Home > Coronavirus > अक्षय कुमारसह ४५ कलाकारांना कोरोना, 'राम सेतू' चं शुटींग थांबवलंअक्षय कुमारसह ४५ कलाकारांना कोरोना, 'राम सेतू' चं शुटींग थांबवलंअक्षय कुमारसह ४५ कलाकारांना कोरोना, 'राम सेतू' चं शुटींग थांबवलंअक्षय कुमारसह ४५ कलाकारांना कोरोना, राम सेतू चं शुटींग थांबवलं


X

सध्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा प्रभाव सर्वच क्षेत्रात पाहायला मिळत आहे. अनेक प्रकल्प थांबवले जात आहे. बॉलिवूड क्षेत्रावरही याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'राम सेतू' या चित्रपटाला देखील कोरोनाचा फटका बसला आहे.

'राम सेतू' या चित्रपटातील ४५ कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहे. अक्षय कुमारला देखील कोरोनाची लागण झाली आहे. ४५ कलाकारांना कोरोनाची लागण झाल्यानं या चित्रपटाचं शुटींग थांबवण्यात आलं आहे. चित्रपटाची शूटींग मड आयलँडला होत असून यामधील कलाकारांची शुटींग पु्र्वी कोरोनाची टेस्ट करण्यात आली. यामध्ये ४५ कलाकरांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पूर्ण चित्रपटाचं शुटींग थांबवण्यात आलं आहे.


Updated : 5 April 2021 4:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top