांगली : कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून पाच दिवस म्हणजे 19 तारखेपर्यंत लॉकडाउन सुरू केले आहे.. याला विरोध करत व्यापाऱ्यांनी हरभट रोडवरच्या बाजारपेठेत भीक मांगो आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

सांगली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाउन घोषित केला आहे. पण व्यापाऱ्यांनी या लॉकडाऊनला विरोध करत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशा आशयाचे बोर्ड व्यापाऱ्यांनी झळकावले. कर्मचाऱ्यांचे पगार, कर्जावरील व्याज, पाणीपट्टी, GST, दुकान भाडे कर्जाचे हफ्ते, घरपट्टी, वीजबिल, आयकर, घरखर्च कसा भागवायचा असा सवाल व्यापाऱ्यांनी विचारला आहे.

Updated : 14 July 2021 10:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top